माहूर शहरात रानडुकरांचा मुक्त संचार; वनविभागाचे दुर्लक्ष…
"मुख्य रस्त्यापासून अवघ्या ८० फुट अंतरावर रानडुकरांच्या वास्तव्याने नागरीकांत भितीचे वातावरण"

(महाराष्ट्र न्युज नेटवर्क)
किनवट/माहूर
माहूर शहरात मुख्य रस्त्यापासून अवघ्या ८० फुट अंतरावर रानडुकरांचा कळप मागील बारा दिवसांपासून वास्तव्यास असल्याने नागरीकांत प्रचंड भितीचे वातावरण पसरले असून सदरची बाब माहूर वनविभाच्या लक्षात आणून दिल्यानंतरही वनविभागाचे कर्मचारी याकडे दुर्लक्ष करीत असल्यामुळे नागरीकांत वनविभागाप्रती रोष व्यक्त होत आहे…
माहूर शहरातील मुख्य रस्त्यापासून अवघ्या ७० ते ८० फुट अंतरावर असलेल्या वार्ड क्रमांक एक, गट क्रमांक 197, शेवाळे कॉम्प्लेक्स च्या पाठीमागे, पोद्दार इंग्लिश स्कूलच्या लागून पाठीमागे शेवाळे ले-आउट येथे रानडुकरां चा कळप पिलावळासह मागील बारा दिवसांपासून वास्तव्य करून असल्याची घबराटदायक बाब समोर आली असून त्यामुळे स्थानिक नागरीक प्रचंड भयभित आहेत…. दरम्यान रानडुकरांच्या कळपात तीन मोठे रानडुकरासह एक मादी व तीचे तब्बल 10 पिल्ले वास्तव्य करून राहत असल्याची माहीती स्थानिक नागरींनी सांगीतली आहे… सोबतच या घटनेचे व्हिडीओ देखील समाजमाध्यमांवर फिरत असून परिसरातील झाडी जास्त प्रमाणात वाढाल्याने त्या अडचणीचा आश्रय घेण्यासाठी सदरचा कळप याठिकाणी आश्रयास असल्याचे सांगण्यात येत आहे….
विशेष म्हणजे रानडुकरांचा कळप याठिकाणी वास्तव्य करून राहत असल्याची माहीती माहूर वनविभागाला देवून सुद्धा माहूर वनविभागाने अद्याप काहीही उपाययोजना केल्या नसल्याची ओरड स्थानिक नागरीकांकडून होत असून वनविभागाच्या कर्मचा-यांना रानडुकरांची भिती तर वाटत नसेल ना..? असाही मनोरंजनात्मक सवाल नागरीकांकडून उपस्थित केला जात आहे..
“मागील दहा ते बारा दिवसांपासून वास्तव्यास असलेल्या रानडुकरांच्या कळपाचा वनविभागाने तातडीने बंदोबस्त करावा.. तसेच सदर रानडुकरांचा कळप येथून हद्दपार केल्यानंतर माहूर नगर पंचायतीने देखील यावर गांभीर्य दाखवत वाढलेली झाडी झुडूपांना तोडून घेवून परिसर भयमुक्त करावा अशी माफक अपेक्षा स्थानिक नागरींकडून व्यक्त केली जात आहे….

