नोकरी संदर्भईतर

पडसा येथील “त्या” वादग्रस्त प्रकरणी माहूर तहसीलदारांना न्यायालयाची कारणे दाखवा नोटीस…. ; ग्रामसेविकेसह तलाठी व मंडळ अधिका-यांनाही प्रकरण भोवणार…

"अंमलबजावणीचे आदेश असताना प्रतिवादींसमवेत बसून निघून गेल्याने न्यायालयात वादीचा शपथपत्रासह अवमान अर्ज"

(महाराष्ट्र न्युज नेटवर्क)

 

 

किनवट/माहूर

   पडसा येथील “त्या” वादग्रस्त प्रकरणी न्ययालयाच्या आदेशाची अंमलबजावणी न करता पंचनामा करून परतीचा मार्ग धरणा-या महसूल कर्मचा-यांची अतिहुशारी माहूर तहसीलदारांना अंगलट आली असून न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजाणी न कल्याने माहूरच्या तहसीलदाराला न्यायालयाने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. तर वादीचा रस्ता मोकळा करून देण्याच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी गेलेल्या महसूली कर्मचा-यांनी चक्क प्रकरणातील प्रतिवादींच्या मनमर्जीप्रमाणे काहींचे जबाब लिहून घेवून स्वत:ची बुद्धी चालवल्यानेे पडसाच्या ग्रामसेविकेसह तलाठी व मंडळ अधिका-यांनाही प्रकरण भोवणार असल्याची दाट शक्याता वर्तवण्यात येत आहे…

 

 

माहूर तालुक्यातील मौजे पडसा येथील बहुचर्चित प्रकरणात वैयक्तिक वादातून एका गावपुढा-याकडून वसंता नागोराव भगत यांच्या घराचा रस्ता बंद करण्याचे कटकारस्थान केले होते.. त्यात घराबाहेर पडण्यासाठी वसंता भगत यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांना चक्क भिंतीवरून उड्या मारून ये-जा करण्याची दुर्दैवी वेळ समाजानेच लादल्याच्या व्यथा त्यांनी न्यायालयासमोर मांडून दिवाणी दावा क्र. आर.सी.एस. 289/2024 यात न्यायालयाचा मनाई हूकूम मिळविला होता.. दरम्यान न्यायव्यवस्थेने भगत यांच्या बाजूनेे मनाई हूकूम पारीत केल्यानंतर दि. २४ जुलै रोजी चिडून गावातील ‘त्या’ पुढा-यासह गावातील काही महिला व पुरूषांनी न्यायालयाचा स्थगिती आदेशाचा अवमान करत भगत यांच्या घराबाहेर पडण्याच्या मार्गात भिंतीचे बांधकाम केले होते. त्यावर नांदेड न्यायालयात अवमान याचिका क्र. 1297/2024 नुसार अवमान याचिका यापुर्वीच दाखल केली असून न्यायालयीन आदेशाचा अवमान करणा-या तब्बल 57 जणांनी 12 सप्टेंबर रोजी न्यायालयात हजर राहून म्हणने सादर करण्याचे बजावले आहे… दरम्यान वादीच्या घराबाहेर पडण्याच्याा मार्गात केलेले बांधकाम पाडूून रस्ता खुला करून देण्याच्या न्यायालयाच्या आदेशाचे पालन करण्याचे आदेश नांदेड न्यायालयाने माहूर तहसिलदारांना दि. २२ ऑगस्ट रोजी दिले होते. तर घटना स्थळावर कायदा व सुव्यवस्था सांभाळण्यासाठी सिंदखेड पोलीसांनाही आदेशित करण्यात आले होते.

तथापि न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करून त्याचा अनुपालन अहवाल 2 दिवसात सादर करण्याचे लेखी पत्र मंडळ अधिकारी माहूर व तलाठी सज्जा मुरली यांचे नावाने तहसीलदार माहूर यांनी दि. २६ ऑगस्ट रोजी निर्गमित करून त्याची प्रत वादीला दिली होती… त्यानुसार ४ सप्टेंबर रोजी मंडळ अधिकारी व तलाठी महोदय जायमोक्यावर न्यायालयीन आदेशाची अंमलबजाणीसाठी पोलीस ताफ्यासह आलेही होते. परंतू आदेशाचेे पालन करण्याऐवजी चक्क प्रतिवादींच्या गराड्यात बसून तेथे जबाब लिहून घेवून न्यायालयीन आदेशाचे संशोधन करीत बसले…तद्नंतर वादीला…”येतो….” म्हणून परत गेले….ही बाब न्यायालयाचा घोर अवमान करणारी ठरली असून केलेले बांधकाम पाडून रस्ता खुला करण्याचे आदेश असताना तेथील फोटो काढून थेट प्रतिवादींसोबत बसून काहींचे जबाब लिहून घेवून केलाला संपुर्ण प्रताप वसंता भगत यांनी काल दि. ६ सप्टेंबर रोजी फोटोसह शपथपत्र व अवमान अर्ज न्यायालयात सादर केल्यानंतर न्यायालयाने निशानी क्र. ५८ खाली तहसिलदार माहूर यांना कारणे दाखवा नोटीस बजावली असून दिलेल्या आदेशाचे पालन का केले नाही..? याबाबतचा खुलासा सादर करण्याचे आदेश पारीत केले आहेत… यामुळे प्रकरण आता नको त्या उचापती करणा-या कर्मचा-यांच्याही अंगलट येणार हे जवळपास निश्चित मानले जात आहे…

 

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close