नोकरी संदर्भईतर
मांडवी येथील कै.बळीराम पाटील ग्रामीण रुग्णालयाचा भोगळ कारभार चव्हाट्यावर…
"ग्रामीण रुग्णालय मांडवीचे कर्मचारी 'ऑन ड्युटी फुल टाइट.?'"

(महाराष्ट्र न्युज नेटवर्क)
मांडवी, प्रतिनिधी (इंद्रपाल कांबळे)
मांडवी येथील कै.बळीराम पाटील ग्रामीण रुग्णालयाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला असून ग्रामीण रुग्णालय मांडवीचे कर्मचारी ‘ऑन ड्युटी फुल टाइट अवस्थेत आपले कर्तव्य बजावत चक्क रूग्णांंच्या जिवित्वाशी खेळ करत असल्याचे वास्तव मांडवी ग्रामीण रूग्णालयात समोर आले आले…
दिवंगत नेते कै. उत्तम राठोड यांच्या स्वप्नातील मांडवी शहर घडवत असताना मांडवी गावाला शहराचा दर्जा निर्माण व्हावा या साठी मांडवी येथे ग्रामीण रुग्णालयाची निर्मिती करण्यात आलेली होती. जेणेकरून मांडवी परिसरातील बंजारा बहुल व आदिवासी समाजातील गरीब रूग्णांना यवतमाळ किंवा आदिलाबाद येथे जाण्याची गरज भासू नये…. चांगल्या आरोग्य सुविधा उपलब्ध करण्याची दूरदृष्टी दिवंगत नेेेेेेेेत्याची भावना होती.
दरम्यान कै. बळीराम पाटील ग्रामीण रुग्णालय मांडवी येथे कर्तव्यत असलेले डॉक्टर व कर्मचारी हे मदधुंद अवस्थेत असल्याचा व्हिडीओ सोशल मिडीयावर प्रचंड वायरल होत असून येथील डॉक्टर व कर्मचारी रुग्णालयालात रूग्णांना योग्य सेवा देत नसल्याची गंभीर बाब समोर आली आहे.. दरम्यान खंबाळा येथील एका रुग्णाला येथे दाखल केल्यानंतर येथील डॉक्टर मद्यधुंद अवस्थेत असल्याने रूग्णाच्या नातेवाईकांनी डॉक्टरांना चांगलेच धारेवर धरून व्हिडिओ क्लिप तयार केली.. ही क्लिप प्रचंड वायरल होत असून मांडवीच्या ग्रामीण रूग्णालयाच्या अब्रूची लक्तरे अक्षरश: वेशीवर टांगत आहे….
विशेषत: येेथे उपचार घेण्यासाठी महिला व बालके नेहमी असतात. त्यामुळे दारू पिऊन कामावर हजर असलेले कर्मचारी यांच्यावर वैद्यकीय अधिका-यांचा दबाव नाही.. परिणामी कर्मचारी दारू पिऊन फुल टाईट होऊन कर्मचारी हे रुग्णालयामध्ये ऑन ड्युटी बिगर आयडीचे काम करीत असताना व्हिडिओ प्रसारित झालेला आहे… डॉ. सतीश असे नाव आहे तर दुसरे कर्मचारी केंद्रे हे दारू पिऊन कामावर हजर होते. दवाखान्यात उपचार घेण्यासाठी आलेले नातेवाईक किशोर खंदारे यांना मागित दोन तासापासून ताटकळत ठेण्यात आले. व तसेच उपचार घेण्यासाठी आलेले रुग्णांना रेफर करून आपली जबाबदारी संपली असे वागतात हे नेहमीचे झाले आहे. त्यामुळे या बाबीची गंभीर दखल घेऊन वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी यांनी या कर्मचाऱ्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी व जनकल्याण रुग्ण समितीचे सदस्यांनी या बाबीची गंभीर दखल घेऊन परिसरातील रुग्णांना व रुग्णांच्या नातेवाईकांना योग्य ते सहयोग व सहकार्य करण्याची कर्मचाऱ्यांना समज देण्यात यावी अशी मागणी होत आहे….

