ईतर

कोट्यावधींंच्या कामांची माहिती दडवणा-या माहूर वनविभागाकडून वृक्षलागवडीच्या फुशारक्या…!

"१ जुलैपासून वृक्षारोपन, मग पुर्वीच्या कामांचे काय..? ; वनप्रेमींचा संतप्त सवाल..!"

(महाराष्ट्र न्युज नेटवर्क)

(बाबाराव कंधारे)

माहूर वनपरिक्षेत्रांतर्गत तब्बल ३२ ठिकाणच्या कामांची माहिती दडवत मुग गिळून बसलेल्या माहूर वनविभागातील पाच परिमंडळात ३५ हेक्टरवर येत्या १ जुलैपासून वृक्षलागवडीचा कार्यक्रम हाती घेतल्याची ब्रेकींग न्युज माहूर वनपरिक्षेत्र अधिका-यांनी जाहीर केली असून १३ हजार ६१७.९८१ हेक्टर वनपरिक्षेत्र असताना त्यातील केवळ ३५ हेक्टरवर वृक्षलागवडीचा संकल्प करणे हा प्रकार म्हणजे निव्वळ वनविगाच्या फुशारक्या असल्याचे मत वनप्रेमींकडून व्यक्त केले जात आहे. तर जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून आलेल्या १ कोटी १२ लाख ८१ हजाराची तब्बल ३२ कामे प्रलंबित आहेत..?, पुर्ण केली..?, सुरूवातच झाली नाही..? अथवा पावसात वाहून गेली..? याबाबत अद्यापही माहूर वनविभाग मुग गिळून गप्प का..? असा संतप्त सवालही उपस्थित होत आहे.
‘वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे’ या संत तुकारामांच्या अभंगवाणीला आपले ब्रिदवाक्य बनवल्याची बतावणी करत असलेल्या माहूर वनविभागाने वृक्षारोपनाचा भरगच्च कार्यक्रम आखल्याच्या ‘हातहातभर’ बातम्या माध्यमांतून वाचायला मिळत आहेत. तालुक्यात १३ हजार ६१७.९८१ हेक्टर वनपरिक्षेत्र असताना त्यातील ३५ हेक्टर वर वनपरिक्षेत्र अधिकारी महोदय वृक्षलागवडीच्या फुशारक्या मारत आहेत…. परंतू यापुर्वीदेखील अगदी याच प्रमाणे वृक्षलागवडीचे अनेक कार्यक्रम घेण्यात आले.. त्यातील लागवड केलेल्या वृक्षांमधून आजमितीस किती झाडे जिवंत आहेत..? व किती झाडांना वाचविण्यात वनविभागाला यश आले..? हा प्रश्न सध्यातरी अनुत्तरीतच आहे…
  तर दुसरीकडे जिल्हा नियोजन समितीचा प्रशासकीय मान्यता आदेश दि.२७ डिसेंबर २०२१ नुसार MNB च्या कामांसह CCT ची कामे, वनतळे, पानवठे तयार करणे, DEEP CCT ची कामे, मृद व जलसंधारणाची कामे असे तब्बल ३२ कामे माहूर तालुक्यातील अजनी, ईवळेश्वर, कुपटी, गुंडवळ, तांदळा, साकूर, धानोरा (दि.), बोरवाडी, मुंगशी, मेंडकी, वानोळा तांडा, मांडवा, पवनाळा, बोरड (चोरड), हडसणी, माहूर, अनमाळ, तुळशी, दिगडी, धानोरा (दि), पानोळा, हिंगणी या ठिकाणी तब्बल १ कोटी १२ लाख ८१ हजार रूपयाची कामे माहूर वनविभागाने करण्यात आल्याचे प्राप्त दस्तावेजांवरून दिसून येते… विशेष म्हणजे यातील कामांचे प्रत्यक्ष ठिकाण हे वनविभागालाच माहिती असून यातील कामांच्या प्रत्यक्ष ठिकाणांबाबत माहूर वनविभागाकडे विचारणा केली असता… वन विभागाला “थंडीताप” येत असल्याचीही प्रचिती अनेक वेळा आली आहे….!!
“सदरची कामे वनविभागाने पुर्ण केली आहेत..? प्रलंबित आहेत..? प्रगतीपथावर आहेत..? पावसात वाहून गेली..? की उन्हाने वाळून गेली ..? याबाबत मात्र वनपरिक्षेत्र अधिकारी काही एक सांगण्यास तयार नसून वरील कामांची माहिती देण्यास कायम टाळाटाळ करत आहेत… मग झालेली कामे उजागर करून कामांबाबत माध्यमांस माहिती देण्यास वनपरिक्षेत्र अधिका-यांना “घाम” का फुटतोय..? हे न उलगडणारे कोडे बनले असून वनविभागाची “पुढे पाठ व मागे सपाट” या प्रवृत्तीची इत्तंभुत प्रचिती देणारे आहे..

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close