(महाराष्ट्र न्युज नेटवर्क)
किनवट/माहूर
मुख्यमंत्री- माझी लाडकी बहिण योजनेेेेेेेेसंदर्भात आज माहूर येथे संवाद बैठक येथील बालाजी मंगलम येथे आयोजित करण्यात आली असून आमदार भिमरावजी केराम यांच्या अध्यक्षतेखाली पार पडत असलेल्या या संवाद बैठकीस तालुक्यातील महिला भगीनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे…
महिलांना दरमहा १५०० रुपये अर्थसहाय्य करणारी महाराष्ट्र शासन,
महिला व बालविकास विभागाची “मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण योजना” या योजनेची संवाद बैठक आज बुधवार दि.२५ सप्टेंबर रोजी दुपारी १२:०० वा. स्थानिक बालाजी मंगलम् माहूर येथे किनवट माहूर विधानसभा मतदारसंघाचे विकासपुरुष लोकप्रिय आमदार भीमराव रामजी केराम यांच्या अध्यक्षतेखाली महिला व बाल विकास विभाग, माहूर यांच्या वतीने आयोजित करण्यात आली आहे…
अल्प उत्पन्न असणाऱ्या महिलांना दरमहा १५०० रुपये अर्थसहाय्य करणारी महाराष्ट्र शासन, महिला व बालविकास विभागाची ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजना’ जुलै महिन्याच्या लाभापासून सुरू करण्यात आली असून य जुलै व ऑगस्ट या दोन महिन्याचे प्रत्येकी दिड हजार प्रमाणे तीन हजार रुपये पात्र लाभार्थीं महिला लाडक्या बहिणींच्या बॅंक खात्यात जमा देखील करण्यात आले आहेत. दरम्यान योजनेचा तिसरा हप्ता लवकरच लाभार्थ्यांंच्या खात्यात देण्यासाठी हालचाली सुरू असून या योजनेचा आढावा घेण्यासाठी शासन व प्रशासनाकडून जागोजागी संवाद बैठकीचे आयोजन करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर आज माहूर शहरातील बालाजी मंगलम् येथे दुपारी संवाद बैठकीचे आयोजन महिला व बालविकास विभाग,माहूरच्या वतीने करण्यात आले आहे.
बैठकीला तहसीलदार किशोर यादव, पं.स.गटविकास अधिकारी तथा प्रशासक सुरेश कांबळे,नगरपंचायत मुख्याधिकारी विवेक कांदे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. माचेवार, एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे…
“माहूर तालुक्यातील एकही पात्र लाडकी बहिण योजनेच्या लाभापासुन वंचित राहू नये यासाठी आज बुधवार दि. २५ सप्टेंबर रोजी आयोजित संवाद बैठकीला पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व पात्र लाभार्थीं महिलांनी शहरातील मातृतीर्थ मार्गावरील बालाजी मंगलम् येथे जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन तहसीलदार किशोर यादव यांनी केले आहे…