
(महाराष्ट्र न्युज नेटवर्क)
(बाबाराव कंधारे)
किनवट/माहूर
एलसीबी च्या नावाखाली एलसीबीच्या एका पोलीस कर्मचा-याच्या हिमतीवर खाजगी एजंटांनी वसूलीच्या सर्वच्या सर्व मर्यादा ओलांडल्या असून गोरगरीबांच्या तोंडचा घास पळवूून त्याची काळ्याबाजारात विक्री करणा-या एका संधीसाधू व्यापा-यांची थेट मदत करताना वसूलीच्या पैशातून गुटखा व्यवसायासह जुगार व्यवसायातही वसूलीकिंग एजंटांची अनेक ठिकाणी भागीदारी असल्याची खळबळजनक माहीती समोर येत आहे…
संपुर्ण नांदेड जिल्ह्यातील अवैध व्यवसाय बंद असताना किनवट व माहूर तालुक्यातील अवैध व्यवसायाची एलसीबीच्या नावाखाली तगडी वसूली सुरू असल्याच्या अनुषंगाने माहीती गोळा करीत असताना रोज नवनवीन माहीती समोर येत आहे… रेतीसह मटका, गुटखा, देशी व गावठी दारू, चिडी-फकडी, लॉटरी, जुगार यासह जिवनावश्यक वस्तूंच्या काळाबाजारातील बड्या आसामींना हप्तारूपी रसद घेवून संरक्षण देत असल्याचे वास्तव आमच्या हाती लागले आहे…
किनवट तालुक्यातील किनवटनजीक असलेल्या गावातील एका व्यापा-यासाठी रेशनचा माल खरेदी करून तोच माल थेट पोचवण्यासाठी याच व्यापा-याने किनवट व माहूर तालुक्यात मोठे नेटवर्क तयार केले असून माहूर तालुक्यातील ‘काटामार’ म्हणून बदनाम असलेल्या एका भुसार व्यापा-याच्या मदतीने तसेच एलसीबीच्या नावाने तथाकथीत एजंटांना खुश ठेवून गोरगरीबांच्या तोंडचा घास पळविला जात असल्याचे जळजळीत वास्तव आहे.. दरम्यान रेशनचा माल थेट रेशन दुकानासमोरच वाहन लावून खरेदी करण्यासाठी याच खाजगी एजंटांना मोठ्या रकमेचा दरमहा व नियमित हप्ता दिला जात असून थेट रेशन दुकानावरच लाभार्थ्यांकडून हातोहात खरेदी केलेला तांदूळ व गहू वाई बाजारसह संपुर्ण माहूर तालुक्यातून थेट किनवट शहरानजीकच्या एका व्यापा-यापर्यंत विनारूकावट पोचविला जातो हे देखील वास्तव कुणी नाकारू शकत नाही….
“विशेष म्हणजे माहूर तालुक्यातून खरेदी केलेला रेशनचा माल हा माहूरसह सिंदखेड व किनवट पोलीस ठाण्यांच्या हद्दीतून विनारुकावट जातोच कसा..? हा संशोधनाचा विषय असून या महान कार्यामागे एलसीबीच्या एका कर्मचा-याचे मोठे योगदान असल्याचे सांगण्यात येत आहे.. एवढेच नव्हे तर नंबर दोन वाल्यांची केवळ वसूलीच नाही तर त्यांच्या अवैध व्यवसायाला संपुर्ण संरक्षण देण्याची हमी देऊन एलसीबीच्या नावाने वसूली करणारे तालुक्यातील खाजगी एजंट अनेक अवैध व्यवसायात चक्क भागीदारी करत असल्याची देखील खळबळजनक माहीती समोर आली आहे.. परिणामी अवैध धंद्यांवर अंकुुश ठेवणारा विभाग म्हणून आपली शेखी मिरवणा-या “एलसीबी” नामक पोलीस शाखेतील तो पडद्यामागचा सुत्रधार कोण..? केवळ एजंटांना “भुमिगत करून चालणा नाही…तर त्याच एजंटांच्या खांद्यावर बंदूक ठेवून चालवणा-या एलसीबीतील ‘त्या’ पोलीस कर्मचा-यार निलंबनाची कारवाई होवून त्यास बडतर्फ करणे यासोबतच एलसीबीच्या नावाने अगदी एप्रिल महिण्यापर्यंत वसूली केलेल्या एजंटांनी यापुढे ‘हप्ता’ तर सोडाच पण “उसने पैसे” मागताना देखील दहा वेळ विचार करावा यासाठी उपाययोजना व त्याच स्वरूपाची कारवाई पोलीस विभागाकडून होणे सर्वसामांन्याना अपेक्षित आहे….
पुढील बातमीत:- (एजंटामार्फत वसूल केलेला हप्ता घेण्याची ‘एलसीबी’ च्या पोलीस कर्मचा-याची अफलातून शक्कल..!Comming Soon….

