नोकरी संदर्भईतर

‘माझी वसुंधरा’ अभियानात माहूर ठरले राज्यात दुसरे….

"राज्यातील 22632 स्था.स्व.सं., न.पं. व ग्रा.पं. मधून माहूर शहराचा दुसरा क्रमांक"

(महाराष्ट्र न्युज नेटवर्क)

 

 

 

 

 

किनवट/माहूर

  ‘माझी वसुंधरा’ अभियानात माहूर न.पं. ने राज्यात दुसरा क्रमांक पटकावला असून राज्यातील तब्बल 22632 स्था.स्व.सं., न.पं. व ग्रा.पं. मधून माहूर न.पं. ने दुसरा क्रमांक पटकावल्यामुळे माहूर न.पं.चे नगराध्यक्ष फिरोज दोसानी व त्यांच्या संपुर्ण टिमवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे..

 

श्री क्षेत्र माहूर नगरपंचायत अंतर्गत गेल्या अनेक वर्षापासून पंचतत्वावर आधारित ‘माझी वसुंधरा अभियान’ मध्ये सतत चार वर्षे केलेल्या कठीण परिश्रमाच्या कार्याची पावती राज्य सरकारकडून माहूर नगरपंचायतला मिळाली असून अत्यंत मानाचा दुसरा क्रमांक देऊन गौरव करण्यात आल्याने माहूरगड च्या मानाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. तथापि माहूरचे नगराध्यक्ष फिरोज दोसानी यांच्यासह मुख्याधिकारी विवेक कांदे, तत्कालीन मुख्याधिकारी डॉ. राजकुमार राठोड, उपनगराध्यक्ष ज्ञानेश्वर लाड, कार्यालयीन अधीक्षक वैजनाथ स्वामी यांचे यानिमित्ताने माहूरसह जिल्हाभरातून अभिनंदन होत आहे….

 

पृथ्वी, वायु, जल, अग्नी आणि आकाश या निसर्गाशी संबंधित पंचतत्त्वावर आधारित “माझी वसुंधरा अभियान” हे राज्यभरातील 22632 नगरपंचायती, ग्रामपंचायत तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 2 ऑक्टोंबर 2020 मध्ये राबविण्यास सुरुवात करण्यात आली होती.  माझी वसुंधरा अभियान हे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 1 एप्रिल 2023 ते 31 मे 2024 या कालावधीमध्ये राबविण्यात आले. माझी वसुंधरा अभियानामध्ये राज्यातील 414 नागरी स्थानिक संस्था व 22218 ग्रामपंचायती अशा एकूण 22632 स्थानिक स्वराज्य संस्थांनी सहभाग घेतला होता.. 

 

 

महाराष्ट्र शासनाच्या मुंबई येथील पर्यावरण व वातावरणातील बदल विभाग यांच्या सर्वेक्षणानुसार छत्रपती संभाजी नगर विभागातून अंतिम सर्वेक्षणात पंचतत्वावर आधारित माझी वसुंधरा अभियानात माहूर नगरपंचायतीने दुसरा क्रमांक पटकविल्याचे पत्र नुकतेच माहूर नगरपंचायत ला प्राप्त झाले असून गेल्या चार वर्षात केलेल्या अपार मेहनतीचे फळ मिळाल्याची तसेच तसेच सर्वधर्मसमभाव जोपासणाऱ्या माहूर गडची शासनाने दखल घेवून दुसऱ्या क्रमांकावर निवड केल्याने माहूरचे नगराध्यक्ष फिरोज भाई दोसानी यांनी शासनाचे आभार मानले आहेत…

 

   तर गेल्या चार वर्षात पृथ्वी, वायू, जल, अग्नी आणि आकाश या पंचतत्त्वावर आधारित ‘माझी वसुंधरा’ अभियानात कठीण परिस्थितीत अथक परिश्रम करून दुसरा क्रमांक पटविल्याबद्दल नागरिकातून तत्कालीन व सध्याचे नगराध्यक्ष फिरोज दोसानी, मुख्याधिकारी विवेक कांदे, तत्कालीन मुख्याधिकारी तथा नायब तहसीलदार डॉ. राजकुमार राठोड, उपनगराध्यक्ष ज्ञानेश्वर लाड, कार्यालय अधीक्षक वैजनाथ स्वामी, स्वच्छता दूत गणेश जाधव, प्रकल्प अधिकारी देविदास जोंधळे, अभियंता विशाल ढोरे, कार्यालय प्रमुख संदीप गजलवाड, सिटी कॉर्डिनेटर मजहर शेख, सेवक सुरेंद्र पांडे यांचे सह सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन होत आहे….

 

 

“नव्याने माहूर नगरपंचायत ला रुजू झालेले तरुण तडफदार मुख्याधिकारी विवेक कांदे यांनी रुजू झाल्यापासूनच माहूर शहराला तीर्थक्षेत्राचे स्वरूप द्यावे या उद्देशाने काहीतरी नवीन करून नाव लौकिक मिळविण्याच्या उद्देशाने सर्वप्रथम माहूर शहरात स्वच्छता अभियान मोठ्या प्रमाणात राबविण्यास सुरुवात केली आहे. तर माहूर शहरातील रस्ते नाल्यांचा कायापालट करून उच्चस्तरीय विकास कामे तसेच ग्रीन सिटी नगरपंचायत साठी नवीन इमारत, भाविकांच्या वाहनासाठी अद्यावत पार्किंग, प्रदूषण कमी करण्यासाठी सौरऊर्जेवरील विद्युत व्यवस्था, पर्यटन स्थळांचा विकास, क्रिडांगण, महिला सशक्तीकरणांतर्गत असलेल्या शासनाच्या सर्व योजनाची प्रभावीपणे अंमलबजावणी, अतिक्रमणमुक्त शहरासाठी माहूर शहराची भूमि अभिलेख कार्यालयाद्वारे मोजणी यासह इतर सर्व शासकीय योजना प्रभावीपणे राबविण्यात सुरुवात केल्याने त्यांचे शहरवासीयातून कौतुक होत आहे….

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close