क्राइम

रात्रीच्या वेळी रेती चोरी करणारा टिप्पर नाल्यात कोसळला.. “दोन गंभीर तर चालकाचा हात तुटून पडल्याची चर्चा”

"महसूल विभागासह पोलीसांनाही घटनेची खबर नसल्याने आश्चर्य..!!" "महसूल विभागाच्या नाकावर टिच्चून माहूर तालुक्यात रात्रीच्या पाळीने रेती चोरी होत असल्याचे सिद्ध..!"

(महाराष्ट्र न्युज नेटवर्क)

 

 

 

 

 

 

 

किनवट/माहूर

महसूल विभागाच्या नाकावर टिच्चून माहूर तालुक्यात रेतीचोरीचे सत्र सातत्याने सुरूच असल्याचे दिसून येत असून काल रात्री अंदाजे दोन ते तीन च्या सुमारास तालुक्यातील कुपटी नाल्यावरून रेती भरून निघालेले एक टिप्पर पुलावरून थेट नाल्यात कोसळून एकाचा हातच मनगटापासून तुकडा पडल्याच्या घटनेने या रेतीचोरीचे बिंग फुटल्याची कुजबुज आजच्या घडीला संपुर्ण माहूर तालुक्यात चर्चेचा विषय बनला आहे..

 

 

माहूर तालुक्यातील अती दुर्गम भागात असलेल्या मौजे कुपटी गावाला लागून असलेल्या नाल्यात सदरची घटना घडली असून नाल्यावरील पुलाला कठडे नसल्याने सदरचा अपघात घडल्याचे सांगण्यात येत आहे…. याबाबत संपुर्ण तालुक्यात होत असलेल्या चर्चेनुसार काल बुधवार दि. २५ रोजी (आज भल्या पहाटे) अंदाजे अडीच ते तीन वा. च्या दरम्यान टिप्पर क्र. एम.एच. २६ बी.ई. ४६३८ या क्रमांकाचे टिप्पर ईवळेश्वर येथील नाल्यातूून रेती भरून भरधाव वेगात वाई बाजार कडे येत होते. त्यावेळी टिप्परचा तोल सांभाळता न आल्याने टिप्पर थेट नाल्यात पलटी पडले. या अपघातात चालकासह तीन मजुर गंभीर जखमी झाले असून एक मजूर तर त्या वाळूत दबून असल्याची दबक्या आवाजातून चर्चा सुरू आहे..

 

 

विशेष बाब म्हणजे एवढी मोठी घटना घडून देखील महसूल विभाग आणि पोलिसांना या घटनेची खबर नसल्याने आश्चर्य व्यक्त होत असून आज दुपारी तेच पलटी झालेले टिप्पर राजरोसपणे संबंधितांनी काढूनही नेले असल्याची खबरबात अख्खा माहूर तालुका जाणून आहे..अशात तालुक्यातील नदीशेजारी असलेल्या जवळपास सर्वच ठिकाणी होत असलेल्या रेती चोरीच्या रात्रीच्या खेळात रेती चोरांसोबत संबंधित विभागाचे कर्मचारी सामील असून त्या कर्मचा-यांचीही हिस्सेदारी नाही ना..? असा यक्षप्रश्न सर्वसामान्यांना भेडसावत असून रेतीतस्करीवर लगाम लागल्याच्या महसूल विभागाच्या ‘बड्या बाता’ या घटनेमुळे मात्र ‘फोल’ असल्याचे स्पष्ट होत आहे….

 

    “या प्रकरणाची सखोल चौकशी होणे गरजेचे असून रेती तस्करीच्या या गोरखधंद्यातील पडद्यामागचे सत्य काय व त्यामागील धारकरी नेमके कोण..? हे शोधणेही तेवढेच गरजेचे असून नांदेडचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी स्वत: या प्रकाराकडे लक्ष देवून संबंधितांवर कारवाई करावी तसेच घडलेला प्रकार नेमका काय तो उजागर करावा ही मागणी सर्वसामान्यांकडून होत आहे….

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close