शैक्षणिक
बी.ए. च्या ‘ट्रॅव्हल्स & टूरिझम’ अभ्यासक्रमाच्या नावाखाली किनवट येथील वरिष्ठ महाविद्यालयाकडून विद्यार्थ्यांची घोर फसवणूक..? विद्यार्थ्यांची तक्रार..!!
"वर्ष 2023 पासून विद्यार्थ्यांची परिक्षाच नाही..? ; विद्यार्थ्यांनी जाब विचारताच संस्थाचालकाचा थयथयाट..!!" "किनवटच्या क्रांतिसुर्य बिरसा मुंडा वरिष्ठ महाविद्यालयाचा पडद्यामागचा प्रताप"

(महाराष्ट्र न्युज नेटवर्क)
किनवट/माहूर
‘ट्रॅव्हल्स अँड टूरिझम’ अभ्यासक्रमाच्या नावाखाली किनवटच्या क्रांतिसुर्य बिरसा मुंडा वरिष्ठ महाविद्यालयाकडून विद्यार्थ्यांची घोर फसवणूक होत असल्याची तक्रार विद्यार्थ्यांनी लेखी निवेदनाद्वारे केली असून विद्यार्थ्यांना आर्थीक आमिष दाखवून प्रवेश करवून घेतलेल्या या अभ्यासक्रमात चक्क २०२३ पासून अद्यापही परिक्षाच झाली नसल्याने याबाबतचा जाब विचारणा-या विद्यार्थ्यांना संबंधित महाविद्यालयाच्या संस्थाचालकाने अपमानित केल्याचा आरोप करूनसंबंधित महाविद्यालयावर कारवाई करण्याची मागणी लेखी निवेदनाद्वारे केली आहे…
किनवट तालुका शिक्षणक्षेत्रात अग्रेसर असला तरी येथीलच गोकुंदा येथे भाड्याच्या दोन खोल्यांत सुरू केलेले क्रांतिसुर्य बिरसामुंडा वरिष्ठ महाविद्यालयात बी.ए. या शाखेतील ‘ट्रॅव्हल्स अँड टूरिझम’ या अभ्यासक्रमात प्रवेशित असलेल्या एकूण 17 विद्यार्थ्यांनी केलेल्या लेखी तक्रारीने या महाविद्यालयाच्या कार्यप्रणालीसह प्रणातेवर देखील प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून यामुळे किनवट तालुक्यातील शिक्षणक्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे..
दरम्यान महाविद्यालयाबाबत येथील १७ विद्यार्थ्यांनी केलेल्या लेखी तक्रारीनुसार या महाविद्यालयातील बी.ए. शाखेतील ‘ट्रॅव्हल्स अँड टूरिझम’ या अभ्यासक्रमात त्यांनी २०२३ या वर्षात प्रवेश घेतलेला आहे. परंतू या अभ्यासक्रमात कधीही तासिका झाल्या नसून २०२३ मध्ये प्रवेश घेतल्यानंतर केवळ पहिल्या वर्षात महाविद्यालयाने ‘दिखावेगीरी’ करत परिक्षा घेतल्या… त्या देखील उत्तरे लिहायच्या हस्तिका एका तथाकथीत विधिज्ञ व पर्यायाने कायदेशीर असलेल्या एका सल्लागाराने विद्यार्थ्यांना देवून पहिल्या वर्षाची परिक्षा पार पाडली.. त्यानंतर मात्र परिक्षा कधीच घेण्यात आली नसून २०२५ पर्यंत अद्याप परिक्षाच झाली नसल्याचा खळबळजनक गौप्यस्फोट सदरील विद्यार्थ्यांनी केला आहे…. याप्रकरणी सदर महाविद्यालयातील कर्मचारी, संस्थाचालक, प्राध्यापक व तथाकथीत कायदेशीर सल्लागारांने केल्याचा खळबळजनक आरोप येथील ‘ट्रॅव्हल्स अँड टूरिझम’ या अभ्यासक्रमात प्रवेशित असलेल्या व घरनिवासी शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांनी केला असून महाविद्यालयाच्या प्रामाणिकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.. त्यामुळे शिक्षणाच्या नावाखाली शैक्षणिक बोगसगीरी सुरू असल्याने याबाबत संपुर्ण चौकशी करून संबंधितावर कायदेशीर कारवाई व्हावी यासाठी सदर विद्यार्थी आमरण उपोषण करणार असल्याचेही विद्यार्थ्यांनी केलेल्या तक्रारीत म्हटले आहे….
विशेष म्हणजे सदरील महाविद्यालय चालवण्यासाठी संस्थाचालकाने तत्कालीन वेळी गोकुंदा येथे दोन खोल्या भाड्याने घेवून त्याच दोन खोल्यांत विद्यांर्थांचे प्रवेश केले असल्याचे विद्यार्थानी सांगितले आहे.. एवढेच नव्हे तर वरिष्ठ या नावाला साजेसा महाविद्यालयाला जोडलेला नाव प्रदर्शित करणारा “वरिष्ट” नावाचा फलक कुठेही लावलेला नाही.. केवळ औपचारिकता पार पाडण्याच्या उद्देशाने दोन खोल्यांत सदर संस्थाचालकाने वरिष्ठ महाविद्यालयाचा ‘बाजार’ थाटला असून कंटाळलेल्या विद्यार्थांना बोनाफाईड प्रमाणपत्रासाठी पाचशे ते दोन हजार रूपये, मुळ कागदपत्रांसाठी चार ते सहा हजार रूपये तर टि.सी. साठी किमान चाळीस ते सत्तर हजार रूपयाची मागणी केली जात असल्याचा गंभीर आरोप तक्रार कर्त्या विद्यार्थांनी तक्रारीत केला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या तक्रारीवरून संबंधित “क्रांतिसुर्य बिरसा मुंडा वरिष्ठ महाविद्यालयावर काय कारवाई होते हे हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार असून महाविद्यालयाच्या कायदेशीर सल्लागाराने विद्यार्थ्यांना बोलून दाखवलेला….. “किनवटच्या पत्रकारांना पाचशे रूपयात मॅनेज करण्याचा फाजिल आत्मविश्वास याबरोबरच महाविद्यालयीन प्रशासन किती खोल पाण्यात आहे हे पाहण्यासाठी विद्यार्थी प्रतिनिधी शुभम गायकवाड यांच्यासह विद्यार्थ्यांनी मात्र कंबर कसली असून समाजसेविका प्रा.जयश्री भरणे यांनी बोगस व शिक्षणाचा काळा बाजार खपवून न घेता तो उघडगीस आणण्याचा दृढसंकल्प केला असल्याचे सांगितले आहे….

