डायल 112 वर खोटी माहिती दिल्याप्रकरणी मेट येथील तरुणावर कारवाई….
"लोकसेवकास खोटी माहीती देवून दिशाभूल करण्याचा गुन्हा दाखल.."

(महाराष्ट्र न्युज नेटवर्क)
किनवट/माहूर
नागरीकांच्या समस्यांना तातडीने मदत व्हावी या उद्देशाने सुरू असलेल्या पोलीस विभागाशी संबंधित डायल 112 या हेल्पलाईन नंबरवर वारंवार खोटी माहीती देवून लोकसेवकांची दिशाभूल केल्याप्रकरणी मेट येथील एका तरूणावर माहूर पोलीसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून यामुळे सरकारी हेल्पलाईनला खेळ समजणा-या तरूण मंडळीत एकच खळबळ उडाली आहे…
पोलीस विभागाशी संबंधित महाराष्ट्र शासनाकडून नागरिकांच्या समस्यांचा तात्काळ निपटारा व्हावा यासाठी डायल 112 हा हेल्पलाइन नंबर शासनाने नागरीकांसाठी सुरू केला होता. परंतू माहूर तालुक्यातील मौजे मेट येथील आतिश भाऊराव मुनेश्वर वय ३५ वर्षे याने या हेल्पलाईन नंबरवर काल दि. २६ रोजी सायं. ०७: ०७ वा. च्या सुमारास वारंवार खोटी माहिती देत सतत पणे कॉल करून खोडसाळ पणे खोटी माहिती दिल्याचे समोर आले आहे… परिणामी पोलिसांना विनाकारण त्रास देणाऱ्या माहूर तालुक्यातील मौजे मेट येथील त्या तरुणाविरुद्ध माहूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे..
दरम्यान मेट येथील आतिश भाऊराव मुनेश्वर वय ३५ धंदा चालक या इसमाने डायल 112 वर वर वारंवार कॉल करून खोडसाळ पणे खोटी माहिती दिली कि, मौजे मेट येथे अवैध दारू विक्री चालू आहे… त्यावेळी सदर ठिकाणी पोलीस गेले असता तो इसम कॉल उचलत नव्हता. व नंतर त्याने मोबाईल बंद केला… त्यावेळी पोलीसांनी त्याचे घरी जाऊन दारू विक्री कुठे चालू आहे असा प्रश्न उपस्थित केल्यानंतर कॉलरने खोडसाळ पणे खोटी माहिती 112 वर कॉल करून दिल्याचे सांगितले. परिणामी खोडसाळ पणे लोकसेवकास त्रास होईल या उद्देशाने खोटी माहिती दिल्याने त्याचे विरुद्ध कलम 212 बि. एन. एस. प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे…

