क्राइम

पत्नी व पार्टनरकडून खेळल्या गेलेल्या ‘डबल गेम’ मुळे व्यथित झालेल्या ओंकार कुळकर्णीने फेसबुकवर स्टेटस ठेवून घेतला गळफास…

'पत्नीने' केला गर्भपात, तर पार्टनर देखील पैसे घेवून झाला पसार..' ; एका स्वयंघोषित वकीलासह चौघांवर गुन्हा दाखल..!

(महाराष्ट्र न्युज नेटवर्क)
नांदेड…
   पत्नी व व्यवसायातील पार्टनरच्या डबल गेममुळे व्यथीत झाल्याने मानसिक दडपणाखाली फेसबुकवर स्टेटस ठेवून नांदेडच्या ओंकार कुळकर्णीने गळफास घेवून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना नांदेडात घडली असून मृत्यूनंतर पोलीसांना सापडलेली चिठ्ठी तसेच अनुभवण्यात आलेल्या प्रत्यक्ष घडामोडींच्या पार्श्वभुमिवर ओंकारच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून त्याच्या पत्नीसह तिची आई, व्यवसायातील पार्टनर तसेच नांदेडच्या एका स्वयंघोषित वकीलावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
   
   नांदेड येथील पौर्णिमानगर विमानतळ भागात राहणारा २९ वर्षीय ओंकार कुळकर्णी हा सोशल मिडीयावर नेहमी सक्रीय असल्याने त्याचे फॉलोअर्स देखील लक्षणीय आहेत. परंतू दि. १७ जून २०२२ रोजी त्याने फेसबुकवर टाकलेल्या स्टेटस मुळे त्याच्या सर्वच मित्रांच्या अक्षरश: तोंडचे पाणी पळाले… त्यावेळी… “जय श्रीराम…सगळं संपल.. आता फक्त स्वत:ला संपविण्याचे बाकी आहे…!” असा मजकूर त्याने फेसबुक वर टाकून याच रात्री रात्री अंदाजे २ वा. च्या दरम्यान त्याच्या रूममधील सिलींग फँनला गळफास घेवून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली…..
  ओंकारची आई मीना प्रदीप कुळकर्णी वय ५० हिने विमानतळ पोलीस स्टेशन नांदेड येथे दिलेल्या फिर्यादीनुसार ओंकारचा विवाह दिलीप मानिक केंद्रे रा. पोकर्णा ता. कंधार जि. नांदेड यांची मुलगी पुजा दिलीप केंद्रे हिच्याशी दि. ९ मे २०२१ मध्ये झाला होता.  लग्नानंतर अवघ्या दोन महिण्यातच ओंकारची पत्नी पुजा हिने त्याला दि. १४ जुलै २०२१ रोजी फोन करून सांगीतले की, “तिचे मागील अडीच वर्षांपासून बरबडा ता. नायगाव येथील महेश परमेश्वर महाजन याच्यासोबत प्रेमसंबंध आहेत. आणि तिला त्याच्यासोबतच राहायचे आहे.” या संभाषणाची ऑडीओ क्लिप देखील उपलब्ध असल्याचे तक्रारीत सांगण्यात आले आहे.. 
दरम्यान या कारणांमुळे ओंकार हा दि. १८ मे २०२२ रोजी सायंकाळी ७:०० वा घरी उशीरा का आला..? या कारणावरून पुजाने ओंकारच्या गालात थापड मारली. व स्वत:च कांगावा करून तिच्या आईला बोलावून घेतले. त्यावेळी तिच्या आईनेही कुठलाही विचार न करता ओंकारच्या थोबाडीत मारली. व रागारागाने पुजाला घेवून जाऊन विमानतळ पोलीस ठाण्यात ओंकारने तिच्या पोटावर लाथ मारल्याची खोटी तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून तिला सरकारी दवाखाना नांदेड येथे एम.एल.सी. साठी देखील पाठवले होते. परंतू एम.एल.सी. पेपरवर तशी काही नोंद आढळून आली नसल्याने तिच्या अर्जावरून त्यावेळी केवळ अदखलपात्र गुन्हा (एन. सी.) दाखल झाली होता. 
