ईतर
वाई बाजार दुर्घटनेेेतील ‘त्या’ दुस-याचाही मृत्यू…
"सकाळी साडेसहाच्या सुमारास प्राणज्योत मालवली..!!"

(महाराष्ट्र न्युज नेटवर्क)
वाई बाजार,
वाई बाजार दुर्घटनेतील काल मृत्यूमुखी पडलेल्या एकानंतर यवतमाळ येथे उपचार घेत असलेल्या व अत्यावस्थ असलेल्या ‘त्या’ दुस-याचाही मृत्यू झाला असून यामुळे संपुर्ण वाई बाजारवर शोककळा पसरली आहे..
काल दि. ३ रोजी वाई बाजार येथे सकाळी साडे अकराच्या सुमारास येथील ग्राम पंचायतीकडून सुरू असलेल्या नाली बांधकामावर मजूरांसह मिस्त्री नाली बांधकामाचे काम करीत होते. दरम्यान बाजूला लेवलींगचे काम करीत असलेल्या जेसीबी टायर काम सुरू असलेल्या तथा कच्ची असलेल्या भिंतीच्या काठावर आल्याने संपुर्ण जेसीबीचा भार त्या कच्च्या भिंतीवर पडल्याने.. त्यामुळे नालीची एकेरी भित कोसळली होती. त्यात संजय किशन मडावी वय ५० वर्षे, शुभम भिमराव पेंदोर वय २५, व सुमित सिताराम मरापे वय १९ तिघेही रा. कोलामखेडा वाई बाजार ता. माहूर हे तिघेही त्या भिंतीखाली दाबल्या गेेेले होते.. त्यात संजय किशन मडावी यांचा काल दि. ३ रोजीच करूण अंत झाला होता..
तर यवतमाळच्या शासकीय रूग्णालयात अत्यावस्थ अवस्थेत उपचार घेत असलेला शुभम भिमराव पेंदोर याचाही आज दि.४ रोजी पहाटे साडेसहाच्या सुमारास मृत्यू झाला असून दोन मृत्यूंमुळे संपुर्ण वाई बाजारवर शोककळा पसरली आहे…





