Uncategorized

एटीएम’ मधून पैसे काढून देतो म्हणणारा भामटा चक्क ‘एटीएम’ घेवून पसार..”

दखल घेण्यास बँक व पोलीसांची टोलवा-टोलवी"

 

Bk महाराष्ट्र न्युज नेटवर्क..

 

(आखाडा बाळापूर जिल्हा हिंगोली)

 

 

★ “आखाडा बाळापूर येथील घटना..!”

★ “तब्बल दोन महिण्यांपासून पिडीत मारतोय दोन बँक व पोलीस ठाण्याच्या चकरा…

आखाडा बाळापूर,

एटीएम धारकाच्या अज्ञानतेचा फायदा घेवून एटीएम मधून पैसे काढून देतो म्हणून एटीएम घेणारा भामटा चक्क एटीएम घेवून पसार झाला असून एटीएमची पिन माहिती झाल्याने विविध ठिकाणाहून पिडीताच्या खात्यावरील तब्बल साडे पंचेचाळीस हजार रूपये उचल केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तर पिडीताने तब्बल दोन महिने चकरा मारल्यानंतर अखेर बाळापूर पोलीसांनीही अखेर गुन्हा दाखल न करता संबंधिताची तक्रार घेतली आहे.

हिगोली जिल्ह्यातील व कळमनुरी तालुक्यातील मौजे सिंदगी येथील दादाराव किसनराव खंदारे हे दि. १४ फेब्रुवारी रोजी मुलाने त्यांच्या खात्यावर टाकलेले पैसे उचलणययासाठी गेले होते. तथापि उचल करणारी रक्कम कमी असल्याने ती रक्कम बाहेर असलेल्या एटीएम मधून उचलावी असे कामकटाळ्या बँक कर्मचा-यांनी शिक्षणाचा गंधही नसलेल्या दादाराव खंदारे यांना सांगीतल्यानंतर खंदारे हे पुरते गोंधळून गेले. दरम्यान एटीएम मध्ये जावून आपल्या अल्पबुध्दीने पैसे काढण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत असताना एक भामटा पुर्वीपासूनच तिथे उभा होता. त्यावेळी मी पैसे काढून देतो असे म्हणत त्या भामट्याने खंदारे यांच्याकडील एटीएम आपल्याकडे घेवून एटीएम मशीनमध्ये टाकले. त्यावेळी एटीएमचा पिन जाणून घेण्यासाठी त्या भामट्याने सलग दोन वेळा खंदारे यांना एटीएमचा पिनही टाकायला सांगीतले. दरम्यान तुमच्या खात्यावर पैसेच नाहीत असे सांगत बँकेत जावून लाईनला लागा व काऊंटरला चेक करा असा फुकटचा सल्लाही दादाराव खंदारे यांना दिला. व त्याच्याकडे असलेले “चेतन महादेव भानावत” असे नाव असलेले एटीएम कार्ड गडबडीत खंदारे यांच्या हातात देवून मला अर्जंट काम आहे… मी जातो असे सांगून तिथून तो पसार झाला..

दरम्यान खंदारे हे पुन्हा बँकेत जावून तथा लाईनला लागून काऊँटर पर्यंत जाण्यास बराच वेळ झाला होता. एवढ्या वेळेत एटीएम चोरटा खंदारे यांच्या एटीएम कार्डसह त्यांच्याकडून पिन जाणून घेण्यातही यशस्वी झाल्याने बँकेसमोर असलेल्या गजानन कॉम्प्युटर येथील बँकेच्या ग्राहक सेवा केद्रावरून दुपारी 2 वाजून 11 मिनिटानी अनुक्रमे 8000 व 400 असे आठ हजार चारशे रूपये उचलून तेथून पसार झाला…

ही बाब दादाराव खंदारे यांच्या लक्षात आल्यानंतर दि. २१ फेब्रुवारी २०२२ रोजी ते भारतीय स्टेट बँकेच्या आखाडा बाळापूरच्या शाखेत जाऊन ‘तो’ भामटा घेवून गेलेले एटीएम कार्ड त्वरीत ब्लॉक (बंद) करा असा अर्ज देण्यासाठी बँकेतही गेले होते. त्यावेळी त्यांचा अर्ज हस्तलिखित असल्याचे कारण दाखवून बँक प्रशासनाने त्यांना विहित नमुन्यातील बँकेत उपलब्ध असलेला फॉर्म भरून देण्यास सांगितल्यानंतर खंदारे यांनी त्या नमुन्यातील अर्जही भरून बँकेच्या काऊंटर वर भरून दिला. त्यावेळी काऊंटरवर असलेल्या बँक कर्मचा-याने १० मिनिटांचा वेळ घेवून अखेर खंदारे यांना तुमचे एटीएम कार्ड बंद झाले अशी अधिकृत माहिती दिल्यानंतर खंदारे हे परत गावाकडे निघून गेले.

परंतू, दादाराव खंदारे यांची ‘साडेसाती’ इथेच संपली नाही तर अजून नव्या संकटाची वाट मोकळी करून गेली… वास्तविक पाहता काऊंटर वर बसलेल्या ‘तो’ बँक कर्मचारी खंदारे यांना खोटे बोलला होता.. खंदारे यांचे एटीएम कार्ड बंद झालेले नसतानाच “तुमचे एटीएम कार्ड बंद झाले” असे सांगल्याने पिडीत व्यक्तीही निश्चिंत झाला.

