ईतर

भरधाव वेगाने जाणा-या कारचा टायर फुटून भिषण अपघात ; कारचा चक्काचूर….

"सारखणी माहूर राष्ट्रीय महामार्गावरील आष्टा फाट्यानजीकची घटना" सुदैवाने जिवीत हानी नाही....

(महाराष्ट्र न्युज नेटवर्क)

किनवट/माहूर 

 भरधाव वेगात जात असलेल्या स्विफ्ट डिझायरचा टायर फुटून भिषण अपघाताची घटना सारखणी ते  माहूर राष्ट्रीय महामार्गावरील आष्टा फाट्यानजीक आज दुपारी सव्वा तीन वाजताच्या सुमारास घडली असून या घटनेत कारचा चेंदामेंदा झाला असला तरी सुदैवाने जिवीत हानी मात्र काळ आला होता पण वेळ आली नसल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले आहे..

 आज दि..२५ सप्टेंबर रोजी दुपारी सव्वातीनच्या सुमारास माहागाव येथील कदम यांची स्वीफ्ट डिझायर क्र. एम.एच २९ ए.आर. २७३३ या क्रमांकाची पांढ-या रंगाची कार वाई बाजारहून महागावकडे जात असताना सारखणी ते माहूर राष्ट्रीय महामार्गावरील आष्टा फाट्यानजीक भरधाव वेगात असलेल्या कारचा समोरील डाव्या बाजूचा टायर फुटला..  त्यावेळी चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार रस्त्याच्या उजव्या बाजूच्या खोलगट बाजूने तब्बल पन्नास ते शंभर फुटापर्यंत गटांगळ्या खात गेली.. यात कारचा अक्षरश: चेंदामेंदा झाल्याची प्रत्यक्ष परिस्थिती असून सुदैवाने या दुर्घटनेत जिवीत हानी झाली नसल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले आहे…….
   ……याबाबतचे वृत्त लिहीपर्यंत प्रशासकीय स्तरावर घटनेची नोंद न झाल्याने घटनेबाबत अधिकची माहीती प्राप्त होवू शकली नाही….

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close