‘एलसीबी’ च्या नावाने वसूली प्रकरणाचा गुंता ‘एलसीबी’ लाच सुटता सुटेना ; “ते” खाजगी पंटर काही ‘एलसीबी’च्या हाती लागेना..!!”
"माहूर बीटला 'एलसीबी' कर्मचारीच नाही तरीही ४ जूनला मटकेवाल्यांकडून हप्ता वसूल..?"

(महाराष्ट्र न्युज नेटवर्क))
(बाबाराव कंधारे)
किनवट/माहूर
पोलीस विभागातील महत्वपुर्ण पोलीस शाखा असलेल्या एलसीबी अर्थात स्थानिक गुन्हे शाखेतील अज्ञात पोलीस कर्मचा-याच्या प्रतापाने वाई बाजारसह तालुक्यातील खाजगी ‘पंटर’ कडून “‘निजामी वसूली’ प्रकरणाचा गुंता काही केल्या सुटत नसून वर्षानुवर्षांपासून एलसीबी साठी वसूली करणारे ‘ते’ खाजगी वसूली पंटर एलसीबीच्या हाती लागत नसल्याचा आळ नांदेडची स्थानिक गुन्हे शाखा आणत असली तरी अगदी पाच दिवसांपुर्वी माहूरातील मटका व्यावसायिकांकडून हप्ता वसूल करणारा ‘तो’ पंटर नेमका कोण..? हा प्रश्न ‘एलसीबी’च्या कर्तव्यदक्षतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारा ठरत आहे….
नांदेड परिक्षेत्रात रूजू झालेले ‘कर्तव्यकठोर’ विशेष पोलीस उपमहानिरिक्षक शहाजी उमाप हे रूजू झाल्यानंतर जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर कमालीचा अंकुश लागला होता.. परंतू अत्यंत संवेदनशील व क्लिष्ट गुन्ह्यांचा शोध घेता घेता संगणकापेक्षाही भारी ‘क्लृप्त्या’ वापरणा-या स्थानिक गुन्हे शाखेतील किनवट व माहूर तालुक्यातील माहूरसह सिंदखेड, मांडवी, किनवट ठाण्यांशी संलग्न असलेल्या एलसीबीच्या दोन अज्ञात पोलीस कर्मचा-यांनी अनोखी शक्कल लढवून चारही पोलीस ठाण्याअंतर्गत अवैध धंदे पडद्याआड सुरू ठेवण्यासाठी भेटीगाठी घेवून त्यांचा नियमित हप्ता वसूल करण्यासाठी वाई बाजार येथील दोन व माहूर तालुक्यातील इतर काही खाजगी पंटर हप्तावसूलीसाठी कामी लावल्याचे आता माहूर तालुक्यात जाहीर झाले आहे… एलसीबीचे ते पोलीस कर्मचारी कोण.? याचा शोध घेवून ‘स्थानिक गुन्हे शाखेच्या वरीष्ठांकडून तगडी कार्यवाही होणे अपेक्षित असताना एलसीबी कडून एलसीबीचे सबंधित कर्मचारी व त्याच्या वसुली पंटरवर कोणत्याही प्रकारच्या कारवाईचा बडगा उगारला गेला नाही..हे विशेष..!!
विशेष म्हणजे.. नांदेड येथील स्थानिक गुन्हे शाखेत कार्यरत असलेले हजरी मेजर बालाजी तेलंग यांनी दिलेल्या माहीतीप्रमाणे माहूर पोलीस ठाण्याशी संलग्न असलेल्या एलसीबीच्या पोलीस कर्मचा-याची बदली झाली असून आजमितीस एलसीबीच्या माहूर पोलीस ठाण्याशी संलग्न जागेवर कुणीही कर्मचारी नाही..किंबहूना आज ही जागा रिक्त आहे…. असे असताना अगदी पाच दिवसांपुर्वी म्हणजेच ३ व ४ जून २०२५ रोजी माहूर शहरात पडद्यामागे सुरू असलेल्या मटका काऊंटर चालकांकडून वाई बाजारच्या एका खाजगी पंटरने एलसीबीच्या नावाने वसूली केल्याचे नाव न सांगण्याच्या अटीवर एकाने सांगितले असून आता या खाजगी वसूलीपंटर च्या डोक्यावर नेमका हात कुणाचा..? याचा शोध घेणे एलसीबी समोर कडवे आव्हान आहे… परिणामी त्या पंटरच्या डोक्यावर हात ठेवणा-या एलसीबीच्या “त्या” अज्ञात पोलीस कर्मचा-यांवर कारवाई करणे हे एलसीबी साठी ‘अवघड जागचे दुखणे’ होवून बसले आहे….
……त्यामुळे ‘अवैध धंद्यांचा कर्दनकाळ’ म्हणून “निर्भेळ” कर्तव्यातून आपली ‘सतेज प्रतिमा’ निर्माण केलेले विशेष पोलीस उपमहानिरिक्षक शहाजी उमाप यांच्यासह जिल्ह्याचे चाणाक्ष पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार यांनी याकडे जातीने लक्ष देवून एलसीबीत जमा झालेला हप्तेखोर कचरा व त्यामागे चिटकून आलेले रिकामटेकडे धुल:कण केवळ बाजूलाच सारू नयेत तर अंगार रूपी कारवाईने नष्ट व भस्म करावेत…अशी माफक अपेक्षा किनवट व माहूर तालुक्यातील भ्रष्टाचारविरोधी जनता बाळगून आहे…

