(महाराष्ट्र न्युज नेटवर्क)
श्रीक्षेत्र माहूर
माहूर तालुक्यात गेल्या दोन दिवसापासून ढगफुटी अतिवृष्टी सदृश्य पाऊस झाल्याने पैनगंगेच्या पुलावरून पाणी गेल्याने तब्बल 22 तास वाहतूक बंद होती. त्यामुळे माहूर नांदेड माहूर पुसद माहूर यवतमाळ कडे जाणारा मार्ग पूर्णपणे बंद असल्याने आलेले भाविक प्रवासी तसेच वाहनधारकांना प्रचंड त्रास सहन करावा लागला 22 तासानंतर पाऊस ओसरल्याने पैनगंगा नदीच्या पुलावर मोठ्या प्रमाणात झाडे कचरा येऊन जमा झाला होता सदरील कचरा नगराध्यक्ष फिरोज भाई दोसानी यांनी स्वतः स्वखर्चाने जेसीबी व मजूर लावून स्वच्छ करून रस्ता मोकळा करत पूलाची पाहणी करून रहदारी सुरू केल्याने नागरिकांतून त्यांचे अभिनंदन होत आहे..
माहूर तालुक्यात ढगफुटी अतिवृष्टी सदृश्य पाऊस झाल्याने मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. अनेक गावातील शेतकऱ्यांची जनावरेही वाहून गेली आहेत. अनेक रस्ते उखडून गेले तर पुलांचीही तुटफुट झाली असून हिवळणी येथील शेतकऱ्याचा विजेचा शॉक लागण्याने बैलासह मृत्यू झालेला आहे.. त्यामुळे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्यासह आमदार भीमराव केराम यांनी शासनाकडून तत्काळ नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतीचे घरपडीचे पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी यासाठी प्रशासनास सांगितल्याने सहायक जिल्हाधिकारी मेघना कावली यांनी तहसीलदार माहूर, गटविकास अधिकारी, कृषी अधिकारी यांना तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिल्याने तहसील कार्यालयाकडून झालेले नुकसानीची माहिती गोळा करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.. तसेच पिक विमा काढलेल्या शेतकऱ्यांनी तात्काळ नुकसानीचा अहवाल ऑनलाईन सादर करावा असे आवाहनही करण्यात आले आहे. अतिवृष्टी होऊन पोळ्याच्या दिवशीही दिवसभर पाणी सुरू असल्याने उभ्या पिकांचे शंभर टक्के नुकसान झाले असून वाढ खुंटणे, उतारा कमी येणे, शेतजमीन चिबडणे, सुपीक माती वाहून जाणे आदी प्रकार झाला असल्याने शासनाकडून तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत करावी अशी मागणी राजकीय पुढा-यांन यांनी केली आहे..
दरम्यान पुलावरून पाणी जात असताना माहूरचे नगराध्यक्ष फिरोज दोसानी यांच्यासह मुख्याधिकारी विवेक कांदे, कार्यालयीन अधीक्षक वैजनाथ स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली संदीप गजलवाड, अभियंता विशाल ढोरे, शेख मजहर, स्वच्छता दूत गणेश जाधव, विजय शिंदे, अग्निशमन वाहन चालक शेख मन्सूर भाई, सुरेंद्र पांडे, संदीप राठोड, समाधान राठोड, कृष्णा चव्हाण, रामसिंग थुरवाल व सर्व कर्मचारी पोलीस विभाग, महसूल विभाग यांचे कर्मचा-यांनी परिश्रम घेतले.. तसेच पुलावरून पाणी ओसरल्यानंतर नगराध्यक्ष फिरोज भाई दोसानी यांनी स्वतः करून मार्ग मोकळा केल्याने त्यांचे अभिनंदन होत आहे…