क्राइम

गणेशोत्सवात अनुशासनासाठी माहूर पोलिसांचा कठोर पवित्रा…

"हिंगणी येथील दोन गावठी दारू विक्रेत्यांवर कारवाई..!"

(महाराष्ट्र न्युज नेटवर्क)

 

 

 

किनवट/माहूर

गणेशोत्सव काळात कायदा व सुव्यवस्थेचा भंग होऊ नये यासाठी माहूर पोलिसांनी गावठी दारू विक्रेत्यांविरुद्ध धडक कारवाई सुरू केली असून उत्सवाच्या काळात अवैध दारू विक्रीमुळे शांतता बिघडण्याची शक्यता लक्षात घेता माहूर पोलिस निरीक्षक गणेश कराड यांनी विशेष मोहिम राबवत हिंगणी येथे दोन ठिकाणी छापे टाकून मोठ्या प्रमाणावर गावठी दारू जप्त करत दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे..

 

माहूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज दि. २३ ऑगस्ट रोजी दुपारी 12 ते 1 च्या सुमारास माहूर तालुक्यातील मौजे हिंगणी येथील अवैध गावठी दारू विक्रेत्यांवर ही कारवाई करण्यात आली.. दरम्यान सण व उत्सवाच्या काळात अनेक वेळा मद्यधुंद व्यक्तींमुळे गैरप्रकार घडतात. त्या पार्श्वभुमिवर जनतेच्या सुरक्षेसाठी तसेच सण उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी ही कारवाई आवश्यक ठरली आहे…

 

आज रोजी हिंगणी येथील अवैध गावठी दारू तयार करणाऱ्या अड्ड्यांवर छापेमारी करून कारवाई केलेल्या घटनेत ७०० लिटर मोहफुल फसफसते रसायन जागीच पोलिसांनी नष्ट केले आहे… तर सन उत्सवाच्या पार्श्वभूमीवर, गावठी दारूच्या विक्री किंवा साठ्याची कुठेही माहिती मिळाल्यास तात्काळ पोलीस ठाण्यात कळवावे. माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल. असेही माहूर पोलीसांच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे…

 

 

“आज रोजी माहूर पोलीसांनी केलेल्या धडक कारवाईचे स्थानिक नागरिकांनी स्वागत केले असून यामुळे सणाच्या काळात शिस्त आणि सुरक्षिततेचं वातावरण निर्माण होईल. असा विश्वासही व्यक्त केला आहे. ही कार्यवाही पोलिस निरीक्षक गणेश कराड यांच्या मार्गदर्शनात पो.उप.नि. अन्नेबोईनवाड यांच्यासह पो.काँ. प्रकाश गेडाम, पो.काँ. पवन राऊत, दत्ता सोनटक्के, संघरत्न सोनसळे, होमगार्ड उमेश भगत, किशोर जाधव, प्रवीण जाधव यांनी केली…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close