ईतर

अहो आश्चर्यम..! विवाहित जोडप्यांचे लग्न लावणारा ‘तो’ अफलातून विवाह मेळावा पडसा येथे संपन्न…!

"600 खुर्च्यांवर बसले 784 वधूवर ; 392 जोडपी विवाहबद्ध झाल्याचा दावा ; मेळाव्याच्या बोगसगीरीला हेरून अनेक मान्यवरांनी उपस्थित राहण्याचे टाळले..!"

(महाराष्ट्र न्युज नेटवर्क)

 

 

 

 

 

(बाबाराव कंधारे)

दरवर्षीप्रमाणे विवाहित जोडप्यांचे लग्न लावणारा ‘तो’ अफलातून विवाह मेळावा माहूर तालुक्यातील पडसा येथे आज दि. २८ मे रोजी तालुक्यातील निवडक मान्यवरांच्या हास्यकल्लोळयुक्त उपस्थितीत पार पडला असून तब्बल 392 जोडप्यांना विवाहबद्ध करण्याचा जाहीर दावा करणा-या या विवाह मेळाव्याच्या बोगसगीरीला हेरून निमंत्रण पत्रिकेतील बहुतांश मान्यवरांनी मेळाव्याकडे पाठ नेमकी का फिरवली ? याबाबत अनेक प्रकारच्या चर्चा उपस्थितांच्या तोंडून ऐकावयास मिळाल्या.

 

    “किनवट माहूरचे माजी आमदार तथा कार्यसम्राट प्रदीप नाईक यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या अफलातून मेळाव्याचे उद्घाटन शिवसेनेच्या ठाकरे गटाचे ज्योतीबा खराटे यांनी केले. तर नांदेड जि. प. चे माजी उपाध्यक्ष समाधान जाधव यांच्यासह माहूर न.पं.चे नगराध्यक्ष फिरोज दोसानी, काँ. शंकर सिडाम, मनोज किर्तने, दत्तराव मोहिते, डॉ. बाबा डाखोरे, तसेच पडसा येथील महिला सरपंच रूक्मीनीबाई आरके आदी मान्यवर मंडळी विवाह मेळाव्याचे प्रत्यक्ष साक्षिदार म्हणून व्यासपीठावर विराजमान होते.!”

विशेषत: माहूर तालुक्यातील अत्यंत दुर्गम व मुख्य महामार्गापासून जवळपास ९ कि.मी. अंतरावर असलेल्या मौजे पडसा येथे नेहेमीप्रमाणे आज दि. २८ मे रोजी २७ वा सर्वधर्मीय व बौध्द विवाह मेळावा संपन्न झाला. सुरूवातीचे काही वर्ष केवळ बौध्द धर्मीय परिणय मेळाव्याच्या आयोजनातून पडसा येथील बौद्ध विवाह मेळाव्याला समाजबांधवांनी अक्षरश: डोक्यावर घेतले होते. परंतू शासनाला लुबाडण्याचे व धार्मिक विडंबनेचा नवा विक्रम करण्याच्या हेतूने ध्येयवेडे झालेल्या आयोजकांनी मागील काही वर्षांपासून बौध्द विवाह मेळाव्याचे सर्वधर्मीय व बौध्द विवाह मेळावा असे नामकरण केले. तेंव्हापासून मात्र या मेळाव्याला किंबहूना आयोजकांच्या वैभवाला “चार चाँद” लागले असून मागील वर्षाचा रेकॉर्ड तोडत यावर्षी तब्बल ३९२ जोडप्याचे लग्न या विवाह मेळाव्यात लावून दिल्याचे मेळाव्याच्या आयोजकाने जाहीर केले आहे.. त्यामुळे भारत सरकारने या विवाह मेळाव्याची स्वत:हून दखल घेवून आयोजकांना भारतातील सर्वोत्तम विवाह मेळाव्याचे मानकरी ठरवून जागतिक स्तरावरील विशेष पारितोषिकांसाठी भारत सरकारच्या वतीने नामांकन पाठवल्यास नवल वाटणार नाही.

