चुलत भावाचा खून करून फरार झालेला ‘तो’ आरोपी तब्बल आठ महिन्यानंंतर पोलीसांच्या हाती…
"तेलंगणातील संगारेड्डी जिल्ह्यातील मणिपूर येथूून अटक"

(महाराष्ट्र न्युज नेटवर्क)
श्रीक्षेत्र माहूर
माहूर तालुक्याील मौजे रूई येथे शेतीच्या वादातून ख्ख्या चुलत भावाचा खून करून फरार झालेला ‘तो’ आरोपी तब्बल आठ महिन्यानंंतर पोलीसांच्या हाती लागला असून तेलंगणातील संगारेड्डी जिल्ह्यातील मणिपूर येथूून सदर आरोपीला स्थानिक पोलीसांच्या मदतीने पकडण्यात आले आहे..
दि. ८ ऑगस्ट २०२४ रोजी माहूर तालुक्यातील मौजे रुई येथे शेतीच्या वादातून दोन भावांनी मिळून देशमुख कुटुंबातील सख्या चुलत भावाचा खून केल्याची घटना घडली होती. त्यावेळी दोघांपैकी राहील देशमुख या आरोपीला पोलीसांनी तात्काळ अटक केली होती.. तर त्यातील दुसरा आरोपी सोहेल बबलू देशमुख हा फरार झाला होता.. दरम्यान माहूर पोलीसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे लपून बसलेल्या सोहेल देशमुख यास दि. 2 रोजी तेलंगणातील संगारेड्डी जिल्हा मणिपूर येथून स्थानिक पोलिसांच्या मदतीने अटक केली असून या कारवाईत माहूर पोलीस ठाण्याचे प्रभारी सहायक पोलीस निरिक्षक शिवप्रकाश मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरिक्षक संदीप अनेबोईनवाड यांच्यासह जमादार प्रकाश गेडाम, पो. काँ. डी. डी. खंडाळे यांनी मोलाची कामगिरी बजावली….

