Uncategorizedईतर

अवैध रेती वाहतूक प्रकरणी किनवटच्या उपविभागीय अधिका-यांचा अफलातून आदेश….!

"जप्त केले ट्रँक्टर, आदेश मात्र हायवा टिप्परचा ; आदेशाविरूध्द जिल्हाधिका-यांकडे अपील"

(महाराष्ट्र न्युज नेटवर्क)

( बाबाराव कंधारे )

  अवैध रेती वाहतूक प्रकरणात माहूर तालुक्यातील पडसा येथून जप्त केलेल्या एका ट्रँक्टर प्रकरणी उपविभागीय दंडाधिका-यांचा अफलातून आदेश निघाला असून जप्त केलेल्या ट्रँक्टर ऐवजी चक्क हायवा टिप्पर व नंबरही वेगळा असल्याच्या या आदेशाने महसुल प्रशासनाच्या विश्वासार्हतेवरच थेट प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत…
   माहूर तालुक्यातील मौजे पडसा येथे तलाठी काळे यांनी दि. २६ एप्रिल २०२२ रोजी शेख जावेद शेख जलील यांच्या मालकीचे ट्रँक्टर क्र. MH 29 BC 6140 हे एका रेतीच्या ढिगाजवळ पलटी झालेेेेेल्या अवस्थेत दिसून आल्याने त्यावर अवैध रेती वाहतुकीचा ठपका ठेवून ते जप्त करून ट्रँक्टर तहसील कार्यालय माहूर येथे घेवून चालण्यास संबंधित मालकास भाग पाडले. 
   याउलट शे. जावेद यांच्या म्हणण्यानुसार त्याच्याकडे त्यावेळी दि. २६ एप्रिल रोजीचा वाहतुक परवाना (रॉयल्टी) अनु क्र. ५०२ eTP NO. ३९७०६१७ ची रॉयल्टी पावतीही दाखवली असल्याचे सांगतात व रॉयल्टी दाखवतात… सदरची रॉयल्टी खरी का खोटी..?  तसेच या कारवाई मागे नेमके गुपित काय..? हा संशोधनाचा भाग असला तरी उपविभागीय दंडाधिकारी किनवट यांच्या कार्यालयाचा आदेश जा. क्र. 2022-/गौ.ख./अवैध वाहतूक/दंडात्मक आदेश/कावि- दि. ३१ मे २०२२ च्या लेखी आदेशाद्वारे महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 चे कलम 48 पोटकलम (7) आणि कलम (8) (1) संदर्भ क्र. 2 मधील सुधारणांच्या अनुषंगाने सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी किनवट यांनी अत्यंत दुर्मिळ व अफलातून असलेल्या आदेशात शे. जावेद शे. जलील यांच्या ट्रँक्टरऐवजी शे. जावेद यांना हायवा टिप्परचे मालक घोषित केले आहे. तर MH29 BC 5148 असाही नंबर त्या टिप्परला दिला आहे…
      विशेषत: आदेशात नमूद केलेले हायवा टिप्पर व जप्त केलेल्या ट्रँक्टचा कुठेही मेळ बसत नसून ट्रँक्टर चा नंबर MH29 BC 6140 च्या जागी आदेशात नमूद केलेला MH29 BC 5148 अशा केवळ नंबरची अफरातफर झाली असे थोड्या वेळापुरते ग्राह्य धरले तरी ट्रँक्टरचे रूपांतर हायवा टिप्परमध्ये होणे …. आणि ते देखील आदेशात..? ही बाब नक्कीच विचार करण्यास भाग पाडणारी आहे…
  “एकीकडे दिवसरात्र अवैध रेतीची बिनदिक्कतपणे वाहतूक सुरू असताना सदरची कारवाई झाली असलेल्या पडसा चौफुली या ठिकाणावरून अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या पडसा गावातील हजारो ब्रासचे रेतीसाठे तलाठी महोदयांना दिसले नाहीत का..? की दुस-याच कारणासाठी सदर ट्रँक्टरवर केलेली थातूरमातूर कारवाई केवळ जनतेच्या डोळ्यांत धुळफेक करण्यासाठी करण्यात आली…? ट्रँक्टर चालकाला देण्यात आलेली रॉयल्टी पावती त्याने घरी छापली का..? बोगस पावत्या देणा-यांच्या रँकेटमध्ये महसूूल विभागातील काही व्हाईटकॉलर चोरांचा समावेश तर नाही ना..?  याबाबतच्या अनेक प्रश्नांना आता पेव फुटू लागले असून सदरच्या अफलातून आदेशाविरोधात मा. जिल्हाधिकारी यांचे न्यायदालनात विधिज्ञांमार्फत उचित पुराव्यासह शे. जावेद यांनी अपिल दाखल केले आहे. व प्रकरण देखील सुरू होणार आहे. त्यामुळे लवकरच या प्रकरणाची सत्यता बाहेर येवून केलेली कारवाई खरी की दुस-याच काही कारणासाठी..? हे देखील सर्वांसमोर निश्चितपणे येणार आहे… 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close