माहूर तालुक्याच्या बालकाची ‘विदर्भ क्रिकेट असोशिएशन’ च्या (कॅम्प) साठी निवड….
"अंडर ट्वेल खेळाडूंच्या यादीत समावेश झाल्याने तालुक्यातूून कौतुकाचा वर्षाव..!"

(महाराष्ट्र न्युज नेटवर्क)
किनवट/माहूर
माहूर तालुक्यातील मौजे मेंडकी येथील मुळ रहीवासी असलेल्या बालकाची ‘अंडर ट्वेल’ क्रिकेट खेळाडूंच्या पुढील प्रशिक्षणासाठी विदर्भ क्रिकेट असोशिएशन मध्ये निवड झाली असून अवघ्या सहाव्या वर्गात शिकत असलेल्या या खिलाडू बालकाची निवड निवड झाल्याने संपुर्ण तालुक्यातून बालकावर कौतुकाचा वर्षाव होत आहे…
माहूर तालुक्यातील दुर्गम भागात वसलेल्या मौजे मेंडकी येथील माहूर तालुका सरपंच संघटनेचे माजी तालुकाध्यक्ष राजकुमार भगवान राठोड यांचा मुलगा वंशराज राजकुमार राठोड हा यवतमाळ येथे जाजू इंग्लीश मेडीयम स्कूल येथे इयत्ता सहावीत शिक्षण घेत असून शिक्षणाबरोबरच ‘डेक्कन ब्लू क्रिकेट अकॅडमी’ यवतमाळ येेेथे मागील तीन वर्षांपासून क्रिकेट या खेळाचे प्रशिक्षण देखील घेत आहे.. दरम्यान क्रिकेट अकॅडमी मार्फत विविध ठिकाणी खेळलेल्या स्पर्धांत विदर्भ क्रिकेट असोशिएशन मार्फत विदर्भातील ११ जिल्ह्यांतून ३६ खेळाडूंची निवड (कॅम्प) साठी करण्यात आली असून या निवडीत माहूर तालुक्यातील वंशराज राजकुमार राठोड या बारा वर्षीय बालकाची देखील निवड करण्यात आली आहे… या निवडीने वंशराज मधील खेलाडू ख-या अर्थाने पुढे येणार असून भविष्या भारतीय क्रिकेट संघाकडून खेळण्याचे वंशराज चे स्वप्न असल्याचेही त्याने बोलून दाखवले आहे…
माहूर तालुक्यातील अत्यंत दुर्गम भाग म्हणून परिचित असलेल्या मौजे मेंडकी येथील वंशराज राजकुमार राठोड याची विदर्भ क्रिकेट असोशिएशन मार्फत कॅम्प साठी झाल्याने संपुर्ण तालुक्यातून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून त्याचे आजोबा भगवान बामणू राठोड यांच्यासह वडील राजकुमार राठोड, आई रेखाबाई राठोड, तसेच कपीलजी नाईक, ज्योतीबा खराटे, समाधान जाधव, प्रशांत भाऊ राठोड, फिरोज दोसानी, नाना लाड, गोविंद मगरे, गोपू भाऊ महामुने, सुरेश गिर्हे, दत्तराव मोहिते, प्रा. यादवराव जाधव, मेघराज जाधव, नारायण बन्सी पवार (नायक), उत्तम राठोड, सुरेश वसराम राठोड ( कारभारी), आनुसिंग नानु राठोड, दयाराम चव्हाण, विष्णु चव्हाण, प्रेम पवार, विक्रम जाधव, रमेश जाधव, युवराज जाधव, इंदल चव्हण, तारासिंग राठोड, अंकुश तुळशीराम, अनिल श्रीराम, रितेश सांधु, आनंद चव्हाण, मधुकर रामधन, प्रमोद राठोड, गौतम येरेकार, विशाल पवार, अजय चव्हाण, कृष्णा ऋषीकेश, अमर राठोड, अकाश संतराम चव्हाण, बाबू कसकर सह अनेकांनी दिल्याचे राजकुमार राठोड यांनी सांगीतले आहे….

