शैक्षणिक
किनवटच्या क्रांतिसुर्य बिरसा मुंडा वरिष्ठ महाविद्यालयाचा असाही प्रताप…
"लिपिकाचा विद्यार्थी म्हणूनही प्रवेश ; प्रकरण अंगलट येण्याच्या भितीेेने राजीनामा.." "मी नाही त्यातली.. दाखवण्यासाठी 'जाहीर आवाहन करण्याची दुर्दैवी वेळ..!!"

(महाराष्ट्र न्युज नेटवर्क)
किनवट/माहूर
गरीब दलित व आदिवासी विद्यार्थ्यांना विविध प्रकारचे आमिष दाखवून वरिष्ठ महाविद्यालयाच्या नावावर प्रचंड बोगसगीरी केलेल्या किनवट येथील ‘त्या’ वरिष्ठ महाविद्यालयाचा एक खळबळजनक प्रताप समोर आला असून लिपीकाला विद्यार्थी म्हणून प्रवेश दिल्यानंतर प्रकरण अंगलट येण्याच्या भितीने ‘मी नाही त्यातली’ म्हणत जाहीर आवाहन करण्याची दुर्दैवी वेळ आलेल्या महाविद्यालयीन प्रशासनाच्या व महाविद्यालयाच्या अनेक गंभीर प्रकारांना पुराव्यासह उजागर करणार असल्याचे निवेदनकर्त्या विद्यार्थ्यांनी सांगितले आहे…
आदिवासी व दुर्गम तालुुुका असलेले किनवट शहर हे किनवट माहूर या दोन्ही तालुक्यांसाठी शिक्षणाचे माहेरघर म्हणून नावारूपास आलेले असतानाच येथील कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालय रामटेक जि. नागपूर शी सलग्नित असलेले क्रांतिसुर्य बिरसा मुंडा महाविद्यालयात प्रवेशित विद्यार्थ्यांचा प्रवेश झाल्यापासून (सन 2023) चक्क परिक्षाच झाल्या नसल्याचा खळबळजनक गौप्यस्फोट येथील विद्यार्थी प्रतिनिधी शुभम गायकवाडसह एकून १७ विद्यार्थ्यांनी केल्यानंतर आमच्या वृत्तवाहीनीने याबाबतचे वृत्त प्रकाशित केले होते… त्या वृत्ताची धास्ती घेवून अवघ्या काही मिनिटात दि. २ ऑगस्ट रोजी कॉलेज प्रशासनाने जाहीर आवाहन करीत घडलेला प्रकार खोटा असल्याचा केविलवाणा प्रयत्न केला होता…
कॉलेज प्रशासनाने केलेल्या जाहीर आवाहनात असे लिहीले होते की, शुभम उद्धवराव गायकवाड हा मूळचा नांदेडचा रहिवासी असून तो महाविद्यालयाचा विद्यार्थी आहे. तो महाविद्यालयात सतत गैरवर्तन केल्यामुळे त्याला समजावले तसेच तो सदैव महाविद्यालयामध्ये अनुपस्थित राहत होता. आणि प्रथम वर्षाच्या द्वितीय सत्र परीक्षेस अनुपस्थित होता. एवढेच नव्हे तर बऱ्याच वेळा महाविद्यालयाकडे वेगवेगळ्या चुकीच्या मागण्या करत होता. व त्याच्या या मागण्या महाविद्यालयाने पूर्ण न केल्यामुळे तो महाविद्यालयांची विद्यार्थ्यांमध्ये व समाज माध्यमावर दिशाभूल व बदनामी करण्याचे काम करत असल्याचा निर्वाळा कॉलेज प्रशासनाकडून संस्थेचे अध्यक्ष हनुमान केशवराव कदम (पाटील) मो. 8888234777 यांच्या विनास्वाक्षरीच्या पत्रातून केले होते… विशेष सांगायचे झाल्यास “ते” वृत्त प्रकाशित झाल्यानंतर अवघ्या काही मिनिटात याच क्रमांकावरून आमच्या वृत्तवाहीनीलाही संपर्क करण्याचा वारंवार प्रयत्न झाला. परंतू, त्यास आम्ही दाद दिली नाही.. ही बाब वेगळी..!
“विशेष म्हणजे महाविद्यालयीन प्रशासनाकडून करण्यात आलेल्या आरोपांवर संबंधित विद्यार्थ्यााने खळबळजनक गौप्यस्फोट केला असून शुभम गायकवाड हा केवळ विद्यार्थीच नसून तो त्या महाविद्यालयाचा लिपीक सुद्धा असल्याचे त्याने सांगितले आहे.. तथापि, केवळ सांगितलेच नसून त्याचे प्राचार्याची स्वाक्षरी असलेले ओळखपत्र व लिपीक पदाचे कर्मचारी असलेले प्राचार्याच्या स्वाक्षरीने देण्यात आलेले शिक्षकेत्तर कर्मचारी असल्याचे ओळखपत्रही आमच्या वृत्तवाहीनीकडे सुपुर्द केले आहे…

“परिणामी सदरील वरिष्ठ महाविद्यालयाचे जाहीर आवाहन प्रथमदर्शनी निव्वळ बनवाबनवीच दिसून येत असून बी.ए. या शाखेतील “किर्तनशास्त्र व ट्रॅव्हल्स अँड टुरिझम” या अभ्यासक्रमाला प्रत्यक्षात खरंच मान्यता असेल काय ? याबाबतचा संशय आता बळावला आहे…. त्यामुळे दलित व आदिवासी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान करणा-या या महाविद्यालयाविरोधात निवेदनकर्ते विद्यार्थी आक्रमक झाले असून कॉलेज प्रशासनाची बनवाबनवी उघड करण्यासाठी व संस्थेसोबतच त्यांच्या बोगसगीरीला खतपाणी घालणा-या सर्व संबंधितांवर गुन्हे दाखल करावेत या मागणीसाठी विद्यार्थी व विद्यार्थीनी आमरण आमरण उपोषणाचा मार्ग अवलंबिणार असल्याचे विद्यार्थ्यानी सांगितले आहे…

