(महाराष्ट्र न्युज नेटवर्क)
किनवट/माहूर
पडसा येथील ‘त्या’ वादग्रस्त प्रकरणी न्यायालयात अवमान याचिका दाखल करण्यात आली असून न्यायालयाने मनाई हूकूम पारीत केला असतानाही तो झुगारून आदेशाचा अवमान केल्याच्या पार्श्ववभुमिवर तब्बल ५७ जणांना न्यायालयाने नोटीसा बजावल्या आहेत…
विशेेेषत: वसंता नागोराव भगत यांनी महामहीम राष्ट्रपतींसह उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठाच्या मुख्य न्यायाधिश तसेच संबंधित विभीगातील तब्बल 20 ठिकाणच्या कार्यालयाला दिलेल्या सात पाणी लेखी निवेदनातून त्यांची करूण कहाणी रेखाटताना न्यायासाठी अनेक कार्यालयाचे उंबरठे झिजवून देखील न्याय मिळत नसल्याने व्यथीत होवून संपुर्ण कुटुंबासह इच्छा मरण देण्याची मागणी केली होती.. त्यात घराबाहेर पडण्यासाठी वसंता भगत यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांना चक्क भिंतीवरून उड्या मारून ये-जा करण्याची दुर्दैवी वेळ स्वत:च्या समाजानेच लादल्याची खंत निवेदनात नमूद केली होती… दरम्यान या प्रकरणातील पडद्यामागील सत्य उजागर करताना शेतकी भानगडीत न्यायव्यवस्थेने भगत यांच्या बाजूने मनाई हुकूम पारीत केल्याने चिडून गावातीलच एक स्वयंघोषित नेता व त्यांची दोन मुले गावातील काही जणांना हाताशी धरून सातत्याने त्रास देत असल्याचे भगत यांच्याकडून लिखित स्वरूपात सांगण्यात आले होते…
दरम्यान भगत यांच्या घराबाहेर पडण्याचा रस्ताच बंद करण्याच्या उद्देशाने शासकीय निधीचा गैरवापर करताना समाजमंदीराचे बांधकाम भगत यांच्या घराबाहेर पडण्याच्या मार्गातच सुरू केल्याने त्या विरोधात भगत यांनी दिवाणी दावा दाखल करून सुरू असलेले समाजमंदीराचे बळजबरीचे बांधकाम न्यायालयाच्या पुढील आदेशापर्यंत थांबवण्याचे आदेश यापुर्वीच प्राप्त केले आहेत. परंतू या आदेशाने त्या स्वयंघोषित नेत्याचा जळफळाट झाल्याने मर्जीतल्या लोकांना हाताशी धरून न्यायालयाचा स्थगिती आदेश न जुमानता बळजबरीने भगत यांच्या घराबाहेर पडण्याच्या मार्गात भिंतीचे बांधकाम करून न्यायालयाच्या आदेशाची अवमानना झाल्याने भगत यांनी नांदेड न्यायालयात न्यायालयाच्या आदेशाची अवमानना करणा-या तब्बल 57 जणांविरोधात अवमान याचिका दाखल केली असून न्यायालयाने याचिका दाखल करून घेताना सर्वच्या सर्व 57 जणांना नोटीस बजावताना 12 सप्टेंबर रोजी न्यायालयात हजर राहण्याचे बजावले आहे….
“विशेष म्हणजे प्रकरणातील वादी व सर्वच्या सर्व प्रतिवादी हे एकाच समाजाचे असून सर्वच्या सर्व घटनाकारांना मानणारे आहेत. एवढेच नव्हे तर “कायदा लिहीलाय बापानं” म्हणत प्रत्येक ठिकाणी अभिमानानं घटनाकारांप्रती गैरवोद्गार काढणारा वर्ग आहे. अशात घटनेचा व घटनाकाराचा सदैव अभिमान बाळगणा-या या प्रवृत्तीनी कायद्याविरोधात जाऊन कायद्याचीच अवमानना करणे हे खरोखरच घटनेला तसेच घटनाकाराला अभिप्रेत आहे का..? हा प्रश्न सर्वसामान्यांना भेडसावत असून पडसा येथील ‘त्या’ तथाकथित स्वयंघोषित नेत्याची अल्पबुध्दी व द्वेषभावनेतून उद्भवलेले हे प्रकरण याच स्वयंघोषित नेत्यासह त्यास पुढारी म्हणवणा-या अनेक चेलेचपाट्यांच्या तोंडचे पाणी मात्र पळवणार..! याबाबत सर्वच स्तरातून भन्नाट चर्चेला उधान आले असून ”सच परेशान हो सकता है..लेकीन पराजित नहीं..!!” या उक्तीचा तंतोतंत प्रत्यय येताना दिसत आहे..!!