रेशनच्या तांदळाचा काळाबाजार करणा-या तांदुळ तस्कराकडून चक्क रेशन दुकानासमोरच पत्रकारास जिवे मारण्याची धमकी….
"सिंदखेड पोलीसांत गुन्हा दाखल ; पत्रकार संघटना आक्रमक ; रेशच्या तांदळाची तस्करी करणारे संपुर्ण रॅकेट उजेडात आणनार"

(महाराष्ट्र न्युज नेटवर्क)
किनवट/माहूर
रेशनच्या तांदळाचा काळाबाजार करण्यासाठी चक्क रेशन दुकानाशेजारी ऑटो लावून गोरगरीब लाभार्थ्यांकडून कवडीमोल किमतीत रेशनचा गहू व तांदुळ खरेदी करत असतानाच्या प्रकाराचा फोटो का काढला म्हणत तांदूळ तस्कराने पत्रकारास आज दि. २२ रोजी जिवे मारण्याची धमकी दिली असून याप्रकरणी सिंदखेड पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे…
गोरगरीबांच्या उदरपोषणासाठी शासनाकडून मोफत मिळणा-या रेशनच्या गहू व तांदळाची तस्करी संपुर्ण माहूर तालुक्यातून होत असल्याच्या बातम्या मागील काही दिवसापुर्वी अनेक माध्यमांवर प्रकाशित झाल्या होत्या… तथापि, पावसाळ्याच्या पार्श्वभुमिवर जून, जुलै व ऑगस्ट या तीन महिण्यांचे रेशन चालू महिण्यातच लाभार्थ्यांना वितरीत करण्यात येत आहे.. याच बाबीचा लाभ उठवण्यासाठी आज दि. २२ जून रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास येथील व्यसनाच्या आहारी गेलेल्या गोरगरीब लाभार्थ्यांना थोड्या व नगदी पैशाचे आमिष दाखवत वाई बाजार येथील एक तांदूळ तस्कर येथील चक्क रेशन दुकानाच्या शेजारी तीनचाकी मालवाहक ऑटो लावून रेशनचा माल कवडीमोल दरात खरेदी करत असल्याची बाब आमच्या लक्षात आली… यावेळी सर्व बाबीची खातरजमा केल्यानंतर या प्रकाराचा फोटो काढल्यानंतर चिडून जाऊन त्या तांदूळ तस्काराने माध्यम प्रतिनिधीच्या गाडीसमोर येवून अडवण्याचा प्रयत्न केला… दरम्यान “ऑटो का फोटू बातमी में आने कू नहीं होना..अगर आया तो टंगड्या तो तोडूंगाही.. जान से मार दूँगा…!” अशा शब्दात पत्रकारास धमकी दिली….
या प्रकरणी सिंदेेड पोलीस ठाण्यात संबंधित तांदुळतस्करावर गु.र.नं. १६७/२५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेमुळे माहूर तालुक्यातील पत्रकार संघटना आक्रमक होवून उद्या दि. २३ रोजी तहसीलदार माहूर यांच्यासह सहाय्यक जिल्हाधिकारी किनवट, जिल्हाधिकारी नांदेड तसेच थेट राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणविस यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केवळ निषेध व संबंधितांवर कडक कारवाईच नव्हे तर माहूर व किनवट तालुक्यातील रेशनच्या मालाचा काळाबाजार करणा-या कार्यरत रॅकेटमधील सर्वांवर गुन्हे दाखल करावेत अशी मागणी करणार आहेत..
“विशेष म्हणजे अगदी काही दिवसांपुर्वी… “रेशनच्या तांदळाचा काळाबाजार करणा-यांकडून एलसीबी च्या नावाने वसूली ; रेशनचा तांदुळ किनवट तालुक्यातील घोटीपर्यंत पोहोचवण्याची हमी..” या मथळ्याखाली आमच्या वृत्तवाहीनीसह अनेक वृत्तपत्रांतून वृत्त प्रकाशित झाले होते.. त्या वृत्तातील ‘त्या’ प्रकाराला आज घडलेल्या प्रकाराने एकप्रकारे पुष्टीच मिळाली असून चक्क रेशन दुकानदाराला चकमा देत थेट रेशन दुकानाशेजारी व्यसनाच्या आहारी गेलेल्या गरीब लाभार्थ्यांच्या मुलाबाळाच्या तोंडचा घास हिरावणा-या या तस्करांवर कठोरात कठोर कारवाई होणे अत्यंत गरजेचे आहे.. त्यामुळे केवळ पुरवठा विभागानेच नव्हे तर जिल्हा पोलीस प्रशासनाने देखील या प्रकरणी माहूूर व किनवट तालुक्यात कार्यरत असलेल्या रेशनच्या गहू, तांदूळ तस्करांचा शोध घेवून कठोर कार्यवाही करावी अशी मागणी सर्वसामान्यांतून होत आहे….

