क्राइम

माहूर येथील लॉज मध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार..? ; तरुणीच्या तक्रारीवरून 31 वर्षीय डॉक्टरवर बलात्काराचा गुन्हा”

"रेती तस्करांपासून पुढा-यांपर्यंत व विद्यार्थ्यांपासून लंपटांपर्यंत अनैतिक कामांसाठी लॉजींग अजूनही खुल्याच..!"

(महाराष्ट्र न्युज नेटवर्क)
(बाबाराव कंधारे)

किनवट/माहूर

    विवाह सोहळ्यात झालेल्या ओळखीतून प्रेम सबंध निर्माण झाल्यानंतर लग्नाचे वचन देऊन तब्बल वर्षभर शारीरिक शोषण केल्याच्या गंभीर आरोपावरून आर्णी येथील एका ३१ वर्षीय डॉक्टर युवकावर आर्णी पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तरूणीवर झालेल्या अत्याचाराच्या प्रकार चक्क माहूर मधील एका लॉजवर वारंवार घडल्याने मागील काळात माहूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हेच घडत नसल्याचा माहूर पोलीसांचा दावा निव्वळ ‘फोल’ च ठरला नाहीत तर माहूर पोलीसांच्या मागील काळातील बडेजावपणाच्या कामगीरीवर देखील प्रश्नचिन्ह निर्माण करणारा आहे. सदर प्रकरणी पिढीत तरुणीने जबाब दिल्याने माहूर शहरातील वैश्याव्यवसायासह सुरू असलेल्या अनैतिक प्रकारांंसाठी सर्वतोपरी जबाबदार असलेल्या लॉजींगवर पोलीस प्रशासन करडी नजर ठेवेेल का..? असाही प्रश्न यानिमित्ताने पुन्हा एकदा चर्चेला आला आहे……
माहूर शहरात सुरू असलेल्या बहुतांश लॉजचालकांचे प्रत्यक्षातले मनसुबे या प्रकाराने पुन्हा  एकदा उजागर झाले असून महाविद्यालयीन तरुण तरुणी व अल्पवयीन मुलांनाही लॉज मालक लॉजवर लैंगिक शोषणासाठी जागा उपलब्ध करुन देत असल्याचे भयानक प्रकार माहूर मध्ये उघडकीस आले आहे..  दिनांक २० जून रोजी आर्णी येथील पीडित तरुणी ने पोलीसात दिलेल्या फिर्यादीनुसार वैभव नगर येथील संदीप जयवंत खंदारे (वय ३१) याच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार तिची आणि आरोपी संदीपची ओळख मे २०२४ मध्ये एका विवाह सोहळ्यात झाली होती.  ज्यानंतर त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. तेव्हापासून संदीपने लग्नाचे आमिष दाखवून तिच्यासोबत वारंवार शारीरिक संबंध ठेवले. दरम्यान शुक्रवार दि. २० रोजी आरोपीने पीडितेसोबत माहुर येथील एका लॉजवर पुन्हा शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर त्याने मद्यपान करून तिला मारहाण केली.. एवढेच नव्हे तर वर्षभरापासून लग्नासाठी झुलवत ठेवलेल्या पिडीतेला  ‘मी माझ्या पत्नीला परत घरी आणणार आहे.. त्यामुळे तुझ्याशी लग्न करू शकत नाही,’ असे सांगून लग्नास स्पष्ट नकार दिला. 
पिडीतेला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पीडितेने थेट आर्णी पोलीस ठाणे गाठून दिलेल्या तक्रारीनुसार आर्णी पोलिसांनी गु.र.नं 460/2025 अन्वये आरोपी संदीप खंदारे याच्यावर भारतीय न्याय संहितेच्या कलम ६४, ६९ आणि लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण (पोक्सो) कायद्याच्या कलम ४ आणि ६ अन्वये गुन्हा दाखल केला असून या गुन्ह्यात माहूर येथील लॉज चा वापर झाल्याने ती लॉज कोणती..? अल्पवयीन मुलगी सोबत असताना रूम दिली कशी..? त्या लॉज चालकावर काय कार्यवाही होणार या बाबत चर्चा सुरू झाली आहे…?
 तरुणाई भरकटण्याची भीती….!
      माहूर हे तीर्थक्षेत्राचे ठिकाण असून या ठिकाणी दर्शनाच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणात भाविक येत असतात. त्या मुळे येथे मोठ्या प्रमाणात लॉजिंग व्यवसाय फोफावला आहे. यातील काही ठराविक हॉटेल आणि लॉजींग व्यावसायिक सहज तरुण तरुणींना ओळपत्राची तपासणी न करता लॉज मध्ये रूम उपलब्ध करून देतात. तर अनेक ठिकाणी तरुणाईसह जोडप्यांना प्रायव्हसी मिळत असल्याने त्यांची पसंती काही ठरावीक हॉटेल लाँज ला मिळत आहे. मात्र या गर्दीत अल्पवयीन मुले मुलीही दिसत असल्याने शिक्षणाच्या नावाखाली घराबाहेर पडल्यानंतर त्यांची पावले या लाँज व हॉटेलकडे वळतात. विशेषतः महाविद्यालयीन विद्यार्थ्यासह अल्पवयीन मुला-मुलींचाही वावर वाढलेला दिसतो. एकंदरीतच एकांतवासात प्रेमाच्या लाटेवर तरंगत असलेल्या तरुणाईचे पाऊल चुकीच्या दिशेने वळण्याची भीती जाणकार नागरिकांमधून व्यक्त होत आहे…
“विशेष म्हणजे माहूर येथे मराठवाडा व विदर्भातील अनेक ठिकाणच्या देहविक्री करणा-या महिला दररोज माहूर शहरात दाखल होवून शहरातील विविध ठिकाणच्या लॉजींगवर अर्थपुर्ण जाळे टाकून आपल्या सावजाला अचूक हेरतात. तर लॉजींग चालकांचेही “कमी वेळेत जास्त उत्पन्न” हेच सुत्र आहे… या परिस्थितीत माहूरच्या एका लॉजवर माहूर तालुक्यातील एक रेती तस्कर व देहविक्री करणा-या एका अर्धवयीन महिलेता व्हिडीओ तत्कालीन वेळी सोशल मिडीयावर वायरल झाल्यानंतर आमच्या वृत्तवाहीनीने त्यासंदर्भात सडेतोड वृत्त प्रकाशित करून लॉजींग चालकांच्या अनैतिक व्यवसायाचे धिंडवडे काढले होते. परंतू या घटनेने नजरेआड गेलेला माहूर मधील लॉजींग व्यवसाय पुन्हा एकदा नजरेसमोर आला असून माहूर पोलीस ठाण्यात नुकतेच रूजू झालेले पोलीस निरिक्षक या अनैतिक व्यवसायावर अंकुश ठेवतील काय..? असाही प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला जात असून माहूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कायदा व सुव्यवस्थेची विस्कटलेली घडी पोलीस निरिक्षक कराड यांनी पुन्हा नीट बसवावी अशी माफक अपेक्षा जनसामान्य बाळगून आहेत….

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close