दरम्यान पळवलेल्या एटीेम कार्डवरच्या खात्यावर अजून काही रक्कम जमा झाली का..? हे पाहण्यासाठी सदर भामट्याने दि.२२ व २३ फेब्रुवारी रोजी युनियन बँक ऑफ इंडीयाच्या शाखेसह महागाव येथे सलग चार वेळा खात्यावरील बँलेंस तपासले. तर दि.२३ फेब्रुवारी रोजी गोकुंदा व पुन्हा महागाव येथे खात्यावरील बँलेंस तपासले… त्यानंतर दि. ७ मार्च पर्यंत अनेकवेळा सदरचा भामटा विविध ठिकाणच्या एटीएमसह बँकांच्या ग्राहक सेवा केंद्रांवर खंदारे यांच्या खात्यावरील बँलेंस तपासत असल्याचे बँक स्टेटमेंटवरून दिलून आले आहे.
दरम्यान एटीेएम कार्ड बंद झाले असा समज झाल्याने बचत गटाकडून मिळणारी ३७७८० रूपयाची रक्कम खंदारे यांच्या खात्यावर दि. ७ मार्च २०२२ रोजी पुन्हा जमा झाली. जमा झालेल्या रकमेतून खंदारे यांनी बोल्डा येथून १ हजार रूपयाची उचल करून बाकीची सर्व रक्कम मुलीच्या लग्नासाठी तशीच जमा ठेवली..
परंतू दि.३० मार्च रोजी 9500, 500 व 10000/₹ असे सदर भामट्याने एकाच दिवशी विविध ठिकाणच्या एटीएम व ग्राहक सेवा केंद्रांवरून उचलले… दि. ३० मार्च रोजी युनियन बँक ऑफ इंडीयाच्या केंद्रातून 10023/-₹ उचल करून पुन्हा ३१ मार्च रोजी पुन्हा युनियन बँक ऑफ इंडीयाच्या केंद्रावरून खात्यावरील रक्कम तपासली..
खात्यावर अजून रक्कम शिल्लक असल्याने विदर्भातील पुसद येथून दि.१ एप्रिल रोजी अनुक्रमे 4000, 2500 व 200 रूपये असे सहा हजार सातशे रूपये उचल करून दि. ४, ५, ६ व ७ एप्रिल रोजी त्या भामट्याने विविध ठिकाणच्या एटीएम तसेच ग्राहक सेवा केंद्रावरून बँलेस तपासले आहे…

विशेष म्हणजे सदर भामट्याने दिलेल्या एटीएम कार्डबाबत अधिकची माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला असता सदरचे एटीेएम कार्ड चेतन महादेव भानावत रा. वर्षानगर गोविंदनगर जवळ पुसद या माहितीसह त्याने केलेल्या विविध ठिकाणच्या ट्राझिक्शनसची माहिती उपलब्ध असूनही दादाराव खंदारे यांना बँक प्रशासन व पोलीस प्रशासन तब्बल दोन महिण्यांपासून टोलवाटोलवी करत असून यामुळे खंदारे हे अत्यंत मानसिक तणावात वावरत आहेत. त्यामुळे पुन्हा दि. १८ एप्रिल रोजी काही सुजान मंडळींच्या सहकार्याने खंदारे बँक प्रशासनासमोर गेल्याने तात्पुरती ‘बला’ टाळण्यासाठी बँक प्रशासनाने पोलीस ठाणे बाळापूरला एक लेखी पत्र देवून संबंधितांता शोध घेण्याची विनंती केली. तर पोलीस ठाण्यानेही सदर प्रकरणात गुन्हा दाखल न करता केवळ औपचारिकता म्हणून तक्रार दाखल करून घेतली…. व तपास पो.हे.काँ.नागोराव बाभळे यांच्याकडे वळता केला….

परंतू एवढे सारे पुरावे जवळ असताना आखाडा बाळापुर पोलीस या प्रकरणाचा नि:स्वार्थपणे तपास करेल की नाही याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत असून अगदी काही दिवसांपुर्वी येथील एटीएम फोडल्याप्रकरणी सर्वप्रकारचे सिसीटीव्ही फुटेज उपलब्ध असतानाही त्या प्रकरणाचे आरोपी अद्यापही आ.बाळापूर पोलीस पकडू न शकल्यामुळे थेट पोलीसांच्या कार्यप्रणालीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत..त्यामुळे सदर प्रकरणी आखाडा बाळापूर पोलीसांनी निप:क्षपणे या प्रकरणाचा तपास करून सदर भामट्याला गजाआड करावे व त्यांची लाटलेली रक्कम परत मिळवून द्यावी अशी माफक आशा आ.बाळापूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरिक्षक पि.सी. बोडमपोड यांच्याकडे खंदारे हे अद्यापही बाळगून असून पोलीस अधिक्षक हिंगोली यांनी स्वत: लक्ष घालून प्रकरणात हस्तक्षेप करावा व मला न्याय द्यावा या भुमिकेत पिडीत दादाराव खंदारे हे आहेत….

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close