Uncategorizedईतरनोकरी संदर्भ
विशेष पोलीस उपमहानिरिक्षक शहाजी उमाप यांच्या हस्ते वाई बाजार येथे ‘पोलीस मदत’ केंद्राचे उद्घाटन…
'वाई बाजार येथे नवीन पोलीस ठाणे निर्मितीसाठी ग्रामस्थांच्या वतीने उमाप यांना साकडे."

(महाराष्ट्र न्युज नेटवर्क)

किनवट/माहूर
विशेष पोलीस उपमहानिरिक्षक शहाजी उमाप यांच्या हस्ते वाई बाजार येथे आज दि. २९ रोजी दु. चार वाजता पोलीस मदत केंद्राचे उद्घटन मोठ्या थाटात करण्यात आले असून तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेली वाई बाजार येथील अवैध व्यवसायासह वाढत्या गुन्हेगारीवर देखील यामुळे निश्चितच आळा बसेल अशी भावना ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे…

सिंदखेड पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरिक्षक रमेश जाधवर यांच्या दुरदृष्टीतील संकल्पनेतून वाई बाजार येथील वाढती गुन्हेगारी व बोकाळलेल्या अवैध व्यवसायांवर अंकुश लावण्याच्या उद्देशाने येथील पोलीस विभागाच्या मालकीच्या जागेत व्यापारी बांधवांच्या सहकार्याने पोलीस चौकी तथा पोलीस मदत केंद्र उभारण्याचा संकल्प अगदी काही दिवसांपुर्वी केला होता. तो संकल्प आज दि. २९ मार्च रोजी प्रत्यक्षात उतरला असून नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस उपमहानिरिक्षक शहाजी उमाप यांच्या हस्ते आज दुपारी चार वाजता येथील पोलीस मदत केंद्राचे उद्घाटन करण्यात आले…

यावेळी भोकरचे अप्पर पोलीस अधिक्षक खंडेराव धरणे, माहूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी रामकृष्ण मळघणे तसेच परिक्षाविधीन पोलीस अधिक्षक किरण पोपळपट यांच्यासह अनेक पत्रकार बांधव व मान्यवरांची उपस्थिती होती… यावेळी ग्रामस्थांच्या वतीने उमाप यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.. दरम्यान सिंदखेड व माहूर पोलीस ठाण्याची भौगोलीक परिस्थिती व वाढता व्याप लक्षात घेवून दोन्हीच्या मध्यभागी असलेल्या वाई बाजार येथे तालुक्यात तिसरे व नव्याने पोलीस ठाणे मंजूर करण्याची मागणी ग्रामस्थांच्या वतीने राजकीय पुढा-यांनी केली..
नांदेड जिल्ह्यातील सर्वात आडपेठेला असलेल्या सिंदखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीत नव्वद च्या दशकात नक्षलवादी विजयकुमारने आपल्या गुन्हेगारीचे थैमान घातले होते. त्यावेळी पोलीस ठाणे निर्मितीच्या उद्देशाने वाई बाजार येथे पोलीस विभागाकडून जागाही घेण्यात आली होती. दरम्यान नक्षलवादी विजयकुमार याचा खात्मा झाल्याने वाई बाजारच्या पोलीस स्टेशनचा प्रश्न तसाच प्रलंबित आहे…. तो प्रश्न निकाली काढण्याची मागणी विशेष पोलीस उपमहानिरिक्षक शहाजी उमाप यांच्याकडे ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली..
यावेळी सिंदखेड पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरिक्षक रमेश जाधवर यांच्या मार्गदर्शनाखाली पो. हे. काँ. गजानन कुमरे, जी. आर. कदम, पो काँ. संजय शेंडे, संघरत्न सोनसळे, गोपनीय शाखेचे प्रफुल्ल पवार, तसेच पो.काँ. अंकुश इंगळे, स्वप्नील नरवाडे, रविकांत कांबळे तसेच होमगार्ड किरण दौडीकर, डी.पी. सुर्यवंशी, आर. एस. कनाके, बी. एफ. जुनगरे, पुरूषोत्तम नेवारे, महेश कोटूरवार आदींनी चोख बंदोबस्त ठेवला…

