नोकरी संदर्भसामाजिक

किनवट-माहूर तालुक्यातील अधिकारी व तांत्रीक विज कर्मचारी पदे तातडीने भरा…

"खोळंबलेला विज वितरणचा कारभार सुरळीत होण्यासाठी आ. भिमरावजी केराम यांची मागणी"

(महाराष्ट्र न्युज नेटवर्क)

किनवट/माहूर

  किनवट व माहूर तालुक्यातील विजेचा लपंडाव व खोळंबलेली प्रलंबित कामे तसेच विद्युत पुरवठा सुरळीत होण्यासाठी अधिकारी व तांत्रीक विज कर्मचा-यांची रिक्त पदे तातडीने भरण्याची मागणी आ. केराम यांनी महावितरणच्या मुख्य अभियंत्यांकडे केली आहे….

 आ. भिमरावजी केराम यांनी मुख्य अभियंता महाराष्ट्र राज्य विद्युत महावितरण, नांदेड यांना दि. १९ जुन रोजी दिलेल्या पत्रानुसार किनवट व माहूर येथे महावितरणचे दोन उपविभाग असून येथील उपकार्यकारी अभियंता असे दोन्ही पदे रिक्त आहेत. परिणामी विद्युत विषयक कामे खोळंबून सुरळीत विज पुरवठा होत नसल्याने नागरिकांसह शेतक-यांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत आहे.. तर किनवट/माहूर हा आदिवासी बहूल भाग असून जबाबदार अधिकारी नसल्याने विभागाच्या कर्मचाऱ्यांवर नियंत्रण नाही. परिणामी ग्रामीण भागात ४ ते ५ दिवस विज पुरवठा होत नसल्याचे वास्तव असल्याच्या नागरीकांकडून तक्रारी येत आहेत… त्यामुळे ऐन पावसाळ्याचे दिवस असल्याने ग्रामीण भागात नियमीत विजसेवा मिळणे अत्यंत गरजेचे आहे…
“किनवट व माहूर या दोन्ही उपविभागातील उपकार्यकारी अभियंता, सहाय्यक अभियंता व तांत्रीक कर्मचाऱ्यांची रिक्त असलेली पदे या सर्व पदांचा अनुशेष तातडीने भरून काढण्याची मागणी आ. भिमरावजी केराम यांनी मुख्य अभियंता महाराष्ट्र राज्य विद्युत महावितरण कडे लेखी पत्र देवून केली आहे….

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close