सामाजिक
आ. केराम यांच्या प्रयत्नातून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेेेअंतर्गत पाच कोटींच्या विकासकामांना मंजूरी….
"किनवट/माहूर तालुक्यातील अनेक ठिकाणच्या ग्रामस्थांना दिलेला शब्द पाळला"
(महाराष्ट्र न्युज नेटवर्क)
किनवट/माहूर
आ. केराम यांच्या प्रयत्नातून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेेेअंतर्गत पाच कोटींच्या विकासकामांना शासनाकडून मंजूरी मिळाली असून किनवट व माहूर तालुक्यातील अनेक ठिकाणच्या ग्रामस्थांनी केलेल्या मागणीच्या पार्श्वभुमिवर ग्रामस्थांना दिलेला शब्द आमदार महोदयांनी पाळला असल्याची भावना जनतेतून व्यक्त होत आहे..
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेअंतर्गत सन 2024-25 या वर्षासाठी नांदेड जिल्ह्यातील कामांना मंजूरी देण्याबाबत महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचा शासन निर्णय दिनांक 3 ऑक्टोबर 2024 नुसार किनवट/माहूर विधानसभा मतदार संघातील विविध विकासकामांच्या अनुषंगाने विविध ठिकाणच्या जनतेने आमदार भिमरावजी केराम यांच्याकडे आवश्यक असलेल्या विकासकामांबाबत आवश्यक कामांची मागणी केली होती. तथापि मागणीच्या पार्श्वभुमिवर आ. बिमरावजी केराम यांच्या प्रयत्नातून किनवट व माहूर तालुक्यातील विविध ठिकाणच्या विकासकामांसाठी ५ कोटी रूपयांची तरतुद शासनाने केली असून लवकरच प्रत्यक्ष कामांना सुरूवात होणार आहे…
यात प्रामुख्याने किनवट तालुक्यातील बोधडी (बु.), दहेली व वझरा ता. किनवट येथे समाजमंदीर, ग्रा.पं. तल्हारी येथे सी.सी. रस्ता बांधकाम, सावरी येथे सी.सी. रस्ता व नाली बांधकाम, ग्रा.पं.पाथरी अंतर्गत टेंभी, व मुळझरा, कनकवाडी, आंजी, नागापूर, शिरपूर, चिंचखेड, येंदा पेंदा, कोल्हारी, धामनदरी, घोटी, लोणी, कोठारी (सिं.), येथे सी.सी. रस्ता बांधकाम….,
तर माहूर तालुक्यातील वाई बाजार येथे सभामंडप बांधकाम, साकूर, अनमाळ, मालवाडा, आष्टा, आसोली, मदनापूर, रूई, नखेगाव, सायफळ, मेट येथे सी.सी. रस्ता बांधकाम, तसेच उमरा येथे सभामंडप, सिंदखेड व बोंडगव्हाण येथे समाजमंदीर बांधकाम इत्यादी ठिकाणच्या विकासकामांसाठी पाच कोटी रूपयांच्या विकासकामांची मंजूरी प्राप्त होवून लवकरच कामांना सुरूवात होणार असल्याने वरील सर्वच ठिकाणच्या समाजबांधवांकडून आ. केराम यांचे आभार मानले जात असून आ. केरामांनी दिलेला शब्द पाळला असल्याची भावना समाजमनातूूून व्यक्त होत आहे…