 

नेहेमीप्रमाणे आजही (दि. २८ मे) रोजी पार पडलेल्या मेळाव्यात तब्बल ३९२ जोडपी विवाहबध्द करण्यात आल्याचा दावा आयोजकाने केला असून तब्बल १५० जोडपी ही बौध्द धर्मीय तर १५० जोडपी आंतरजातीय तर हिंदू धर्मीय ९२ जोडप्यांनी आंतरजातीय विवाह पार पडल्याचे जाहीर करण्यात आले.. एकूण ३९२ जोडपी विवाहबद्ध झाल्याचा दावा आयोजक मंडळी करीत असली तरी मंडपात ठेवलेल्या ६०० खुर्च्यांवर तब्बल ७८४ वधूवरांना आयोजकांनी नेमके कोणते समीकरण जुळवून बसविले असावे..? असो त्यातही बसलेल्या मंडळींमधील पहिल्यांदाच लग्न होणारे जोडपे किती..? याबाबत उपस्थितांनी अनुभवले असून बहुतांश जोडप्यांचे लग्न चालू वर्षात विविध ठिकाणी झाले असल्याची खात्रीलायक माहितीची समोर आली आहे.. त्यातही विशेष बाब म्हणजे एक जोडपे तर मागील तीन वर्षांपासून याच मेळाव्यात विवाहबद्ध होत असल्याची गंमतीदार माहिती पडसेकरांनी छातीठोकपणे दिली असून मागील तीन वर्षांपासून याच मेळाव्यात सलग तिन वर्ष विवाहबद्ध होत असलेला “ते” महाभाग वधूवर नेमके विवाहबध्द होण्यासाठी येतात..? की लग्नाचा वाढदिवस साजरा करायला..? याबाबत संपुर्ण पडसा गावात तुफान चर्चा रंगल्याचे दिसून आले. एकंदरीत एवढ्या प्रमाणात डोक्याचा खेळ करून शासनाला लुबाडण्यासाठी आयोजकांच्या या भन्नाट कल्पनेेेला दादच द्यावी लागेल..

 

“विशेष म्हणजे काही बोटावर मोजण्याइतपत अपवाद वगळले तर कुण्याही जोडप्यांची व-हाडी मंडळी नव्हती. तर काही अपवाद वगळता जवळपास सर्वच वधू वर चक्क मोटार सायकलवर आले होते. त्यातही धार्मिक विडंबनेचा कळस म्हणजे हिंदू धर्मीय विवाहासमयी एका भल्या मोठ्या ‘धोतर’ पानाला (आंतरपाठाला) धरणारे ‘मामाजी’ नेमके कोण..? याबाबत वर्णन न केलेलेच बरे.! यातील नवरीबाई गरोदर असल्याची बाब उपस्तितांनी हेरली.. तर काही नवरीबाईच्या सोबत त्यांंचे बाळसुध्दा होते…

कारण,
★ 1) विवाह मेळाव्यात विवाह करणा-या जोडप्यांना कन्यादान योजनेअंतर्गत २०,००० (विस हजार रूपये) मिळणार आहेत… त्यातील दहा हजार आयोजकाचे..

★ 2) विवाह करणा-या दोघांपैकी एक जर अपंग असेल तर वरील योजनेअंतर्गत ७०,०००/-₹ (सत्तर हजार रूपये)….त्यातील ३० हजार आयोजकाचे..

★ 3) व आंतरजातीय विवाह करणा-या जोडप्यांना २०,००० + ५०,००० + २,५०,०००/- असे एकूण तिन लक्ष विस हजार रूपये शासनाकडून प्राप्त होणार आहेत.. त्यातील तब्बल २ लाख आयोजकाचे असल्याचे काही नवरी नवरदेवांच्या सोबत आलेल्या मंडळीकडून ऐकावयास मिळाले. त्यामुळेच आंतरजातीय विवाह करणा-या बनावटी जोडप्यांची संख्या वाढली असून पेक्षाही मोठा मेळावा पुढील वर्षी घडवून आणण्याचा आयोजकाचा मानस असल्याचे गुपितही चव्हाट्यावर आले..

 

दरम्यान मेळाव्याच्या जाहिरात पत्रकावरील अटी व शर्थींचा विचार केल्यास एक महत्वपुर्ण अट आयोजकांनी दाखवली असून त्या अटीप्रमाणे सरपंच/पोलीस पाटील/नगरसेवक यापैकी दोघांची सही असलेले प्रथम विवाह असल्याचे प्रमाणपत्र आयोजकांनी प्रसिध्द केलेल्या जाहिरातबाजीत सांगीतले आहे. त्यामुळे गावात लग्न झालेल्या जोडप्यांना प्रथम विवाहाचे प्रमाणपत्र देणारी महाभाग मंडळीना भविष्यात निश्चितच अडचणीचा सामना करावा लागेल. हे जवळपास निश्चितच मानले जात आहे..

 

क्रमश: – पुढील बातमीत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close