क्राइम
अंबेजोगाई मधील उसतोड मुकादमाच्या खुनातील ‘ते’ तीन आरोपी सिंदखेड पोलीसांनी पकडले…
"तब्बल चार कि.मी. चा यशस्वी पाठलाग ; सिंदखेड पोलीसांच्या कामगीरीचे कौतुक"
(महाराष्ट्र न्युज नेटवर्क)
किनवट/माहूर
अंबेजोगाई तालुक्यातील बहुचर्चीत उसतोड मुकादमाच्या खुन प्रकरणातील तीन आरोपी फरार होण्याच्या तयारीत असताना तब्बल चार कि.मी. चा पाठलाग करून त्या आरोपींना पकडण्याची चमकदार कामगीरी काल दि. २ रोजी सिंदखेड पोलीसांनी केली असून अगदी फिल्मीस्टाईल पाठलाग करून आरोपींना पकडण्यात यश मिळवल्याने पोलीसांच्या कामगीरीचे सर्वत्र कौतुक होत आहे…
अंबेजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यात दि. ३० ऑक्टो. रोजी दाखल गु.र.नं. 327/2024 नुसार उसतोड मुकादम असलेल्या सचिन शिवाजी तिडके, वय 35 वर्षे रा. भोगलवाडी ता. धारूर ह. मु. मौजे डोंगरपिंपळा ता. अंबाजोगाई जि. बीड यास यातील आरोपी यमराज धरमसिंग राठोड, वय 32 वर्षे रा. लसणवाडी ता. माहुर जि. नांदेड, शुभम चंद्रकांत पवार, वय 20 वर्षे रा. सिडको नांदेड तसेच करण देविदास राठोड, वय 22 वर्षे रा. नमस्कार चौक नांदेड या तिघांनी दि. २९ ऑक्टोबर रोजीच्या रात्री ऊस तोडीच्या पैशाच्या आर्थिक व्यवहारातुन दगडाने तोंड ठेचुन खुन केला होता. तसेच खुन करून पळून गेले होते. याप्रकरणी गुन्हा दाखल होवून खुनातील आरोपीतांचा शोध घेण्याकरीता स्थानिक गुन्हे शाखा बीडसह अंबाजोगाई ग्रामीण पोलीस आरोपीच्या शोधात होते.
सदर खुनातील फरार आरोपी हे सिंदखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीत असल्याची गोपनीय माहीती बीड पोलीसांनी सिंदखेड पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरिक्षक रमेश जाधवर यांना दिली होती.. त्यानुसार गोपनिय माहीती काढुन सदर हकीकत वरिष्ठांना दिल्यानंतर सदर आरोपींना पकडून ताब्यात घेण्याचेे आदेश प्राप्त केले. त्यावरुन आरोपीचा शोध घेत असतांना सदरचे आरोपी हे ऑटोमधुन जात असल्याची माहिती सिंदखेड पोलीसांना मिळाली..
सिंदखेड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरिक्षक रमेश जाधवर यांच्यासह पो.उप.नि. मडावी, पो.हे.कॉ. पठाण, पो.ना. मडावी, हुसेन, पो.कॉ. संजय शेंडे आदी पोलीसांच्या पथकाने माहूर तालुक्यातील पालाईगुडा येथे ऑटोमधून पळून जात असताना आरोपींना पाहीले.. त्यावेळी पोलीस मागावर असल्याची कुणकुण लागल्यानंतर सदर आरोपी हे ऑटो सोडून पळत जात असताना फिल्मीस्टाईल पाठलाग करताना तब्बच चार कि. मी. पाठलाग करुन त्यांना पकडल्याने सिंदखेड पोलीसांवर अभिनंदनाचा वर्षाव होत असून सिंदखेड पोलीसांचे सर्वत्र कौतुक होत आहे…