सामाजिक

किनवट माहूर तालुक्यात अतिवृष्टीने झालेल्या पीक नुकसान भरपाई साठी सरसकट आर्थिक मदत द्या….

"भरपाईसह अनुषांगिक बाबींवर उपायोजना करण्याबाबत आ. केराम यांचे मुख्यमंत्र्यांना साकडे.."

(महाराष्ट्र न्युज नेटवर्क)

किनवट/माहूर

    किनवट- माहूर तालुक्यात किनवट माहूर तालुक्यात होत असलेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभुमिवर शेतक-यांना नुकसान भरपाई साठी सरसकट आर्थिक मदत देेेवून नुकसान भरपाईसह इतरही अनुषांगिक बाबींवर उपायोजना करण्याबाबत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आ. केराम यांनी लेखी निवेदनाद्वारे मागणी केली असून अतिवृष्टीने झालेल्या नुकसान भरपाईसाठी तातडीने तरतूद करण्याची मागणी केली आहे…

   राज्यात अतिवृष्टीने थैमान घातले असतानाच दि. १५ व १६ ऑगस्ट रोजी किनवट तालुक्यातील 6 महसूल मंडळात तर माहूर तालुक्यातील 1 महसूल मंडळात प्रचंड अतिवृष्टी झाली.  याच काळात ईसापुर धरणातील पाण्याचा विसर्ग करण्यात आल्यामुळे भयंकर अशी पूर परिस्थिती निर्माण होऊन नदी व नाला लगतच्या शेतजमीनी पूर्णतः खरडून गेल्या आहेत. परिणामी शेतातील पिकांचे शंभर टक्के नुकसान झालेले आहे. तर नागरी वस्त्यांमध्ये पुराचे पाणी शिरून अनेक कुटुंबे बाधित झाली असून कच्ची घरे पडली.. त्यामध्ये संसार उपयोगी साहित्यासह अन्नधान्याचे ही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले… दरम्यान अनेक पाळीव जनावरे पुराच्या पाण्यात वाहून गेली. एवढेच नव्हे तर किनवट मध्ये एका स्कूल बस चालकासोबत एकास प्राण गमवावा लागला असून एक जन गंभीर जखमी आहे.. माहूर तालुक्यातील अतिवृष्टीने पिक नुकसान झालेल्या बाधीत शेतकरी संख्या- अंदाजे 16327 असून अंदाजे 17283 हे. आर. जमीनीवरील पिके खरडून नष्ट झाली आहेत. तर घरात पाणी जाऊन नुकसान झालेल्या बाधित घरांची संख्या 76 इतकी असून एक दुधाळ जनावर वाहून गेल्याची प्राथमिक माहिती आहे. 
त्याचप्रमाणे किनवट तालुक्यात बाधित शेतकन्यांची संख्या 44356 इतकी असून कापूस 31510 हे.आर., सोयाबीन 15560 हे. आर., ज्वारी 60, मका 1205, तूर 4032, मुग 113, उडीद 110, फळपिके 154 हेक्टरवर इतके पीक नुकसान झाले आहे. जीवितहानी मध्ये एका स्कूल बस चालकाचा पुराच्या पाण्यात मृत्यू झाला असून अनेक गुरे ढोरे वाहून गेलीत..  यासह नदी नाल्यांना आलेल्या पुरामुळे अनेक ठिकाणचे पूल, रस्ते वाहून गेले असून रस्त्यांची अवस्था अवघड झाली आहे. यामुळे खचल्ले रस्ते, पुल तातडीने दुरुस्त करून धोकादायक ठिकाणी संरक्षण भिंत बांधण्याची गरज असल्याचे निवेदनात समाविष्ट आहे…
 “माहूर किनवट तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना नकसान भरपाईसाठी विशेष अनुदानाची तरतूद करावी व नागरी वस्तीतील बाधित झालेल्या कुटुंबांना तातडीने आर्थिक मदत देण्यासाठी विशेष निधीची तरतूद करण्याची लेखी  विनंती आ. भिमरावजी केराम यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे….

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close