फोटो वायरल करण्याची धमकी देवून शरीरसुखाची मागणी करणा-या सारखणी येथील इसमावर गुन्हा दाखल….
"आरोपीस अटक ; एक दिवसाची पोलीस कोठडी"

(महाराष्ट्र न्युज नेटवर्क)
किनवट/माहूर
फोटो वायरल करण्याची धमकी देवून शरीरसुखाची मागणी करणा-या सारखणी येथील एका इसमावर गुन्हा दाखल करण्यात आला असून याप्रकरणी आरोपीस अटक केल्यानंतर न्यायालयाने संबंंधितास एका दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे…
काल दि. २७ जुलै रोजी सिंदखेड पोलीस ठाण्यात प्रत्यक्ष हजर होवून एका पिडीतेने दिलेल्या फिर्यादीनुसार सारखणी येथील सरफराज खान नौशाद खान वय 27 वर्षे व्यवसाय मजुरी याने फिर्यादिचे सोबत ओळख करुन, मैत्री करुन तसेच सोबत काही फोटो काढुन यातील फिर्यादीस काढलेले फोटो दाखवुन तिच्या इच्छे विरुद्ध लैंगीक संभोग केला. यातील फिर्यादीच्या मोबाईल वर यातील आरोपीने फोटो पाठवुन शरीर सुखाची मागणी केली. व तिचा छुपा पाठलाग करुन वारंवार शारीरिक संबधाची मागणी केली. तसेच फोटो वायरल करण्याची धमकी दिली. एवढेच नव्हे तर याप्रकरणी कोणाला काही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. वगैरे जबाब वरुन दि. २७ जुलै रोजी सिंदखेड पोलीस ठाण्यात वरील आरोपीविरूद्ध गु.र.नं.115/2025 कलम 64(1), 75(2) (3), 78, 79, 351(2) (3), भारतीय न्यायसंहिता 2023 व कलम 67 माहीती तंत्रज्ञान अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्ह्याचा तपास माहूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक गणेश कराड हे करीत आहेत. तर तपासकामी सिंदखेड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरिक्षक रमेश जाधवर यांच्यासह त्यांच्या टिमची मोलाचे सहकार्य होत आहे…
याप्रकरणी आरोपीस अटक करण्यात आली असून आरोपीस आज रोजी न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने सदर आरोपीस एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे…

