क्राइम

सायफळ ‘रोड रॉबरी’ प्रकरणाचा सिंदखेड पोलीसांकडून अवघ्या तिन दिवसात छडा….!!!

"विधीसंघर्षीत बालकासह ४ जण पोलीसांच्या ताब्यात;  दोन फरार..!"

(महाराष्ट्र न्युज नेटवर्क)

किनवट/माहूर

     बहुचर्चित बचतगट कर्मचा-याच्या मारहाण व लुट प्रकरणी अवघ्या तिन दिवसात प्रकरणाचा छडा लावताना सिंदखेड पोलीसांनी चमकदार कामगीरीचा प्रत्यय देत एका विधीसंघर्षीत बालकासह चार जणांना ताब्यात घेतले असून प्रकरणातील दोन आरोपी फरार असल्याने त्याचाही शोध सुरू असल्याचे सिंदखेड पोलीसांनी सांगीतले आहे..

    दि.३ एप्रिल रोजी माहूर तालुक्यातील मौजे सायफळ येेेेथून बचतगटाची मिटींग व त्यातून झालेली वसूली रक्कम घेवून बचतगट कर्मचारी प्रविण कवरे हे वाई बाजारकडे येत असताना वाटेतील गिट्टी खदानीपासून काही अंतरावर त्यांच्या डोळ्यात मिरचीची पुड टाकून त्यांच्यावर काठ्यांनी हल्ला चढवत त्यांच्याजवळी लाखोंची रक्कम अज्ञातांनी पळवली होती.. याप्रकरणी बचतगट कर्मचारी प्रविण एकनाथराव कवरे यांच्या फिर्यादीवरून सिंदखेड पोलीसांत अज्ञातांविरोधात कलम ३९४ भादवि. नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता..
 घटनेचे गांभिर्य ओळखूून सिंदखेड पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरिक्षक सुशांत किनगे यांनी व त्यांच्या टिमने चोहोबाजूनी तपास चालवत सायफळ येथील गुप्त खब-यांना अँक्टीव्ह केले.. दरम्यान मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार घटनेच्या दिवसांपासुनच गावातील एकजण कुठेतरी फरार असल्याची माहिती पोलीसांना मिळाली. त्यावेळी संशय बळावल्याने घटनेच्या दिवशी त्याच्यासोबत असलेल्या तरूणाला ताब्यात घेवून विचारपुस केल्यानंतर या संपुर्ण प्रकरणात एका विधिसंघर्षीत बालकासह सायफळ येथीलच रोहन दिनेश बनसोड वय (१८) आकाश विष्णू मुरखे (३०), समाधान दत्ता शेंडे (३१), करण वसंता शेंडे (१९), व फरार असलेले दोघे एकजणांसह ६ जणांचा समावेश असल्याचे निष्पन्न होवून ताब्यातील आरोपींनी गुन्हा कबूल केला असून दाखल झालेल्या कलमांत भादवि.चे कलम ३९५ ची वाढ करण्यात आली आहे. तर सिंदखेड पोलीस ताब्यातील सर्व आरोपींना आज दि. ६ रोजी न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने आरोपींनी तीन दिवसांची (सोमवार पर्यंत) पोलीस कोठडी ठोठावली असून यात इतरही काही गुन्ह्यांचा खुलासा होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे..
“विशेष म्हणजे या फिल्मीस्टाईल लूट प्रकरणात पोलीसांच्या ताब्यातील दोघे गिट्टी क्रेशर जवळून गावातून लोकेशन देणा-या दोघांच्या संपर्कात होते.. तर वापरण्यात आलेले लाकडी दांडके व मिरची पुड त्यांनी सोमवारीच घटनास्थळापासून काही अंतरावर ठेवले होते.. एवढेच नव्हे तर बचतगट कर्मचा-याला केंव्हा व कसे लुटायचे याबाबतही वरील सर्व आरोपींत तब्बल तीन बैठका झाल्या असल्याच्या चर्चेला आता पेव फुटले असून याप्रकरणी सिंदखेड पोलीसांनी उल्लेखनीय ‘कुरघोडी’ करत अवघ्या तीन दिवसांत प्रकरणाचा छडा लावून गौरवास्पद कामगीरी केल्याने सिंदखेड पोलीसांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.. 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close