नव-याला जिवे मारण्याची धमकी देवून विवाहित महिलेवर अत्याचार..
"सिंदखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटना ; आरोपीस अटक"
(महाराष्ट्र न्युज नेटवर्क)
किनवट/माहूर
नव-याला जिवे मारण्याची धमकी देवून विवाहितेवर अत्याचार केल्याची खळबजनक घटना ता. १ जुलै रोजी घडल्याचे उघडकीस आले असून याप्रकरणी सिंदखेड पोलीसांत गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपीस अटक करण्यात आली आहे..
माहूर तालुक्यातील सिंदखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मौजे सेलू – गंगाजीनगर येथील एका ३३ वर्षीय विवाहितेने सिंदखेड पोलीस ठाण्यात दिलेल्या जबाबाप्रमाणे ती विवाहिता दि. १ जुलै २०२४ रोजी विवाहिता गंगाजीनगरहून सेलूकडे कडे जात असताना सेलू येथील आरोपीच्या जुन्या घराजवळ ती महिला आल्यानंतर आरोपीने तिच्या नव-याला जिवे मारण्याची धमकी दिली. तद्नंतर त्या महिलेला आरोपीच्या रस्त्यालगत असलेल्या जुन्या घरी नेवून अत्याचार केल्याची फिर्याद सदर पिडीत विवाहीतेने सिंदखेड पोलीस ठाण्यात दिली आहे..
विवाहितेच्या तक्रारीवरून सिंदखेड पोलीस ठाण्यात गु.र.नं. ५७/२०२४ कलम ६४ (१), १२७ (२), ३५१ (२) (३) भारतीय न्याय संहिता २०२३ प्रमाणे पवन लक्ष्मण गायकवाड वय २६ रा. गंगाजीनगर ता. माहूर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी आरोपीला पोलीसांनी ताब्यात घेतले असून प्रकरणाचा तपास सिंदखेड पोलीस ठाण्यात नव्याने रूजू झालेले सहायक पोलीस निरिक्षक आर.बी. जाधवर हे करीत आहेत..
“विशेष म्हणजे १ जुलै पासून लागू करण्यात आलेल्या भारतीय न्याय संहितेच्या नवीन कायद्यानुसार सिंदखेड पोलीस ठाण्यातील हा पहिलाच गुन्हा असून अशा स्वरूपाच्या गुन्ह्यातील कायद्यात झालेले बदल तसेच नवीन कायद्यानुसार राखावयाची गोपनीयता यामुळे प्रकरणातील अधिकची माहिती प्राप्त होवू शकली नाही..