सामाजिक
मलकागुडा येथे आदिवासी बांधवांचा “दंडार” सण दंडार उत्साहात साजरा….
"आदिवासी 'गोंंड' समाजबांधवांच्या पारंपारिक वेशभुषेने लक्ष वेधले..!!"
(महाराष्ट्र न्युज नेटवर्क)
किनवट/माहूर
मलकागुडा येथे आदिवासी बांधवांचा “दंडार” सण दंडार उत्साहात साजरा करण्यात आला असून ढोल ताशा तसेच इतर पारंपारिक वाद्यांच्या गजरात साजरा करण्यात आलेल्या या दंडार सणात आदिवासी ‘गोंंड’ समाजबांधवांच्या पारंपारिक वेशभुषेने विशेष लक्ष वेधले….
माहूर तालुक्यातील डोंगराळ भागात वसलेल्या मौजे मलकागुडा येथे आदिवासी गोंड बांधवांचा ‘दंडार’ हा सण पारंपारिक नृत्यांसह साजरा करण्यात आला. दरम्यान दंडार हा सणाला दसऱ्यापासून सुरुवात होते. यात आदिवासी गोंड समाजातील सर्व शेतकरी शेतमजूर बांधव आपापले शेतीतील कामे आटोपून सायंकाळी सात वाजता गावातील महाजन (समाजातील मानकरी) यांच्या घरासमोर शेकोटी पेटवून तेथे दंडार नृत्य सादर करतात.. यावेळी गावातील संपुर्ण आदिवासी समाजबांधव, महिला, वृद्ध व तरुण मंडळी महाजन यांच्या घरी जमा होऊन तेथे ढोल ताशांच्या चालीवर तेथे आपले पारंपारिक नृत्य सादर करतात.. तर दिवाळीचा सण पाच दिवसावर असताना समाजाच्या मान्य देवाची पूजा करून व रंगभूषनंतर ‘उषा’ डी ची पूजा करून त्यांना गावात प्रमुख ठिकाणी ‘दंडार’ फिरवली जाते..
विशेष म्हणजे ‘दंडार’ या नृत्यकलेत समाविष्ट असलेल्या पथकाला ज्या गावचे निमंत्रण आल्यानंतर त्या ठिकाणी जाऊन व तेथे मुक्काम करून नृत्य सादर कले जाते. यात प्रामुख्याने हास्यविनोदांसह ढोलकीच्या तालावर नाचणे, टिपरीच्या खेळावर नाचणे, तू पुढच्या चालीवर नाचणे, असे नृत्य केले जातात.. तर या नृत्याद्वारे लोक वर्गणीतून जमा झालेली रक्कम होते त्यातून सामूहिक देवाची पूजा करून भीम देवापाशी त्यांनी त्यात दणदारीचे विसर्जन करून तेथेच भोजन केले जाते.. व विसर्जीत करून लाकडाचा मुखवटा असलेला त्यांची पूजाअर्चा करून त्यांना परत आपल्या ठिकाणी ठेवून देतात.. अशा आदिवासी गोंड समाजातील ‘दंडार’ हा सण माहूर तालुक्यातील मौजे मलकागुडा येथे मोठ्या उत्साहात पार पडला…
यावेळी महाजन तुळशीराम आत्राम यांच्यासह माजी जि.प. सदस्य विजय आत्राम, आकाश आत्राम, दादाराव आत्राम, संजय मडावी, दशरथ आत्राम, मिलिंद पडलवार, अमोल सिडाम, मुकेश आत्राम, सौ. सुमनताई विजय आत्राम, श्रीमती सुनीता रमेश आत्राम, सौ. अश्विनी आकाश आत्राम, सौ. रूपा तुळशीराम आत्राम, सौ. लक्ष्मी भीमराव मडावी, सौ. अन्नपूर्णा संजय मडावी, कु. साक्षी रमेश आत्राम, तसेच घुसाडी…बापूरव कनाके, सुरेश मडावी, अक्षय मडावी.. दंडारी मंडळी…आदू मडावी, कपिल किनाके, रोहन, रोहित मेश्राम, विजय आत्राम, शंकर आत्राम, विकास सिडाम, हर्षल मेश्राम, सुरज मडावी, प्रवीण आत्राम.. वादक मंडळी : शामराव आत्राम, नागोराव आत्राम, सुरेश आत्राम भीमराव मडावी मिलिंद पडलवार तसेच आराध्या आत्राम, अवतिका मडावी, सोनाक्षी मडावी विवेक आत्राम, उपस्थित होते…