  दरम्यान पुजाने ओंकारला अधिक अडचणीत आणण्यासाठी स्वत:च गर्भपाताच्या गोळ्या किंवा इतर कशानेतरी गर्भाचा घात केला असावा त्यामुळे दि. २१ मे २०२२ च्या रात्रीपासून ‘ब्लिडींग’ होत होती. त्यामुळे तिची आई व मावश्यांनी तिला दवाखाण्यात नेले होते. त्यावेळी तिचा गर्भपात झाला असल्याचे समजले. परंतू पुजाचा गर्भपात नेमका कशामुळे झाला याची नेमकी माहीती समजली नाही… परंतू तिचा गर्भपात हा ओंकारने तिच्या पोटावर मारले त्यामुळे झाला असा खोटा आरोप करून आम्हा सर्वांवर गुन्हा दाखल करण्याची ती ओंकारला सातत्याने धमकी देत असल्याचे ओंकार हा प्रचंड मानसिक दडपणाखाली वावरत असल्याचे त्याच्या आईने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.. 
    त्यावेळी पुजा व ओंकार या दोघांच्याही सहमतीने त्यांच्या विवाह विच्छेदनासाठी पुजाला १ लाख पन्नास हजार रूपये देण्याचे ठरून त्यापैकी पन्नास हजार रूपये दिले. उर्वरीत १ लाख रूपये न्यायालयातून फारकतीच्या वेळी देण्याचे ठरले.  त्यामुळे मा. कौटुंबिक न्यायालयात दि. १६ जुन २०२२ रोजी फारकतीचा अर्ज क्र. पिटीशन एफ. ८०/२०२२ दाखल करण्यात आला होता. हा अर्ज दाखल केल्यानंतर पुजा, तिची आई अनिता व नांदेडमध्ये इतर वकीलांच्या भरवशावर स्वत:ला वकील म्हणवून घेणारा स्वयंघोषित वकील आशिष दुबे यांनी ओंकारला उर्वरीत १ लाख रूपयाची रक्कम ताबडतोब आणून दे.. नाहीतर पोलीस स्टेशनला जाऊन तुझ्या आईला अटक करायला लावतो. जर तू काही शहाणपणा केलास तर तुलाही मारून टाकतो. अशी धमकी दिल्याने तो प्रचंड मानसिक तणावात वावरत होता. रक्कम मोठी असल्याने आम्ही १० रू शेकडा प्रमाणे ५० हजार रूपये काढून दि. २२ मे २०२२ रोजी पुजा व तिच्या आईला दिले आहेत. त्यानंतर पुजाने तिची खोटी तक्रार मागे घेतली. व उर्वरीत १ लाख रूपयाची रक्कम मा. कौटुंबिक न्यायालयातून घटस्फोट मंजूर होताना देण्याचे ठरले होते. ..
   तर दुसरीकडे ओंकार हा महेंद्र कुळकर्णी रा. हमयनुमाननगर, माळी गल्ली परभणी याच्या सोबत पाईपलाईन टाकण्याचे भागीदारीत काम करीत होता. काम पुर्ण झाल्यानंतर पैसे अर्धे-अर्धे वाटून घेण्याचे ठरले होते. त्यात ओंकारने उसनवारीचे ४ लाख रूपये लावले होते. परंतू काम पुर्ण झाल्यानंतर महेंद्र कुळकर्णी यानेही ओंकारला काहीही न सांगता परस्पर कामाची रक्कम उचलून पसार झाला. व मोबाईल देखील बंद करून ठेवला.. त्यात उसनवारीचे घेतलेले पैसे मागण्यासाठी लोकं घराभोवती चकरा मारू लागल्याने ओंकार हा दुहेरी संकटात अडकला. व प्रचंड मानसिक दडपणाखाली होता.
   दि.१७ जून २०२२ रोजी गळफास घेण्यापुर्वी ओंकारने चिठ्ठी लिहून माझ्या मरणास महेंद्र कुळकर्णी याच्यासह पुजा व स्वयंघोषित वकील आशिष दुबे आहेत असे सांगीतले आहे. तसेच पुजाची आई अनिता दिलीप केंद्रे हिने देखील ओंकारचे मानसिक खच्चीकरण केले असल्याने त्याने मानसिक दबावाखाली गळफास घेवून आत्महत्या केली आहे. तसेच फेसबुकवर ‘जय श्रीराम’… “सगळं संपलं..आता फक्त स्वत:ला संपविण्याचे बाकी आहे…” असे स्टेटस लिहीले.. व रात्री अंदाजे २ वा. च्या दरम्यान गळफास लावून आत्महत्या केली आहे.  त्याच्या मृत्यूस कारणीभुत ठरल्यामुळे ओंकारची आई मीना प्रदीप कुळकर्णी रा. पौर्णिमानगर नांदेड यांनी दिलेल्या तक्रारीवरून विमानतळ पोलीस ठाण्यात महेंद्र मुरलीधर कुळकर्णी याच्यासह पुजा ओंकार कुळकर्णी, स्वयंघोषित वकील आशिष दुबे व तिची आई अनिता दिलीप केंद्रे यांच्यावर कलम ३०६, ५०६, ३४ भा.द.वी. प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून याचा पुढील तपास विमानतळ पोलीस करत आहेत…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close