(महाराष्ट्र न्युज नेटवर्क)
नांदेड, प्रतिनिधी
नांदेड जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करून सरसकट हेक्टरी 50.000 (पन्नास हजार) रुपये शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यास संलग्न असलेल्या बँक खात्यामध्ये जमा करण्याची मागणी मनसे जिल्हाध्यक्ष रवी राठोड यांनी केली असून याबाबतचे निवेदन मुख्यमंत्र्यासह जिल्हाधिकारी नांदेड यांना देण्यात आले आहे…
मागील दोन दिवसांपासून जिल्ह्यात मुसळधार व अतिवृष्टीसदृष्य धो धो पाऊस पडत असून 1 सप्टेंबर 2024 रोजी माननीय जिल्हाधिकारी यांच्याकडे जिल्ह्यातील अतिवृष्टीच्या अहवालप्राप्तीनुसार किनवट, माहूर, हदगाव, हिमायतनगर तालुक्यातील एकूण 26 महसुली मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाल्याचे जिल्हा माहिती व प्रसारण च्या माध्यमातून चित्रफितीद्वारे नोंदविण्यात आले आहे. सदरचा अहवाल सार्वजनिक केला असून उर्वरित बारा तालुक्यांमध्ये सुद्ध पावसाचा जोर कायम असल्यामुळे शेतकऱ्यांचे पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात घरे, गाई, गोठे, पशुधनाची जीवित हानी झाली असून जिल्ह्यातील सर्व तालुक्यामधील महसुली मंडळ निहाय तलाठी व ग्रामसेवकास पंचनामे करण्याकरिता आदेशित करूून पीक नुकसानी सह इतर सर्व नुकसानची भरपाई देण्यात यावी.. तथापि विना विलंब सरसकट जिल्ह्यातील शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीचा हेक्टरी 50.000 हजार मोबदला थेट बँक खात्यात जमा करून शेतकऱ्यांना आर्थिक व मानसिक आधार देण्यात यावाा. अशी मागणी लेखी निवेदनाद्वारे मुख्यमंत्र्यांसह जिल्हाधिकाऱ्यांंकडे केली आहे….