क्राइम

‘एलसीबी’ च्या नावाखाली असाही प्रताप..! रेतीवाहतुकदारांकडून ट्रॅक्टर साठी ५ तर टिप्पर साठी १० हजार रू. चा म्हणे वाहतूक चार्ज..?

"एलसीबी"च्या नावाखाली नदीकाठच्या गावांतील 50 ते 75 वाळू वाहतूकदारांकरून मागील काही दिवसांपर्यंत लाखोंची वसूली.."

(महाराष्ट्र न्युज नेटवर्क)
(बाबाराव कंधारे)

  किनवट/माहूर

  ‘एलसीबी’ अर्थात ‘स्थानिक गुन्हे शाखा’ या नावाखाली तालुक्यातील खाजगी एजंटांमार्फत अवैध व्यवसायिकांकडून होत असलेल्या तगड्या वसूलीचे नवनवीन चुटकूले आता दिवसागणिक समोर येत असून अवैध धंद्यांची खात्रीशीर माहीती असलेल्या या शाखेच्या नावाने वैध व अवैध रेती वाहतुकदारांशी थेट संपर्क करून नदीकाठच्या गावांतून वाळूची वाहतुक करणा-या तब्बल 50 ते 75 ट्रॅक्टर व टिप्पर चालकांकडून अगदी मागील (मे) महिण्यापर्यंत माया गोळा केल्याचे धक्कादायक वास्तव नाव न सांगण्याच्या अटीवर रेती वाहतुकदारांकडून उजागर झाले आहे… 

माहूर तालुक्यातील काही रेती वाहतुकदारांसोबत झालेल्या प्रत्यक्ष चर्चेतून समोर आलेल्या धक्कादायक बाबीनुसार तसेच वृत्तांकनात नाव न येवू देण्याच्या अटीवर दिलेल्या माहितीनुसार माहूर तालुक्यातील कुपटीपासून ते रईपर्यंत तसेच नेरपासून ते थेट उनकेश्वरपर्यंत नदीक्षेत्रातील गावात वाळूची वाहतुक करणारे जवळपास शंभर ते सव्वाशे ट्रॅक्टर तर जवळपास चाळीस ते पन्नास टिप्पर असून आजमितीस बहुतांश ठिकाणचे रेतीघाट प्रशासनाने खोदले असले तरी….”साठे करा..! जप्त करून घ्या..!अन् लिवाव करून पावत्या घ्या..!!! या रेती वाहतुकदारांच्या जुन्या व अनोख्या फंड्यानुसार आजही नदीकाठच्या गावात 50 ते 75 ट्रॅक्टर व टिप्पर महसूल प्रशासनाच्या हुकलेल्या वेळेत सुरू असल्याची खात्रीलायक माहिती आहे.. यासाठी महिण्याकाठी प्रती ट्रॅक्टर ५ हजार रू. तर टिप्परसाटी १० हजार रूपये नियमितपणे अगदी ‘मागच्या महिण्यापर्यंत वसूल केले असल्याचे रेती वाहतुकदाराकडून सांगण्यात आले आहे… तथापि,  नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरिक्षक शहाजी उमाप यांनी पदभार स्विकारल्यानंतर जिल्ह्यातील बहुतांश ठिकाणच्या अवैध धंद्यांवर कमालीचा अंकूश लागून राजरोसपणे चालणारे अवैध धंदे पडद्याआड गेले असल्याचे ‘गढूळ वास्तव’ समोर असले तरी अनेक ठिकाणी पडद्याआड सर्वकाही अलबेल अशीच काहीशी परिस्थिती होती… हे आजच्या परिस्थितीवरून कुणीही नाकारू शकत नाही…
 “विशेष म्हणजे संपुर्ण जिल्ह्यात अवैध धंदे बंद असताना ‘एलसीबी’च्या एका कर्मचा-याने खाजगी एजंटासोबत तालुकाभ्रमण करताना अवैध व्यावसायीकांच्या प्रत्यक्ष भेटी घेतल्याचे धक्कादायक वास्तव माहितीस्त्रोतांकडून समजले आहे. तर “तुम्ही चालू द्या आम्ही आहोत….!!” असा सल्लाही अवैध व्यावसायीकांना त्याच कर्मचा-याने देेेवून गेल्याचेही एका व्यावसायीकाने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले आहे.. त्यामुळे अत्यंत ‘संवेदनशील’ व ‘क्लिष्ट’ गुन्ह्यांचा तपास करण्यात माहीर असलेल्या ‘एलसीबी’ अर्थात “स्थानिक गुन्हे शाखेला” ‘तो’ कर्मचारी नेमका कोण..? याचे गुपीत उकलण्यासाठी फारसे अवघड जाणार नाही.. असे गृहीत धरून मागील एक वर्षांपासूनचे संबंधित एलसीबीच्या संबंधित पोलीस कर्मचा-याच्या मोबाईलचे लोकेशन व कॉल डिटेल्स तपासल्यास यामागचे खरे सुत्रधार कोण..?  याचे गुपित निश्चितच समोर येईल अशी जनभावना आहे..  त्यामुळे खाजगी एजंटांच्या खांद्यावर बंदूक ठेवून चालवणारा “तो” एलसीबीचा पोलीस कर्मचारी कोण..? याचा पोलीस विभागाने तातडीने शोध घेवून संबंधितावर कार्यवाही केली “तरच” एलसीबी अर्थात ‘स्थानिक गुन्हे शाखा’ या महत्वपुर्ण व अत्यंत जबाबदार पोलीस शाखेवर जनतेचा विश्वास बसेल…! अन्यथा नाही..!!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close