क्राइम
माहूर शहरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड….
"15,630 रुपये हस्तगत; नऊ जणांना घेतले ताब्यात"

(महाराष्ट्र न्युज नेटवर्क)
किनवट/माहूर
माहूर शहरात अगदी मधोमध सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर माहूर पोलिसांनी धाडसी कारवाई करत छापा टाकून यात जुगाराच्या साहित्यासह 15,630 रुपये हस्तगत केले असून तब्बल नऊ जणांना घेतले ताब्यात घेतले असल्याची माहीती पोलीसांकडून देण्यात आली आहे…
माहूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अवैध रित्या दारू विक्री आणि मटका जुगार अड्ड्यांवर माहिती मिळताच धाडी टाकून कार्यवाही करत असतानाच माहूर शहरातील बौद्ध पुरा परिसरात एका घराच्या आवारात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर धाड टाकून नऊ जणांना ताब्यात घेऊन 15500 रुपयांच्या जुगार खेळण्याच्या साहित्यसह मुद्देमाल जप्त केल्याची घटना दि 28 रोजी दुपारी 5.30 वाजता घडल्याने खळबळ उडाली आहे..
पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप व पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांच्या अवैध व्यवसाया विरुद्ध मोहिमेची काटेकोर पणे अंमलबजावणी तसेच इतर अवैध धंद्याविरुद्ध खुल्या मोहीम सुरू करून अवैध व्यवसाय करणाऱ्यात खळबळ उडवलेली असताना काही मुजोर माफियाकडून अवैधरित्या दारू विक्री सुरू होती त्यामुळे अनेक ठिकाणी धाडी टाकत असतानाच अवैधरित्या जुगार अड्डे सुरू असल्याची माहिती मिळाल्याने आठवडाभरात दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत..
दरम्यान काल दि. २८ रोजी सायं साडेपाचच्या सुमारास माहूर शहरातील अर्जुन बरडे यांचे घरासमोरील अंगणात वार्ड क्रमांक 03 माहूर येथे सार्वजनिक ठिकाणी विनापरवाना झन्ना मन्ना नावाचा जुगार खेळत व खेळवीत असताना नगदी 15630 रुपये व जुगाराचे साहित्यासह मिळून आले… त्यानुसार माहूर पोलीस ठाण्यात गु.र.नं. 130/2025 कलम 12 (अ) मजुका प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून गजानन देविदास जाधव वय 38 वर्ष व्यवसाय नोकरी पो.काँ. /1106 पोस्ट माहूर यांच्या फिर्यादीवरून संजय पांडुरंग गुरनुले वय 40 वार्ड क्रं 01, नितीन बध्दु राठोड वय 30 वर्ष व्य. शेती रा. वार्ड क्र. 4 माहुर, शेख जमीक शे. मज्जीद वय 50 वर्ष व्य.मजुरी रा. वार्ड क्र. 4 माहूर, शेख रशीद शेख गफार वय 25 वर्षे व्य.मजुरी रा. वार्ड क्र.16 माहूर, रहीम चांद खाटीक वय 45 वर्षे व्य.मजुरी रा. वार्ड क्रमांक 9 माहूर, सतीश प्रभाकर लिगदे वय 52 वर्ष व्य. शेती रा.ब्राह्मण गल्ली माहूर, वैभव शंकर लाड वय 32 वर्ष व्य. शेती रा. वार्ड क्र. 11 माहूर, मुसा बाबामिया सय्यद वय 39 वर्ष व्य. व्यापार रा. वार्ड क्र.9 तसेच अदनान बेग चंदू बेग वय 25 वार्ड 15 माहूर आदींवर गुन्हा दाखल करून पोलीसांनी ताब्यात घेवून नोटीस दिल्याचे सांगण्यात आले आहे…
प्रकरणाचा तपास पो.नी. गणेश कराड यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉ. चौधरी हे करीत आहेत..या कार्यवाहीत पोलीस निरीक्षक गणेश कराड यांच्यासह सपोनी पालसिंग ब्राह्मण, सपोनी संदीप अन्येबोईनवाड, पोहेकाँ गजानन चौधरी, पोहेकाँ. प्रकाश गेडाम, पोहेकाँ कैलास जाधव,सदर पवन राऊत, ज्ञानेश्वर खंदाडे, चालक जाधव यांनी कामगिरी बजावली…

