Uncategorized
अँट्रोसिटी व विनयभंग अशा गंभीर गुन्ह्याचे दोषारोपपत्र सिंदखेड पोलीसांकडून केवळ १५ तासात दाखल…..
"अत्यंत जलद तपास करून आरोपपत्र दाखल करण्याचा सिंदखेड पोलीसांचा विक्रम..!"

(महाराष्ट्र न्युज नेटवर्क)
किनवट/माहूर
अँट्रोसिटी व विनयभग अशा गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्याचा अत्यंत जलद गतीने तपास करून अवघ्या १५ तासात न्यायालयात आरोपपत्र दाखल करून जलद तपासाचा विक्रम सिंदखेड पोलीसांनी केला असून सिंदखेड पोलीसांच्या या कामगीरीचे कौतुक होत आहे…
काल दि. २५ जून रोजी माहूर तालुक्यातील मौजे आष्टा येथील एका ४२ वर्षीय महिलेने सिंदखेड पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार गु.र.नं. ९५/२०२५, कलम 74, 78 (1), भारतीय न्याय संहिता २०२३ सहकलम 3 (1) (w), (i) (ii), 3 (2), (va) अनु जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याप्रमाणे सय्यद जावेद सय्यद रजाक वय २६ रा. अनमाळ ता. माहूर याच्यावर गुन्हा दाखल होवून आरोपीस सिंदखेड पोलीसांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली ताब्यात घेतले होते. दरम्यान वरिष्ठांच्या मदतीने सदर गुन्ह्याचा तपास चोवीस तासाच्या आत म्हणजेच अवघ्या १५ तासात पुर्ण करून दोषारोपासह आरोपीला न्यायालयासमोर उभे करून १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीची मागणी केेेली…
सदर गुन्ह्यातील उत्कृष्ठ कामगीरी पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार यांचेसह भोकरचे अपर पोलीस अधिक्षक खंडेराय धरणे तसेच अपर पोलीस अधिक्षक सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी रामकृष्ण मळघणे, सिंदखेडचे सहाय्यक पोलीस निरिक्षक रमेश जाधवर व त्यांच्या टिमने केली असून अँट्रोसिटी व विनयभंग अशा गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्याचा तपास पुर्ण करून दोषारोपपत्र केवळ १५ तासात न्यायालयात दाखल करण्याचा बहुधा हा विक्रमच असल्याचे सांगण्यात येत आहे… त्यामुळे सिंदखेड पोलीसांच्या या कामगीरीवर सर्वसामान्यांतून समाधान व्यक्त होत असून पोलीस प्रशासनाच्या जलद कामगीरीचे सर्वत्र कौतुक केले जात आहे….

