एसबीआय ७० व्या स्थापना दिनानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन….
सर्व नागरिकांनी रक्तदान शिबिरात भाग घेण्याचे शाखा व्यवस्थापक कमलेश कुमार यांचे आवाहन

(महाराष्ट्र न्युज नेटवर्क)
श्रीक्षेत्र माहूर….
भारतीय स्टेट बँकेच्या 70 व्या स्थापना दिनानिमित्त माहूर शाखेत दि. 13 जून रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आल्याने सर्व ग्राहक आणि शहरवासीयांसह तालुक्यातील नागरिकांनी या रक्तदान शिबिरात भाग घेऊन रक्तदान शिबिर यशस्वी करण्याचे आवाहन माहूर एसबीआय शाखेचे शाखा व्यवस्थापक कमलेश कुमार यांनी केले आहे…
भारतीय स्टेट बँक देशभरात स्थापना दिवसानिमित्त विविध उपक्रम राबवित असते. त्या अंतर्गत यावर्षी माहूर शाखेच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. रक्तदान शिबिर सकाळी दहा ते दुपारी चार वाजेपर्यंत चालणार असून सर्व ग्राहक आणि त्यांच्या कुटुंबीयांनी तसेच सर्व नागरिकांनी या शिबिरात भाग घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे… विशेष म्हणजे रक्तदान करणाऱ्यांना दोन प्रकारच्या भेटवस्तू आणि प्रशंसा पत्र देण्यात येणार असल्याचे माहूरचे शाखा व्यवस्थापक कमलेश कुमार यांनी सांगितले…
“रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान असून पावसाळ्याचे दिवस असल्याने रक्तदान करणाऱ्यांना कुठलाही त्रास जाणवणार नसल्याने या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असून एसबीआयच्या सर्वच ग्राहकांनी तालुक्यातील सर्व नागरिकांना या रक्तदान शिबिरात भाग घेऊन एसबीआय बँकेचा 70 वा स्थापना दिवस सर्वश्रेष्ठ दान करून साजरा करावा असे आवाहनही करण्यात आले आहे… रक्तदान शिबीर यशस्वी व्हावे यासाठी शाखा व्यवस्थापक कमलेश कुमार यांच्यासह बँकेतील अधिकारी व कर्मचारी परिश्रम घेत आहेत….

