क्राइम

माहूरात ‘खवले मांजराची तस्करी करणा-या टोळीचा पर्दाफाश ; पाच जण वन विभागाच्या ताब्यात…

"वाईल्डलाईफ कंट्रोल ब्युरो मुंबई यांच्या सहकार्याने वनविभागाची धाडसी कारवाई"

(महाराष्ट्र न्युज नेटवर्क)

 

 

 

 

 

 

किनवट/माहूर

  माहूरात दुर्मिळ व संरक्षित असलेल्या खवले मांजराची तस्करी करणा-या टोळीतील पाच जण तस्करी करताना वनविभागाच्या तावडीत सापडले असून वाईल्डलाईफ कंट्रोल ब्युरो मुंबई यांच्या सहकार्याने माहूर वन विभाकडून झालेल्या या दुर्मीळ परंतू धाडसी कारवाईने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे….

 

 

वाईल्डलाईफ कंट्रोल ब्युरो मुंबई (WCCB) यांनी दिलेल्या गुप्त माहितीनुुुसार दि. 18 ऑगस्ट 2025 रोजी मौजे माहूर येथे वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 चे अनुसूची 1 मधील दुर्मिळ असलेले भारतीय “खवले मांजर” (Indian Pangolin – Manis crassicaudata) प्रजातीच्या वन्य प्राण्याची तस्करी होत असल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाली होती. त्यावरून केशव वाबळे उपवनसंरक्षक नांदेड यांच्या मार्गदर्शनाखाली किरण चव्हाण, स. वन सं. किनवट यांच्यासह माहूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी रोहित जाधव, किनवटचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रमोद राठोड यांनी सापळा रचला.. या सापळ्यात वनकर्मचारी व wccb मुंबई चे कर्मचारी बनावट खरेदीदाराच्या वेशात तयार झाले. सदर बनावट खरेदीदार यांना तस्कारांनी सुमारे 4 तास वेगवेगळी ठिकाणे फिरवल्यानंतर शेवटी आरोपी हे वनपरिक्षेत्र माहूर हद्दीतील मौजे मालवाडा परिसरातील राष्ट्रीय महामार्ग क्र. 161 A लगत H.P. पेट्रोल पंपाजवळ भेटण्यासाठी तयार झाले… त्याचवेळी भेटीच्या नियोजित जागेपासून जवळच लांजी फाटा, B.P. petrol pump येथे इतर अधिकारी व कर्मचारी दबा धरून बसले होते…

दरम्यान रात्री सुमारे 09.15 च्या सुमारास 1 चार चाकी व 1 दुचाकी किनवट च्या दिशेकडून नियोजित ठिकाणी पोहचले.. बनावट खरेदीदार टीमला सदर वाहनांमध्ये वन्यप्राणी खवले मांजर असल्याची खात्री होताच त्यांनी इतर दबा धरून बसलेल्या कर्मचाऱ्यांना कळवून त्यांच्यावर छापा टाकला त्यामध्ये 1 दुचाकी MH 32 AU 3093 , 1 चारचाकी वाहन MH 46 A 0102, व जिवंत खवले मांजर (Indian Pangolin – Manis crassicaudata) दिसून आले… त्यामुळे आरोपी रुपेश मारोतराव चेनेकर, रा. हिंदनगर वर्धा याच्यासह बाळू पुंजाराम डोखळे, रा. सावरगाव ता. किनवट, जयदीप मारोती राठोड रा. खैरगाव यवतमाळ, माधव पुंजाराम डोखळे, रा. सिंदगाव ता. किनवट, आनंद पांडुरंग भालेराव, रा.भिसी, ता. किनवट, असे एकूण 5 आरोपींना रंगेहात ताब्यात घेण्यात आले.. यावेळी रात्रीच्या अंधाराचा फायदा घेवून एक आरोपी फरार झाल्याचे वनविभागाकडून सांगण्यात आले आहे….

तस्करीत सामील असलेल्या वरील सर्व आरोपींवर वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला असून या कारवाईत वनपरिक्षेत्र माहूर चे कर्मचारी मनोहर कत्तुलवार यांच्यासह मीर साजिद अली, वनपाल गोंडवडसा, वनरक्षक निशांत दुर्गे, दिपक माने, ज्ञानेश्वर माळेकर, ओम वरकड, माधव डाके, गणेश काळे, अमोल गेडाम, बीजुसिंग गुसिंगे, वाहनचालक बाळकृष्ण आवळे यांनी मोलाची कामगीरी बजावली….

“सदर आरोपी भारतीय खवले मांजर (Indian Pangolin – Manis crassicaudata) या वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 अंतर्गत अनुसूची–I मध्ये समाविष्ट असलेल्या दुर्मिळ व संरक्षित प्राण्याच्या बेकायदेशीर शिकार व व्यापारात सहभागी असल्याचे उघड झाले आहे. आरोपींकडून एक जिवंत खवले मांजर व इतर मुद्देमाल जप्त केला असून त्यांच्यावर वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 नुसार गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. अनुसूची 1 मधील प्राणी जसे की मोर ,घोरपड काळवीट, खवले मांजर यांची तस्करी अथवा शिकार केल्यास तीन ते सात वर्षांची शिक्षा आहे. वन्यजीवांचे संवर्धन व संरक्षण ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. अवैध शिकार व व्यापार रोखण्यासाठी वनविभाग कठोर व सातत्यपूर्ण कारवाई करीत राहील.”
– केशव वाबळे,
उपवनसंरक्षक, नांदेड

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close