मा. प्रशांत भाऊ राठोड यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा…
"नातलग व मित्रपरिवाराकडून शुभेच्छांचा वर्षाव..!"

(महाराष्ट्र न्युज नेटवर्क)
किनवट/माहूर
सामाजिक बांधिलकीचा वसा अंगीकारूत गोरगरीबांना सढळ हाताने मदत करणा-या प्रशांत भाऊ राठोड यांचा वाढदिवस आज मोठ्या उत्साहात साजरा असून नातलग व मित्रपरिवाराच्या अलोट गर्दीने अक्षरश: शुभेच्छांचा वर्षाव केला…
‘सेवा संकल्प प्रतिष्ठान“ तर्फे किनवट व माहूर तालुक्यात गरीब,गरजू,विद्यार्थ्यांना मदत, अनाथ मुलींचे विवाह, साधु-संतांची सेवा, पीडित-पूरग्रस्त-आपतग्रस्तांना मदत, मुक्या जनावरांची सेवा अशा एक ना अनेक बाबींतून सर्वव्यापी व सामाजिक बांधिलकीचा वसा जपत उदात्त हेतूने कार्य करणारे मंत्रालयातील अधिकारी प्रशांत भाऊ राठोड यांचा वाढदिवस दिनांक १९ जुलै रोजी त्यांच्या मित्र परिवारांनी माहूर तालुक्यातील त्यांच्या मूळ गावी मौजे पालाईगुडा येथे संपूर्ण कुटुंबासमवेत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी अनेक मान्यवरांनी त्यांना उदंड आयुष्यासाठी भरभरून शुभेच्छा दिल्या.. सोबतच नातलग व मित्रपरिवाराकडून अक्षरश: शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला.. दरम्यान वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आज दि. १९ रोजीच्या सकाळपासूनच पालाईगुडा येथे मित्र मंडळ, परिवार, सर्वपक्षीय कार्यकर्ते, माहुर व किनवट तालुक्यातील त्यांच्या चाहत्यांनी गर्दी केली होती. त्यानंतर किनवट येथे एन के गार्डन येथे सुद्धा त्यांच्या चाहत्यांनी व सर्व पक्ष कार्यकर्त्यांनी सुद्धा त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मोठी गर्दी केली होती. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी प्रशांत भाऊ मित्र मंडळ परिवाराने अथक परिश्रम घेतले…
यावेळी त्यांनी वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देणाऱ्या सर्वपक्षीय नेते, कार्यकर्ते, पदाधिकारी, अधिकारी, पत्रकार, नागरिक, महिला तसेच कार्यक्रमाचे आयोजन करणाऱ्या मित्र परिवाराचे मनःपूर्वक आभार प्रशांत भाऊ राठोड यांनी मानले….

