(महाराष्ट्र न्युज नेटवर्क)
किनवट/माहूर
सार्वजनिक ठिकाणी असलेली विहीर बुजवण्याच्या उद्देशाने झाडाच्या फांद्या व मुरूम टाकून बुजवण्याचा प्रयत्न करीत असल्याचा धक्कादायक प्रकार पडसा येथे होत असल्याची तक्रार दाखल करण्यात आली असून वादीचे पाणी बंद व्हावे यासाठी जाणिवपुर्वक विहीर बुजवण्याचा प्रयत्न करीत असलेल्या समाजकंटकांवर लेखी तक्रारीद्वारे कारवाईची मागणी करण्यात आली आहे..
माहूर तालुक्यातील बहुचर्चित पडसा येथील रस्ता प्रकरणात आणखी एक उघड सत्य समोर आले असून वादीवरील दबाव वाढावा तसेच तो त्रस्त व्हावा यासाठी सार्वजनिक चौकात असलेल्या सार्वजनीक विहीरीत झाडांच्या फांद्या व माती मुरुम टाकुन बुजवण्याचा प्रयत्न होत असल्याचा दक्कादायक प्रकार तक्रारदार वसंता नागोराव भगत यांनी जिल्हाधिका-यांना दिलेल्या लेखी तक्रारीतून उघडकीस आणला आहे. यामुळे बहुचर्चित पडसा प्रकरणात प्रतिवादींकडून वादीवर लादल्या जात असलेल्या अतिरेकी कारवायांची ही एक दुसरी बाजू असल्याचेच दिसून येत आहे…
दरम्यान वसंता नागोराव भगत रा. पडसा ता.माहूर जि.नांदेड यांच्या लेखी तक्रारीनुसार सन 1963-64 मध्ये पडसा गावाचे पुनर्वसन झाले असून पुनर्वसनानंतर त्यांच्या घरासमोरील मोकळ्या व
सार्वजनीक जागेत ग्रामस्थांना पाण्याच्या सुविधेसाठी शासनामार्फत विहीर खोदण्यात आली होती. तेव्हा पासुन पुर्वजासह आजवर त्यांचे कुटूंब व परीसरातील अनेक कुटूंब या विहीरीवरुनच पाणी भरतात. आजही या विहीरीला मुबलक पाणी साठा असुन वादीसह परीसरातील अनेक कुटूंबाच्या पाण्याचा मुख्य स्त्रोत विहीर हाच आहे.. परंतू दिखाऊ धार्मीकता व द्वेशभावनेच्या नावाखाली या सार्वजनिक चौकाला अनाधिकृत रित्या ताब्यात घेवुन त्यावर अतिक्रमण करण्यात आले. एवढेच नव्हे तर शासकीय निधीचा गैरवापर करीत या खुल्या व सार्वजनीक चौकाला जोर जबरदस्तीने संरक्षण भिंतीच्या नावाखाली बंदीस्त करण्यात आले. यामुळे या परीसरात पाण्याचा मुख्य स्त्रोत असलेली सार्वजनीक विहीर व बाजुलाच असलेली पाण्याची टाकी देखील बंदीस्त करण्यात आली…
“विशेष म्हणजे समाजाच्या नावाखाली सार्वजनीक मोकळी जागा ताब्यात घेेेेवून तेथे असलेल्या सार्वजनीक विहीरीचा अडसर दुर करण्यासाठी काहीसमाज कंटकांकडुन सातत्याने विहीर बुजवण्याचे प्रयत्न केले जात असुन आजही मुबलकप्रमाणात पाणी असलेल्या सार्वजनीक विहीरीला बुजवण्यासाठी दि.25 जुलै 2024 रोजी येथील काही इसमांनी परीसरातील पिंपळ वृक्षासह इतरही झाडे अनाधिकृत रित्या तोडुन त्या मोडलेल्या झांडांच्या फांद्याचा विस्तार विहीरीत टाकला असल्याची लेखी तक्रार जिल्हाधिकारी नांदेड यांच्यासह सहाय्यक जिल्हाधिकारी किनवट, तहसिलदार माहुर, गट विकास अधिकारी पंचायत समिती माहुर तसेच ग्रामसेवक ग्राम पंचायत पडसा यांच्याकडे देवून भगत यांनी समाजकंटकांवर कारवाईची मागणी केली आहे. यावर प्रशासन काय कारवाई करते हा सध्यातरी चर्चेचा विषय बनला आहे….