राजकिय

आगामी निवडणुकांसाठी राजकीय पक्षाच्या तयारीला वेग ; तालुक्यातील दिग्गजांचे राजकारण मात्र ‘अस्थिरच..!!

"सत्तेविना पढा-यांची दयनीय अवस्था ; खमक्या नेत्याअभावी कार्यकर्त्यांना काही कळेना..!!" "कधीकाळी भाजपविरोधी म्हणवून घेणा-यांचेही आता भाजपसमोर अक्षरश: लोटांगण...?"

(महाराष्ट्र न्युज नेटवर्क)
(बाबाराव कंधारे)

किनवट/माहूर

  कार्यकर्त्यांपासून ते पुढा-यांपर्यंत यशाची एकमेव पायरी असलेल्या राजकारणात माहूर तालुक्यातील अनेक दिग्गज राजकीय पुढा-यांचे राजकीय भवितव्य आजही अस्थीरच दिसत असून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांत संधी मिळावी यासाठी कधीकाळी भाजपविरोधी असल्याचे सांगणारे तालुक्यातील तत्कालीन नेते आज भाजपसमोर अक्षरश: लोटांगण घालत असल्याची परिस्थीती येवून ठेपल्याने भाजपातील एकनिष्ठ कार्यकर्त्यांची पिछेहाट होवून संधीसाधूंची वर्णी लागेल काय..? याबाबत अनेक राजकीय भाकीतांचा पाऊस पडून असून येत्या काळात तालुक्यातील विविध राजकीय पक्षांच्या होमग्राउंड वर मोठे उलटफेर होवून मोठ्या राजकीय घडामोडी घडणार असल्याचे भाकीत राजकीय जाणकारांकडून व्यक्त केले जात आहे..

   एकेकाळी दिग्गज व धुर्त किंबहुंना ‘खणखणीत’  राजकीय पुढा-यांनी गजबजलेल्या माहूर तालुक्यात अनेक दमदार व निर्णायक पुढा-यांची मोठी फळी होती. अगदी मागील काही वर्षांपर्यंत शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस व माकपाच्या नेतेमंडळीची आपापल्या कार्यक्षेत्रावर प्रभावी व तेवढीच निर्भेळ पकड होती. परंतू ती पकड आजच्या परिस्थितीत कितपत घट्ट असेल..? याबाबत आज सांगणे कठीण असून सभोवतालची राजकीय परिस्थिती व मागील काही काळापासून राज्याच्या राजकारणातील घडत असलेल्या अन:पेक्षित घटनांमुळे भल्याभल्यांच्या राजकारणाचा अक्षरश: कचरा झाल्याचे उभ्या महाराष्ट्राने अनुभवले आहे. अशा परिस्थितीत माहूर तालुक्यातील राजकारण देखील स्थिर राहीले नसून तालुक्यातील राजकारणाच्या वर्तमान परिस्थिती पाहता ‘मैं बडा’ च्या “फुशारक्या” मारणा-या अनेक पुढा-यांचे राजकारण केवळ नावापुरतेच नाही तर त्यांच्या  सध्याच्या राजकारणाची अवस्था अत्यंत वाईट झाल्याची बोलकी प्रतिक्रिया कार्यकर्त्यांकडून दिली जात आहे..
  विशेष म्हणजे कधी काळी ‘आमच्या रक्तांतच काँग्रेस’ असल्याचे छातीठोकपणे सांगणारे अनेक गावकरी नेते आज सत्तेच्या प्रवाहात स्वत:ला वाहवून घेण्यासाठी भाजपाकडे लोटांगण घालत असल्याचे अढळ सत्य कुणीही नाकारू शकत नाही… किंबहूंना सत्तेशिवाय राहूच शकत नसल्याने तालुक्यातील पहिल्या फळीतल्या बहुतांश नेत्यांची अवस्था आजघडीला अत्यंत दयनीय बनली असून नेतेच सैरावैरा पळत सुटल्याने खमक्या नेताच नाही या भावनेतून कार्यकर्त्यांनाही काही सुचेनासे झाल्याची परिस्थिती आहे..   त्यातच काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, माकप व इतर पक्ष व त्यांच्या कार्यकर्त्यांचा अक्षरश: ‘उन्हाळा’ झाल्याने हे पक्ष भाजपाचा तालुक्यातील वाढता प्रपंच थोपवण्यात यशस्वी होतील..?? याची नाममात्रही शक्यता नसल्याचे जाणकारांचे मत आहे.. अशात काँग्रेससह इतर अनेक राजकीय पक्षांतून भाजपात आलेला कार्यकर्त्यांचा लोंढा सत्तेसाठीच किंवा वाहत्या गंगेत हात धुवून घेण्यासाठीच नव्हे का..? याबाबतचे मत व्यक्त करण्यास कुण्या ज्योतिष्याची गरज नसून कधीकाळी “आमच्या रक्तांतच धर्मनिरपेक्षता” असल्याच्या बड्या बाता मारून भाजपावर गरळ ओकणा-या अनेक पक्षातील स्वयंघोषित पुढारी मंडळी सत्तेच्या प्रवाहात सामील होण्यासाठी आज भाजप नेत्यांचे उंबरठे झिजवत आहेत… ही बाब जनतेच्या मात्र पचनी पडत नसून कधीकाळी धर्मनिरपेक्षतेच्या गप्पा मारणारे आज ‘जय श्रीराम” चा नारा देत भाजपात सामील झाले असले तरी त्यांची डाळ काही शिजणार नाही हेच अंतिम सत्य असल्याचे जाणकारातून बोलले जात आहे… 
“एकंदरीतच आगामी जि.प. व पं. स. निवडणूकांच्या अनुषंगाने तालुक्यातील एकूणच राजकीय परिस्थिती पाहता कधीकाळी धुर्त व दिग्गज म्हणवून घेणारे राजकीय नेेेते व त्याचे कार्यकर्ते आज प्रचंड सैरावैरा धावताना दिसत असून बहुतांश कार्यकर्ते हे भाजपच्या वाटेवर असल्याने तालुक्यातील दिग्गजांचे राजकारण हे अमर्याद सत्तेपुढे निष्प्रभ होवून सध्यातरी मर्यादित व अस्थिरच असल्याचे ठाम मत राजकीय जाणकारांकडून व्यक्त केले जात आहे.. 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close