(महाराष्ट्र न्युज नेटवर्क)
किनवट/माहूर
वाई बाजार सह संपुर्ण माहूर तालुक्यात रेशनच्या तांदळाचा काळाबाजार मोठ्या प्रमाणात होत असून पोलीस व महसूल विभागाच्या डोळ्यात धुळफेक करून काळ्या बाजारात पटाईत असलेले व्यापारी ऐन दिवाळीच्या तोंडावर अक्षरश: संपुर्ण तालुका पिंजून काढत रेशनींगचा तांदुळ गोळा करण्यात व्यस्त असल्याने शासनाचा तांदुळ नेमका गरीबांसाठी का काळ्या बाजारातील व्यापा-यांसाठी याबाबत विविध प्रश्नांना पेव फुटले आहे….
सद्यस्थितीत शासनाच्या विविध धान्य योजनांमार्फत गोरगरीबांना दिल्या जाणा-या रेशनींगचा गहू व तांदूळ कमी किमतीत खरेदी करून तो जास्त दराने काळ्या बाजारात विकणारी टोळी वाई बाजार परिसरात कार्यरत असून गोरगरीबांच्या गरजेचा फायदा घेवून रेशनींगचा तांदूळ करेदी करून दिवसाढवळ्या व बिनदिक्कतपणे वाहतूक करतानाचे विदारक चित्र सध्या वाई बाजारसह संपुर्ण माहूर तालुक्यात दिसून येत आहे… विशेष म्हणजे काटा मारण्यात पटाईत असलेले हे व्यापारी खरेदी केलेला माल सदोष इलेक्ट्रॉनिक काट्यावरून खरेदी करून वजनात देखील काटा मारत असल्याचे नाव न सांगण्याच्या अटीवर काहींनी सांगीतले आहे… तर रेशनच्या धान्याबाबात संबंधित विभागाने गोपनीय चौकशी केेेेेेल्यास अनेक बडे मासे गळाला लागूून साठवणूक केलेला हजारो क्विंटल मालही हस्तगत होईल यात दुमत नाही…
“त्यामुळे ऐन सणासुदीच्या काळात गोरगरीबांच्या मजबुरीचा फायदा घेत रेशनींगच्या धान्याचा काळाबाजार करणा-यांंवर जिवनावश्यक वस्तू अधिनियम १९९५ चे कलम ३ व ७ अंतर्गत प्रशासनाने फौजदारी गुन्हे दाखल करावेत अशी माफक अपेक्षा सर्वसामान्यांतून व्यक्त होत आहे…