माहूर ते सारखणी राष्ट्रीय महामार्गावर दुचाकीला भिषण अपघात ; युवकाचा जागीच मृत्यू….
"माहूर-सारखणी राष्ट्रीय महामार्गावर लिंबायत फाट्यानजीकची घटना"

(महाराष्ट्र न्युज नेटवर्क)
किनवट/माहूर
माहूर कडून सिंदखेडकडे जात असलेल्या दुचाकीस्वाराचा लिंबायत फाट्यानजीक रोडलगत असलेल्या किलोमीटरच्या दगडावर आदळून झालेल्या भिषण अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना काल दि. ४ रोजी रात्री साडे अकराच्या सुमारास घडली…
काल दि. ४ एप्रिल रोजी रात्री ११:३० वा. च्या सुमारास माहूर कडून आपल्या गावी सिंदखेड येथे मोटरसायकलवरून जात असलेल्या युवकाच्या डोळ्यावर समोरील वाहनाचा उजेड पडल्याने तोल जाऊन मोटरसायकल किलोमीटरच्या दगडावर आदळली. त्या युवकाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली…
पवन जयसिंग राठोड वय 27 राहणार सिंदखेड तालुका माहूर असे मृत्यूमुखी पडलेल्या युवकाचे नाव असून अत्यंत मनमिळाऊ स्वभावाचा असलेला पवन राठोड हा सर्वांच्या परिचयाचा होता. तर सिंदखेड येथील रहिवासी असलेल्या पवन चे वडील जयसिंग आंबू राठोड हे सेवानिवृत्त पोलीस अधिकारी आहेत.. पवन याचे लग्न झाले असून त्यास दोन मुली आहेत. नुकतेच त्याने माहूर तालुक्यातील वाईबाजार येथे हिरो शोरूम ची शाखा घेऊन कामाला सुरुवात केली होती.. त्यामुळे त्याचे माहूर सिंदखेड वाई बाजार येथे त्याचे नेहमीचेच येणे जाणे असायचे..
दरम्यान काल दिनांक 4 रोजी रात्री 11.20 वाजता माहूर शहरातील कामे आटोपून आपल्या घरी जाण्यासाठी एकटाच आपल्या बुलेट क्रमांक M H 26 B W 0202 ने निघाला असताना मौजे लिंबायत फाट्यानजीक राष्ट्रीय महामार्गावर समोरून येत असलेल्या वाहनाचा उजेड त्याचे डोळ्या वर पडल्याने त्याला समोरील काही दिसले नाही. त्यामुळे त्याचा तोल जाऊन त्याची दुचाकी रस्त्याच्या कडेला असलेल्या किलोमीटरच्या दगडावर आदळली.. त्यामुळे डोक्याला मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.. रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांनी पवन याला रस्त्यावर पडलेला दिसल्याने त्यांनी त्यास माहूरच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले…तेथे वैद्यकीय अधिकारी डॉ. पूजा पवार यांनी पवन याची तपासणी करून त्यास मृत घोषीत करून आज दि. 5 रोजी शवविच्छेदन केले…

