क्राइम

माहूर शहरात वेश्याव्यवसायाने गाठला उच्चांक ; पोलीसांच्या नाकर्तेपणामुळे शहराची प्रतिमा मलीन होण्याच्या मार्गावर..

"रेती तस्करांपासून पुढा-यांपर्यंत व विद्यार्थ्यांपासून लंपटांपर्यंत देहविक्रीसाठी लॉजींग खुल्याच..!"

(महाराष्ट्र न्युज नेटवर्क)

 

 

 

 

(बाबाराव कंधारे)

   देवीच्या साडेतीन शक्तीपीठांपैकी एक पुर्ण शक्तीपीठ असलेले माहूरगड या तिर्थक्षेत्राच्या शहरात वेश्याव्यवसायाने उच्चांक गाठला असून रेती तस्करांपासून पुढा-यांपर्यंत व विद्यार्थ्यांपासून लंपटांपर्यंत देहविक्रीसाठी शहरातील लॉजींग कोणत्याही वेळी उपलब्ध होत असल्याने माहूर पोलीसांची भुमिका ही संशयास्पद असल्याचे उघडपणे बोलले जात असली तरी पवित्र तिर्थक्षेत्राच्या या शहराची प्रतिमा पोलीसांच्या नाकर्तेपणामुळे मात्र धुळीला मिळत असल्याचे ज्वलंत सत्य सध्या बाहेरून येणा-या भाविकांसह माहूरकर अनुभवत आहेत…

   माहूर शहर हे तीर्थक्षेत्र असल्याने संपुर्ण भारतात प्रसिद्ध असून यानिमित्ताने दररोज भाविक येथील पावन भुमित आपल्या देवीदेवतांसमोर नतमस्तक होण्यासाठी येत असतात. परंतू या पवित्र शहराला लॉजचालकांच्या भिकारचोट धोरणामुळे अक्षरश: नजर लागल्याचे चित्र असून लॉजचालकांच्या अधिक कमाई करण्याच्या नादात अनेक आंबटशौकीन आता माहूर शहरातील लॉजींगचे गोडवे गात असल्याचे भयान वास्तव माहूर शहरातील लॉजींग मधील एका व्हिडीओ वरून समोर आले आहे…
    माहूर शहरातील देवीदेवतांच्या नावाने असलेल्या व इतरही जवळपास सर्वच लॉजींग भाविकांच्या सोईसुविधांसाठी थाटण्यात आल्याचा आव आणतात.. परंतू याच लॉजींगवर आता चक्क वेश्याव्यवसाय धडाक्यात सुरू असून माहूर पोसीसांच्या नाकर्तेपणामुळे लॉजचालकांचा सुवर्णकाळ सुरू असल्याचे दिसून येत आहे.. दिवसाढवळ्या व रात्री  बेरात्री शहरातील लॉजींगवर सुरू असलेला हा ‘ खेळ’ माहूर पोलीसांच्या कर्तव्यनिष्ठतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करीत असून माहूर शहरातील कायदा व सुव्यवस्थेची  विस्कटलेली घडी पुन्हा बसवण्यासाठी खास म्हणून नेमनुकीवर आलेले सहाय्यक पोलीस निरिक्षक शिवप्रकाश मुळे यांना शहरातील लॉजींगवर सुरू असलेला हा खेळ दिसत नाही का..? असा सवाल सर्वसामान्यांना प्रचंड भेडसावत आहे. तर शहरातील लॉजींगवर सुरू असलेले हे चाळे पोलीसांच्या मुकसंमतीतूनच होत नाहीत ना..? हा प्रश्नही आता जोर धरू लागला आहे…
   “विशेष म्हणजे मराठवाडा व विदर्भातील अनेक ठिकाणच्या देहविक्री करणा-या महिला दररोज माहूर शहरात दाखल होवून शहरातील विविध ठिकाणच्या लॉजींगवर अर्थपुर्ण जाळे टाकून आपल्या सावजाला अचूक हेरतात. तर लॉजींग चालकांनाही “कमी वेळेत जास्त उत्पन्न” हे सुत्र कळाले आहे… या परिस्थितीत माहूरच्या एका लॉजवर माहूर तालुक्यातील एक रेती तस्कर व देहविक्री करणा-या एका अर्धवयीन महिलेचा चक्क  व्हिडीओच सोशल मिडीयावर तुफान वायरल होत असून चित्रीत  करण्यात आलेला हा व्हिडीओ केवळ योगायोग की देहविक्रीच्या या व्यवसायाबरोबरच दुसरीकडे पॉर्न व्हिडीओज बनवण्याचा कारखाना माहूरचे लॉजींगचालक चालवत आहेत..? असा सवाल आता पुढे येत असून ही बाब  पोलीस प्रशासनाला माहिती नसावी..? ही दुर्मीळ गोष्ट असून अगदी खेड्यापाड्यातील देशी दारू विकणा-यांपासून ते दोन नंबरवाल्या बड्या आसामींच्या यादीची अगदी क्षणाक्षणाला अपडेट ठेवणा-या माहूर पोलीसांना ही बाब कळाली नसावी.. ही बाब सुज्ञ नागरीक मानायलाच तयार नसून या व्यवसायीकांसोबत माहूर पोलीसांचे अर्थपुर्ण संबंध तर नाहीत ना…? असा सवाल सर्वसामान्यांसह माहूरकरांना पडला आहे..

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close