दिवाळीच्या मुहुर्तावर किनवट-माहूर तालुक्यात बनावट पत्रकारीतेचे भन्नाट पीक…
"हाडाच्या पत्रकारीतेसाठी डोकेदुखी ; अधिकारी व नंबर दोन वाल्यांसाठी बनले अवघड जागचे दुखणे..!"
(बाबाराव कंधारे)
किनवट/माहूर
लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणून गणल्या जाणा-या पत्रकारीतेला दिवाळीच्या मुहुर्तावर किनवट-माहूर तालुक्यात बनावट पत्रकारीतेचे ग्रहण लागले असून हेच ग्रहण हाडाच्या पत्रकारीतेसाठी अडचण..! सर्वसामान्यांसाठी डोकेदुखी तर अधिकारी व नंबर दोन वाल्यांसाठी मात्र अवघड जागचे दुखणे बनल्याची भावना नियमित जाहिरातदार वर्गाकडून व्यक्त होत आहे..
मागील काही महिण्यांपासून किनवट व माहूर तालुक्यातील पवित्र पत्रकारीतेच्या ‘मळ्यात’ नासधूस करणारी काही जनावरे शिरली असतानाच ऐन दिवाळीच्या मोसमात पवित्र पत्रकारितेला जणू बदनाम करण्याचा चंग बांधलेली काही मंडळी ज्यांंना मराठी व इंग्रजी भाषेत स्वत:चे नाव देखील लिहिता येत नाही.. अशी स्वयंघोषित पत्रकार मंडळी तथा केवळ पिडीएफ वरून संपादकीय लेख लिहून संपादकांचा आव आणणा-या काही महाभाग कॉपी पेस्ट संपादक मंडळीचे कॉपीपेस्ट ‘चेलेचपाटे’ जाहिरात वसूलीसाठी रात्रंदिवस एक करत असल्याचे विदारक चित्र सध्या किनवट व माहूर या दोन्ही तालुक्यात दिसून येत आहे…
तथापि ऐन दिवाळीच्या मुहुर्तावर उगवलेल्या अनेक राष्ट्रीय अध्यक्षांसह अनेक पिडीएफ् संपादक व पत्रकारांमुळे हाडाच्या व लेखणीधारक (स्वत: बातमी लिहिणा-या) पत्रकारांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत असून हा संपुर्ण प्रकार केवळ दिवाळी जाहिरातींपुरताच असला तरी ऐन दिवाळीच्या मोसमात या प्रकारामुळे हाडाच्या व स्वत: वृत्तांकन करणा-या पत्रकारांची मात्र गोची होताना दिसून येत आहे.. त्यातच किनवट व माहूर तालुक्यातील जवळपास सर्वच शासकीय कार्यालयाबरोबरच अनेक नियमित जाहिरातदारांच्या कार्यालयात ‘न भुतो न भविष्यती..!!’ याप्रमाणे जाहिरात मागणीच्या पत्रांचा प्रचंड प्रमाणात खच पडला असून मागील दोन वर्षांच्या तुलनेत यावर्षी आलेल्या जाहिरात मागणीच्या नवीन पत्रांची संख्या जवळपास 95% आहे… अशात जाहिरातदाराने आपली जाहिरात द्यावी तरी कुणाला..? हा यक्षप्रश्न जाहिरातदार मंडळींना पडला असून कॉपीपेस्ट व फकाट पत्रकारांच्या माहूरमधील काही मंडळीसोबतच किनवट येथील काही फकाट मॆडळींही या सुभकार्यात अग्रेसर असल्याचे सांगण्यात येत आहे… नियमित जाहिरातदारांच्या सांगण्यानुसार किमान आठ ते दहा पत्रकारांची पथके किनवट व माहूर या दोन्ही तालुक्यात “जाहिरात भ्रमण” (कुत्र्यासारखे फिरत) असल्याचे सांगण्यात येेत आहे…ही बाब केवळ किनवटचीच नसून माहूर तालुक्यातही दिवाळीच्या मुहूर्तावर अनेक पत्रकारांचा जन्म झाला असल्याचे जवळपास सर्वच शासकीय कार्यालयात आलेल्या जाहिरात मागणीच्या पत्रांवरून दिसून येत आहे. त्यामुळे पत्रकार व पत्रकारीतेचे भविष्य काय..? हा यक्षप्रश्न सर्वसामान्यांना भेडसावत असून पवित्र (पतीव्रता) पत्रकारीता आज ख-या अर्थाने अपवित्र (छिनाल) पत्रकारीतेच्या विळख्यात अडकल्याचीच एकंदरीत परिस्थिती दिसूून येत आहे……
विशेषत: भारतीय लोकतंत्राचे तीन स्तंभाप्रमाणे भारतीय मीडिया भारतीय लोकतंत्राचा चौथा स्तंभ मानला जातो. कारण जेव्हा पहिली तीन स्तंभ हे आपल्या कर्तव्या पासून दूर जातात तेव्हा त्यांना मार्गावर आणण्यासाठी हा चौथा स्तंभ कार्यरत होतो. परंतु आज या मीडियाचे व्यापारीकरण झाल्याचे बोलके चित्र सर्वसामान्यांना दिसून येत असून टी.आर . पी. व जाहीरात प्राप्तीच्या भानगडीत आपली सत्यनिष्ठता व तर्कशीलता गमावत चालला आहे. परिणामी बातमी मध्ये माहितीच्या अभावाबरोबरच सारखेपणा व कुण्यातरी एका गटा कडे झुकाव हा प्रकर्षाने दिसून येत आहे… ही बाब लोकशाहीसाठी काल ही घातक होती, आज आहे व उद्याही राहणार… हे मात्र काळ्या दगडावरील रेघ आहे… तर जनतेला माहिती मिळवण्याचा एक महत्वाचा स्रोत असलेल्या मीडियात आज माहिती विहिन तसेच कर्तव्यशुन्य व कॉपीपेस्ट परंतू बनावट पत्रकार मंडळींच्या आगमनाने लोकशाहीचा चौथा स्तंभ ढासळतो की काय ? असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे…
एकंदरीतच शेजा-याच्या भरवशावर बायका करणा-या (स्वत: लिहिता येत नसल्याने दुस-यांची बातमी कॉपी पेस्ट करणा-या) “फकाट” संपादकांच्या नादी लागून त्याहूनही फकाट व निर्लज्ज असलेल्या कॉपीपेस्ट चेलेचपाट्यांच्या (पत्रकारांच्या) भिक्कारचोट पणामुळे हाडाच्या व निष्पक्ष पत्रकारीतेला प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत असून दिवाळी जाहिरातीच्या नावाखाली अगदी शंभर रूपयापासून ते वार्षिक हजार रूपयांपर्यतची बोली हे भिकारचोट पत्रकार स्वत:हून लावत असल्याचे कटू सत्य नियमित जाहिरातदार बोलून दाखवत आहेत… अशात गैरकायद्याच्या कामांना सुरक्षाकवच लावण्याच्या उद्देशाने तसेच पत्रकारीतेच्या क्षेत्रात मोठी कमाई करण्याच्या उद्देशाने आपणच खरे पत्रकार असल्याचा आव आणत पत्रकारीतेच्या पवित्र क्षेत्रात शिरलेल्या भिक्कारचोट व कॉपीपेस्ट पत्रकारांंना नियमित जाहिरातदारांनी थारा देवू नये असे आवाहन पत्रकारीतेची समज व जाण असलेल्या पत्रकारांसोबतच सर्वसामान्यांमधून होत असून अशा पत्रकारांना धडा शिकवण्याची खरी गरज निर्माण झाल्याची बोलकी प्रतिक्रिया जनमानसांतून व्यक्त होत आहे….