(महाराष्ट्र न्युज नेटवर्क)
किनवट/माहूर
विद्यूत तारेचा शॉक लागून ऐन पोळा सणाच्या दिवशी बैलासह शेतक-याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना माहूर तालुक्यातील मौजे हिवळणी येथे घडली असून या घटनेमुळे संपुर्ण तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे…
आज सोमवार दि. २ सप्टेंबर रोजी पोळा सणानिमित्त बैलांना आंघोळ घालण्यासाठी गेलेल्या एका नवतरुण शेतकरी पुत्रासह बैलाचा विजेच्या धक्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना माहूर तालुक्यातील मौजे हिवळणी येथे घडली आहे. विलास धारासिंग राठोड (३१) असे त्या मृतक शेतक-याचे नांव आहेे. माहूर तालुक्यात पोळ्याची सर्वत्र धामधूम सुरू असताना विलास धारासिंग राठोड हा तरुण आपल्या बैलाला घेवून नेहमी प्रमाणे शेतात घेवूण गेला होता. तेथे दोन बैलांंपैकी एका बैलाच्या पायाला जिवंत विद्युत तार आडकला ते पहाताच विलास आपल्या बैलाला वाचविण्यासाठी गेला असता त्याला हि विद्युत शाॅक लागून त्याच्यासह बैलाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली… दरम्यान दोघांच्याही मृत्यूने हिवळणी येथे पोळा सणाच्या उत्साहावर विरजण पडले असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे…
घटनेची माहीती मिळताच सिंदखेड पोलीस ठाण्याचे पो.हे.काँ. गजानन कुमरे यांच्यासह पो.काँ मोकले व इतर पोलीस कर्मचारी तातडीने घटनास्थळावर दाखल होवून घटनेचा पंचनामा केला. तर आष्टा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात मयत विलासला शविच्छेदनासाठी अणून डॉ. संदेश राठोड यांनी शविच्छेदन केले असल्याची माहीती प्राप्त झाली आहे…