क्राइम

दरोड्याच्या तयारीत असलेले ‘चिखली’ (मु.) येथील सहा जण शस्त्रांसह अटकेत ; चार दिवसाची पोलीस कोठडी

"सारखणी येथे पहाटे ३ वाजता सिंदखेड पोलिसांची कारवाई..."

(महाराष्ट्र न्युज नेटवर्क)

 

 

 

 

 

किनवट/माहूर

दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या किनवट तालुक्यातील मुलतान चिखली येथील सहा संशयितांना सिंदखेड पोलिसांनी सारखणी येथूून पहाटे ३ वाजताच्या सुमारास अटक केली असून या कारवाईत लोखंडी सुरी, टॉमी, सांडस व इतर नोकदार हत्यारे जप्त करण्यात आले आहेत. याप्रकरणी अटक संशयितांना चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे..

 

दि. १९ जून रोजीच्या मध्यरात्रीनंतर भल्या पहाटे ३ वा. च्या सुमारास सिंदखेड पोलीसांची गस्त सुरू असताना सारखणी येथील मांडवी रोडवर काळ्या-पिवळ्या रंगाची ऑटोरिक्षा संशयास्पदरित्या गस्तीच्या पथकाला आढळून आली. त्यावेळी पोलीसांनी ती ऑटोरिक्षा थांबवून तपासणी केली असता त्यात किनवट तालुक्यातील मुलतान चिखली येथील शेख फारुख शेख कुरबान वय ३५, शेख पाशा शेख हमजा वय ३२, शेख अजीम शेख अवनक वय ३५, शेख गुलफाम शेख शौकत वय २३, शेख अफ्रीदी शेख जैरोदीन वय २५ तसेच शेख जलाल शेख शौकत वय २४ असे सहा जण घातक शस्त्रांसह दबा धरून बसलेले पोलीसांना आढळले. त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांच्याकडून पाच लोखंडी सुरी, एक नोकदार टॉमी, एक सांडस (पक्कड) आणि सहा नोकदार हत्यारे जप्त करण्यात आल्याचे पोलीस प्रशासनाकडून जाहीर केले आहे..

    याप्रकरणी सिंदखेड पोलीस ठाण्यात गु.र.नं. ८८/२०२५, कलम ३१०(४) व ४(२५) भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे.. तर अटक आरोपींना चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली असून पुढील तपास सिंदखेड पोलीसांकडून सुरू आहे. या कारवाईस पोलीस अधीक्षक अविनाश कुमार (आयपीएस), अपर पोलीस अधीक्षक सूरज गुरव, खंडेराव धरणे, तसेच उपविभागीय अधिकारी रामकृष्ण मळघणे यांच्या मार्गदर्शनाखाली सिंदखेड पोलीस ठाण्याचे स.पो.नि. रमेश जाधवर यांच्यासह पो.हे.कॉ. गजानन कुमरे, चालक गोविंद कदम, पो.ना. सतीश कोंडापलकुलवार, रघुनाथ मडावी, पो.कॉ. प्रफुल्ल पवार, संदीप वानखेडे, संजय शेंडे, रविकांत कांबळे, शाम चव्हाण, ज्ञानेश्वर वेलदोडे यांनी संयुक्तपणे ही कारवाई केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close