किनवट विधानसभेतील अपक्षांची वज्रमूठ ; केली आजी-माजी आमदाराला पछाडण्याची तयारी…
"अपक्षांची गुप्त खेळी ; आजी-माजी आमदाराला पडणार भारी"
(महाराष्ट्र न्युज नेटवर्क)
(बाबाराव कंधारे)
किनवट 083 विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभुमिवर निवडणूकीला आता ख-या अर्थाने रंग चढू लागला असून खरी लढत पारंपारिक प्रतिस्पर्ध्यांतच होणार असल्याचे राजकीय भाकीत संबंधितांच्या राजकीय तज्ञांकडून व्यक्त होत असले तरी ‘ग्राऊंड लेवल’ ला मात्र खरी परिस्थिती ‘और’ च असल्याचे दिसून येत आहे. त्यात एकूण 12 च्या संख्येत असलेले अपक्ष उमेदवार एकत्र येवून नवा माइंडगेम खेळणार असल्याची माहीती एका अपक्ष उमेदवाराने दिल्याने आजी-माजी आमदारांसाठी ही धोक्याची घंटा असल्याचे एका विद्यमान अपक्ष उमेदवाराने सांगितले आहे..
किनवट-माहूर विधानसभा मतदार संघ हा बंजारा बहूल व आदिवासी बहूसल भाग म्हणून ओळखला जातो. या मतदार संघाचे पुर्वश्रमी घड्याळ परिधान केलेले आता ‘तुतारी’ वादक झाले आहेत… तर 2019 च्या निवडणूकीत विजयश्री खेचून आणत विधानसभेवर विराजमान झालेले यावेळीही जिंकण्यासाठी फुल्ल फॉर्मात आहेत… अशात बंजारा व आदिवासी मतांतही लक्षणीय फुट पडणार असून त्याचे राजकीय गणीत नेमके कुणाच्या पत्थ्यावर पडतेय ते पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. किंबहूंना यशस्वी होण्यासाठी “आपले वाढवा..किंवा समोरच्याचे कमी करा” हा फॉर्म्युला कोण यशस्वीपणे राबवतो त्यावरच आजी-माजी आमदारांच्या विजयाचे गणित सुटणार आहे..
दरम्यान संपुर्णत: बंजारा मतावर भिस्त असलेले राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे प्रदिप नाईक हे बंजारा मतांसोबतच मुस्लीम, बौद्ध व भाजपविरोधातील इतर मते आपल्याच खिशात असल्याचे गणित मांडून हवेत आहेत.. हेच खिशातले गणित नाईकांना भारी पडणार असल्याचे वारे त्यांना भारी पडणार असल्याचे संकेत मिळत असून सद्यस्तितीत नवतरूणांंच्या गळ्याती ताईत बनलेले अपक्ष उमेदवार सचिन नाईक यांनी त्यांच्यासमोर तगडे आव्हान उभे करून त्यांची हवा टाईट केली आहे..त्यामुळे अपक्ष उमेदवार सचिन नाईक यांच्यामुळे राष्ट्रवादी गोटाच्या अडचणीत वाढ झाल्याचे एकंदरीत चित्र असून बंजारा मतांत फुट पडून त्याचा थेट फटका प्रदिप नाईकांना बसल्यास ‘तुतारी’ चा आवाज ‘क्षीण’ होण्याची शक्यता सर्वसामान्य मतदारांतून वर्तवण्यात येत आहे….
तर भाजपचे विद्यमान आमदार भिमरावजी केराम यांनाही त्यांच्याच समाजातून तगडे आव्हान मिळत असून समाजातीलच इतर उमेदवार समाजाच्या मताची किती प्रमाणात गळती करतात याच सुत्रावर केरामांचे देखील गणित सुटणार आहे.. विशेष म्हणजे सत्ताधारी गोटात देखील नाराजांची संख्या लक्षणीय असून सत्ताधारी कंपू सर्व बाजूने परिपुर्ण असला तरी अंतर्गत बंडाळी व नाराज गट आयत्या वेळी ‘विंचवाचा डंक’ मारून आजी आमदाराला थयथयाट करण्यास भाग पाडू शकतो.. हे नाव न सांगण्याच्या अटीवर एका नाराजाने सांगितले आहे…
दरम्यान किनवट माहूर मतदार संघ हा प्रथम दर्शनी बंजारा व आदिवासी बहूल मतदार संघ म्हणून या मतांवरच अवलंबून असला तरी या दोन्ही समाजातील मतांत होणारी फुट, एकमेकांसमोर उभे ठाकलेले तगडे आव्हान तसेच मुस्लीम, बौद्ध, मराठा व इतर अठरा पगड जातीची मते ही आपल्याच खिशात असल्याचा समज शेवटच्या क्षणांत भारी पडणार असल्याचे दिसून येत असून सध्यातरी पारंपारिक लढत ही दुहेरी न होता चुरशीची तिरंगी लढत होण्याचे संकेत आहेत.. याचे मुख्य कारण म्हणजे की किनवट मतदार संघात एकूण बारा उमेदवार अपक्ष असून त्यातील बंजारा व आदिवासी उमेदवार आजी-माजी आमदारांच्या विरोधात दंड थोपटून उभे आहेत. तथापि इतर आर्थिक बाबींत परिपुर्ण नसले तरी स्वत:चे महत्व दाखवून देण्यासाठी सर्व अपक्ष उमेदवार एकत्र येवून एकाच अपक्षाला मदत करणार असल्याची गोपनीय माहीती एका विद्यमान अपक्ष उमेदवारांने दिली असून असे झाल्यास ‘तो’ अपक्ष उमेदवार आजी-माजी आमदारांना धोबीपछाड देवून नवा इतिहास घडवून निश्चितच भारी पडू शकतो…
“एकंदरीतच मागील काही वर्षांपासून राजकारणाचा झालेला ‘खिचडा’ हा उमेदवारांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा असून एकमेकांचे राजकीय हाडवैरी राजकीय फायद्यासाठी आता एकत्र आल्याने जवळचा कार्यकर्ता दूर होवून तिसराच पर्याय शोधत असल्याची मानसिकता असल्याचे दिसून येत आहे.. अशात सर्वच पक्षात दुहेरी फुट पडल्याचे उघड उघड दिसत नसले तरी ‘आतून काड्या’ करणा-या मंडळींचा आजवरचा इतिहास पाहता ‘गल्ली असो वा दिल्ली’ राजकारण्यांची जात आणि धर्म एकच..! ही बाब मतदारांच्या लक्षात येवून मतदारांनी तिसरा पर्याय निवडल्यास नवल वाटणार नसल्याचे जाणकार मंडळींकडून बोलले जात आहे….